नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडने ५५० स्वदेशी मशीन पिस्तुल ‘अस्मि’ची ( Asmi Shastra ) खरेदी करण्यास हिरवा कंदील दिला आहे. याआधीही ५५० बंदुका खरेदी करण्यात आल्या होत्या. भारतीय लष्कराच्या या मागणीमुळे संरक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. ही बंदूक कर्नल प्रसाद बनसोड यांनी डीआरडीओच्या सहकार्याने बनवली आहे. नंतर ती हैदराबादच्या ‘लोकेश मशीन्स’ नावाच्या कंपनीने बनवली असून पूर्णपणे स्वदेशी आहे.
Read More