आधीच कोकणात उबाठा गटाचे गळतीसत्र सुरु असताना आता तीन नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत याबाबत उबाठा गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Read More
कोथरुडमधील नामांकित शल्यविशारद आणि समाजसेवक डॉ. विलास जोग यांना मंगळवार, १४ जानेवारी रोजी दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्राच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बिमल केडिया यांच्या आठवणी लिहिताना साधारण ४३ वर्षांपूर्वीच्या आठवणी जागृत झाल्या. आमचा पहिला परिचय झाला, तो ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या एका मोर्चादरम्यान. पोस्टर्स लावायचे होते, पण नेमका पोस्टर्स लावायचा गोंद राहिला होता. तेव्हा राजू पटवर्धनने सांगितलं की, “गोरेगावला बिमल यांचे कार्यालय आहे. तिथे संपर्क कर आणि गोंद मागवून घे.” स्वाभाविकपणे बिमल कोण, काही माहिती नव्हतं. सांगितल्याप्रमाणे मी फोन केला आणि म्हटलं, “बिमल से बात करनी हैं।” तर समोरून आवाज आला, “मीच बोलतोय. बिमल केडिया.” त्यांना म्हटलं, “मो
मुंबई : “मी ‘जय भीम’ म्हणतो, त्यामुळे माझे मंत्रिपद गेले होते. यादीमध्ये नाव असताना ऐनवेळी आपल्याला डावलले,” असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते तथा माजी मंत्री डॉ. नितीन राऊत ( Dr. Nitin Raut ) यांनी केला आहे. “एका सभेदरम्यान केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे काँग्रेस कायम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा तिरस्कार करते,” असे उघड झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे वाराणसी येथे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ - एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवला आणि टेंट सिटीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांनी १ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अन्य देशांतर्गत जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगातील सर्वात लांब नदीवरील समुद्रपर्यटनासाठी सज्ज क्रुझ - एमव्ही गंगा विलासला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्याचप्रमाणे वाराणसीमध्ये गंगापात्रात टेंट सिटीच्या उद्घाटनासह १ हजार कोटींहून अधिक अंतर्देशीय जलमार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीदेखील करणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संतांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. ठाण्यात वारकरी संप्रदायाच्यावतीने सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.यावेळी वारकऱ्यांनी नतद्रष्ट सुषमाताई अंधारे असा उल्लेख करीत घोषणाबाजीही केली. यापुढे अशीच वक्तव्ये सुरु राहिली तर राज्यभरात आंदोलन तीव्र केले जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.सुषमा अंधारे
सा. ‘विवेक’च्या ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोशा’चे मार्गदर्शक, नाट्य खंडाचे संपादक, ज्येष्ठ लेखक-संपादक प्रा. विलास खोले यांचे सोमवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी पुणे येथे निधन झाले. त्यांच्याविषयी...
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान द्रष्टे, निष्णात नेत्रविशारद, भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, हिंदू महासभा नि भोसला सैनिकी विद्यालयाचे संस्थापक, धर्माभिमानी धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा दि. ३ मार्च हा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे चिंतन करणारा हा लेख...
'स्टार प्रवाह' या प्रसिद्ध वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून कलाकार किरण माने यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. प्रामुख्याने मोदी विरोध याला कारणीभूत आहे, असा कयास मानेंनी बांधायला सुरू केला आणि त्यात ते यशस्वी ठरले. त्याहूनही विशेष म्हणजे मानेंच्या या चकव्यात आघाडीची प्रसिद्धी माध्यमेही डोळ्यावर पट्टी बांधून सहज फसली. किरण माने एक हुशार कलाकार पण राजकीय भूमिका घेता घेता कधी राजकारण्यांसाठी भूमिका घेणारे 'कल्लाकार' बनले हे त्यांचं त्यांनाही कळलं नाही.
‘शिक्षकी पेशा हे वरदान व विद्यार्थी हे दैवत’ हे व्रत घेतल्याने शुभदा खटावकर यांनी दैनंदिन अध्यापन विद्यार्थी केंद्रित व्हावे म्हणून अभ्यासपूरक व अभ्यासांतर्गत असे अनेक स्वयंप्रेरित, कल्पक आणि उत्तमोत्तम उपक्रम कार्यान्वित केले. जाणून घेऊया त्यांचा जीवनप्रवास...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा व माझा प्रथम जवळून संबंध आला तो सन २००५ साली, ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाच्या निमित्ताने. निमित्त होते
दि. २३ नोव्हेंबरला पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण येऊन १४ महिने झाले. यात बँकेचे १७ लाख ठेवीदार आणि ५१ हजार भागधारक भरडले गेले आहेत. या बँकेच्या सहा राज्यांत १३७ शाखा असून, गोव्यासारख्या छोट्या राज्यात सहा शाखा असून, मुंबईसारख्या महानगरीत ३८ शाखा आहेत. तेव्हा, यानिमित्ताने हाच प्रश्न उपस्थित होतो की, पीएमसी बँकेच्या १७ लाख ठेवीदारांची परवड कधी थांबणार?
खासगी क्षेत्रातील आणखी एका बँकेवर आरबीआयने १६ डिसेंबरपर्यंत निर्बंध लावले आहेत. त्यामुळे खातेधारकांना आता २५ हजारांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. वित्त मंत्रालयातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी पंजाब महाराष्ट्र कॉ ओपरेटीव्ह बँकेवर ही कारवाई केली आहे.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत येणारी सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालये त्याचप्रमाणे अभिनव विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोरोना तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा...’ असं जेव्हा केव्हा गाणं सुरू होतं, तेव्हा पैठणीचा मोर नजरेसमोर फेर धरून नाचायला लागतो. पैठणीचं स्वत:चं एक वलय आहे. हे वलय आपोआप त्या व्यक्तीलासुद्धा प्राप्त होतं, जो या पैठणीच्या सान्निध्यात येतो. या पैठणीने त्याचं आयुष्य अगदीच बदलून टाकलं. एक सर्वसामान्य मुलगा आज काही कोटींची उलाढाल करतोय हे स्वप्नातीत आहे. मात्र, हे स्वप्न त्याने साकारलंय. हा स्वप्न साकारणारा तरुण म्हणजे ‘राणेज पैठणी’चे निनाद राणे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच व्हायरल झालेल्या या ध्वनिफितीने काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यात चव्हाण ‘मीही राजीनाम्याच्या विचारात आहे,’ असे म्हणतानाही दिसत आहेत.
राहुल गांधींचे पिता राजीव गांधी अशी आठवण मुत्तेमवार ठणकावून सांगतात आणि राहुल यांच्या आजीचेही नाव सांगतात. पण, राहुल यांच्या पित्याच्या पित्याचे नाव मुत्तेमवारांनाही आठवत नाही.
पक्षाचा अध्यक्षच जर सभ्यतेच्या मर्यादा सोडून वागत असेल, तर त्या पक्षातील अन्य नेत्यांनाही विरोधकांवर वाटेल तशी टीका करण्यासाठी चेव आल्याशिवाय राहणार नाही. तसेच राजकारणातील मुद्दे संपले की काहीतरी वेगळ्या विषयाकडे गाडी वळवून समाजात तेढ कशी निर्माण होईल, असा प्रयत्न काही राजकारणी जाणूनबुजून करीत असल्याचे दिसून येत असते. अलीकडील काही दिवसांत अशी अनेक उदाहरणे घडताना दिसत आहेत.
आज यांचा पक्ष इतका रसातळाला गेला असतानाही, या पक्षाचे ज्येष्ठ नेते अजून गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. पक्ष अपयशी का ठरतो आहे, याचं उत्तर या मानसिकतेत दडलेलं आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समांतर रस्ता कृती समितीतर्फे सुरू असलेल्या लाक्षणिक उपोषणात शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, स्वराज निर्माण सेना व प्रबोधन संस्था या संघटनांनी सहभाग नोंदविला.