(Chetana Kalse Case) बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण लावून धरणारे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या तीन दशकापासून बीडमधील काही हत्या प्रकरणांचे दाखले देत त्यांनी बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला आहे. या हत्या प्रकरणांचे दाखले देत असताना त्यांनी चेतना कळसे नावाच्या मुलीच्या ह्त्येचा उल्लेख केला.
Read More
(Walmik Karad) अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची १४ दिवसांची पोलिस कोठडी संपल्यामुळे आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाकडून कराडला १० दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे. केज न्यायालयात न्यायाधीश एन डी गोळे यांच्या समोर सुनावणी झाली.
(Santosh Deshmukh Murder Case) बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ६ डिसेंबर रोजी मस्साजोगला जातना सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केल्याची माहिती समोर येत आहे.