हजार - दोन हजार वर्षांपूर्वी जेंव्हा भारत जागतिक व्यापाराच्या शिखरावर होता, तेंव्हा त्या व्यापारात सगळ्यात मोठा वाटा होता, कापड उद्योगाचा ! सुती वस्त्र असो किंवा रेशीम – मलमल चे, भारतीयांचा डंका सगळ्या दुनियेत वाजत होता. युरोपला सुती वस्त्रांची ओळख भारताने करुन दिली. त्यांना फक्त लोकरीचे गरम कपडे माहिती होते. कापसाच्या शेतीबद्दल तर ते अनभिज्ञच होते. पूर्व आणि पश्चिम, दोन्ही दिशांचे देश भारतीय वस्त्रांच्या मोहात / प्रेमात पडले होते.
Read More
नुकतीच २२व्या विधी आयोगाने देशद्रोह कायदा कायम ठेवण्यासह, कायद्यातील शिक्षेची तरतूद किमान सात वर्षे तुरूंगवासासह जन्मठेपेपर्यंत वाढविण्याची शिफारस केली. त्यामुळे विधी आयोगानेही या कायद्याच्या वैधतेवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले असून, हा कायदा रद्द करण्याची मागणी करणार्यांना सणसणीत चपराक लगावली आहे.
ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांचा आलिशान राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या भव्यदिव्य सोहळ्याचा अंदाजे १०० दशलक्ष पाऊंडांचा खर्च आर्थिकदृष्ट्या गटांगळ्या खाणार्या ब्रिटनला करावा लागला. याविरोधात आणि ‘राजेशाही नकोच’ म्हणून ‘नॉट माय किंग’ अभियानही ब्रिटनमध्ये चर्चेचा विषय ठरले. त्यानिमित्ताने ब्रिटनचा माठ रिकामा असताना केलेला राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकाचा थाट, राजेशाहीचा इतिहास आणि ब्रिटनचे राजकारण यांचा आढावा घेणारा या लेखाचा पहिला भाग.