हिंदी महासागरात (दिबोटी) आणि प्रशांत महासागरात (सॉलोमन बेटे) येथे चीनतर्फे केल्या जाणार्या विस्तार वादाच्या आक्रमक हालचाली पाहता ‘अगलेगा‘ या बेटांचे भारतासाठीचे सामरिक महत्त्व लक्षात येते. ६ हजार ४०० एकर एवढे क्षेत्रफळ असणार्या ‘अगलेगा‘ या बेटांमुळे भारताला आपल्या नाविक हालचाली सक्षमपणे करण्यासाठी आणि तेथे उपलब्ध करण्यात आलेल्या आणि अजून होत असलेल्या या बेटांवरील सोईसुविधांचा खूप उपयोग होऊ शकतो.
Read More
चीनकडून जर सॉलोमन बेटांवर नाविक तळ उभारण्यात आला, तर फक्त ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांना चीनची लष्करी भीतीच नाही, तर या सामुद्रधुनीतून मालाची ये-जा करणार्या मालवाहू जहाजांवरही चीनची बारीक नजर आणि नियंत्रण असेल, याची काळजी वाटत असणे स्वाभाविक आहे. ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ मंत्र्यांनी या देशाला भेट देऊन चीनबरोबर करण्यात आलेला हा करार नाकारण्याचे आवाहन केले होते