मध्य प्रदेशातील छिंदवाड येथे रविवारी ३ नोव्हेंबर रोजी कट्टरपंथी युवक मोहम्मद तौफिकने हिंदू धर्मामध्ये बुद्धीचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या भगवान गणेशजींच्या मंदिरात जबरदस्तीने घुसून मूर्तीची तोडफोड केली आहे. यानंतर आता विश्व हिंदू परिषद बजरंग दलसारख्या हिंदू संघटनांनी मोहम्मद तौफिकनने केलेल्या कृत्याविरोधात तक्रार दाखल केली असून अटक करण्याची मागणी केली होती.
Read More
गणेश मूर्तीसमोर (Ganesh Murti) काही कट्टरपंथींनी पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा दिल्याची घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात घडली आहे. त्यावेळी धर्मांधांनी हातात हिरवे झेंडे घेऊन घोषणा दिल्या होत्या. ही घटना १६ डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणात पोलिसांनी लक्ष घालून पुढील तपास सुरू केला आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरन यादव यांच्या संकल्पनेतून कलेचा प्रचार आणि संवर्धन करण्याच्या हेतूने मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वारसा इमारतीत दोन नव्या शिल्पांचे अनावरण केले. ही दोन्ही शिल्पे श्रीगणेश आणि हनुमानाची आहेत
आज ‘ज्ञानेश्वरी’ जयंती. ‘ज्ञानेश्वरी’च्या आरंभीचे गणेशाचे मंगलाचरण म्हणजे गणपतीवरचे अर्थगर्भ व नितांतसुंदर असे स्वतंत्र काव्यच आहे! ही गणेशाची निव्वळ स्तुती नाही, तर हे श्रीगणेशाच्या रुपाचे खरे वर्णन आहे. माऊलींनी ही गणेशमूर्ती म्हणजे समस्त वेदवाङ्मयची मूर्ती आहे, अशी कल्पना केली व तिचे वर्णन केले.
येवला : तालुक्यातील पुरणगाव येथील एका मुस्लीम कुटुंबाने आपल्या घरात श्रीगणेशाची स्थापना केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून हे कुटुंब नियमितपणे दरवर्षी गणेशाची स्थापना करत आहे. त्यांचा हा भक्तिभाव सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.
श्रीगणेशाला वंदन। कुलस्वामी मातेला नमन। श्रीगुरूचरणी प्रणिपातून। कथिते विचार
दि. २० एप्रिलला सायंकाळी आबासाहेब पटवारी यांच्या निधनाचे वृत्त समजले आणि सुमारे २०-२२ वर्षांपूर्वीचे दिवस डोळ्यासमोर आले. त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...
राजगुरू जयंती विशेष; पोस्टरच्या प्रकाशनाने होणार श्रीगणेशा
जिथे ‘कला’ म्हणण्यापेक्षा कलेच्या प्रत्येक प्रांगणात सर जेजेचे विद्यार्थी नसतील तरच नवल! सध्या सर जे. जे. उपयोजित कलेच्या तिसर्या वर्गात कलाध्ययन करणार्या प्राची अंकुश मेस्त्री हिने श्रीगणेशमूर्ती बनविल्या जाणार्या सिंधुदुर्गातील आपल्या वडिलोपार्जित तीन पिढ्यांच्या कारखान्यात लक्ष घातले आहे. जेजेत कलाध्ययन करताना रंग-रंगाच्या भावव्यक्ती, रंगांच्या प्रकृती वगैरे बाबींचा अभ्यास होतो. त्याच ज्ञानाद्वारे प्राचीने तिच्या वडिलोपार्जित व्यवसायाला ‘कॉर्पोरेट’स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
संस्कारांना जपत, आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा समन्वय साधत ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ समाजाच्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होते. नाशिक ‘अभाविप’ला प्रामाणिक इच्छाशक्ती व सातत्यपूर्ण प्रयत्नाने आपला हेतू सफल होतो याची प्रचिती आली. औचित्य होते ते ‘श्रीगणेशमूर्ती व निर्माल्य संकलन’ या उपक्रमाचे. गोदामाईच्या संरक्षणासाठी नाशिकमध्ये ‘गणेशमूर्ती संकलन’ हा उपक्रम सुरू झाला.
डॉ. रा. गो. भांडारकर आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या दोन्ही श्रेष्ठ मराठी पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी त्यांच्या लिखाणात श्रीगणेशाच्या मूर्ती आणि प्राचीन भारतातील उपासना संस्कृतीत श्रीगणेशाला प्राप्त झालेलेदेवत्व आणि माहात्म्य या विषयी विस्तारानेलिहिले आहे.
देवळात स्थापन झालेल्या देवतेच्या मूर्तीला, मूळ ‘विग्रह मूर्ती’ असे संबोधित केले जाते. अशा मूर्ती निर्माण करण्यासाठी काही निश्चित मार्गदर्शक सूत्रे फार प्राचीन साहित्यात उपलब्ध आहेत.
बुद्धी प्रदान करणारा श्रीगणेश हा प्रज्ञा, मेधा, ऋतंभरामध्ये वास करतो. संकटांमधून सोडवणारा गणेश भक्तीमध्ये वास करतो. शुभ्र हिमालयाच्या पर्वतराशींत माता पार्वती आणि पिता शंकर यांच्या समवेत वास्तव्य करतो. गणपती भक्तांच्या देवघरातून अंगणात आला. आता तर तो थेट मैदानावर येऊन बसला.
कोणत्याही कामाचा शुभारंभ होतो तो श्रीगणेशाच्या स्मरणाने... डोंबिवलीकरांसाठी तर फडके रोडवरील श्रीगणेश मंदिर म्हणजे साक्षात आराध्यदैवतच. या मंदिर संस्थानातर्फे वर्षभर अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, ज्यामध्ये डोंबिवलीकरांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो.