पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर हल्ल्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, त्यांची धार्मिक स्थळे देखील लक्ष्य केली जात आहेत. विशेष करुन हिंदु मंदिरांवर होणार्या हल्ल्यांचे प्रमाण वर्षभरात दुप्पट झाले आहे, असा निष्कर्ष पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने आपल्या अहवालात काढला आहे.
Read More
सरलेल्या वर्षातील अनेक महिने अर्थव्यवस्थेत शैथिल्य आले, तरीही सरकारने विविध क्षेत्रांच्या विकासासाठी आपली तिजोरी खुली केल्याचे दिसते. कोरोनाच्या आरोग्य आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या भरघोस निधी तरतुदीच्या नव्या दशकाच्या पहिल्या अर्थसंकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे नक्कीच अभिनंदन केले पाहिजे.
मुंबईतील महापालिका शाळांचा दर्जा राखण्यात महापालिका प्रशासन विविध प्रकारे खटाटोप करीत असतानाचा आता तब्बल दहा शाळांमध्ये ‘सीबीएसई’ मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय सोमवार, दि.१८ जानेवारी रोजी निर्णय घेण्यात आला. महापालिका शाळांची पटसंख्या राखण्यासाठी तब्बल २७ प्रकारच्या शालेय वस्तू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आला असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पालकांचा कल लक्षात घेता, मुंबईतील दहा शाळांमध्ये ‘सीबीएसई’ मंडळाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आ
महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाची घोषणा यांनी या हिवाळी अधिवेशना दरम्यान झाली होती. आता या कामाला गती मिळाली असून प्रकल्पाची स्वरूप निश्चिती, प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे, या कामांचा तपशील निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.