(Cashless Treatment for Accident Victims) अपघातग्रस्त रुग्णांना आता यापुढे १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवार, दि. १८ एप्रिल रोजी याबाबत घोषणा केली आहे. रुग्णांना वेळेवर दर्जेदार, तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे निर्देशही त्यांनी दिले.
Read More
(Nitin Gadkari) रस्ते अपघातामधील अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात नेणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारकडून ५ हजार रुपये बक्षीस स्वरुपात मिळायचे. परंतु आता बक्षिसाची रक्कम वाढवून २५ हजार रुपये करणार येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. रस्ता सुरक्षेच्या मुद्द्यावर अभिनेते अनुपम खेर यांच्या मुलाखतीदरम्यान नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाला पुरस्काराची रक्कम वाढवण्याचे निर्देश दिले आहेत