सामाजिक समस्येवर प्रबोधन करणारे देखावे सार्वजनिक गणेशोत्सवात सादर केले जातात. ठाण्यातील जिजामातानगर येथील चैतन्य मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या देखाव्यातून "वेळीच ओळखा... नशेचा विळखा" हा विषय घेत नशेच्या आहारी जाणार्या तरुणाईला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. आजची तरुणाई नशेच्या आहारी जाऊन आपलं अस्तित्व, कुटुंब सर्वच गमावून बसते. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणूनच चैतन्य मंडळाचा हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
Read More