( Taxpayers take advantage of the Abhay Yojana Goods and Services Tax Department ) ‘जीएसटी’ कायदा नवीन असल्यामुळे सुरुवातीच्या काळात व्यावसायिक, करदात्यांकडून ‘जीएसटी कायद्या’चे अनुपालन, करभरणा करताना अनवधानाने चुका झाल्या आहेत. या चुकांमुळे व्याज आणि दंड याचा आर्थिक भुर्दंड करदात्याला लागू नये. तसेच, वस्तू व सेवाकर विवादांचे निराकरण सुलभतेने होऊन विवादित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ‘जीएसटी अभय योजना‘ सुरु केली आहे. पात्र करदात्यांनी ३१ मार्च २०२५ पर्यंत या योजनेचा लाभ घ्यावा, असे आ
Read More
मुंबई : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी सुरू केलेल्या महावितरण अभय योजना २०२४ ( Abhay Yojana ) ला ग्राहकांच्या मागणीनुसार ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होत असल्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.
झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट २ तयार झाल्यानंतर विकल्या जाणाऱ्या झोपडी हस्तांतरणासाठी अभय योजना लवकर जाहीर होण्याची शक्यता असून आज याबाबत विधानभवनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यामुळे मुंबईतील मोठा तिढा सुटणार असून अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना २० ते २५ वर्षे रखडल्या आहेत.
कोरोना संकटकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढून उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड – २०२२' अभय योजना आज विधिमंडळात जाहीर केली
प्रलंबित कर, व्याज, दंड तसेच प्रलंबित विलंब शुल्क यांचा ठराविक प्रमाणात भरणा केल्यास नोंदित व अनोंदित व्यापाऱ्यांची उर्वरित रक्कम माफ करण्यासाठी राज्य शासनाने अभय योजना जाहीर केली आहे.
परिसरातील नागरिकांसाठी ‘अभय योजना’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे. यामुळे येथील रहिवासीयांना पाणी देयकांचे विलंब शुल्क माफ करण्यात येणार असून मूळ पाणीपट्टीची रक्कम तीन मासिक टप्प्यांमध्ये व ६ महिने कालावधीमध्ये भरण्याची मुभा मिळणार आहे.