साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर येथे दि. २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. सुमारे ७२ वर्षानंतर अमळनेरकरांना ही संधी मिळाली असल्याने हे संमेलन अविस्मरणीय ठरावे यासाठी स्थानिकांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
Read More
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलनाची कार्यक्रम पत्रिका नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
९७ वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचा अनावरण सोहळा अमळनेर येथील प्रताप मिल कंपाउंड मधील बन्सीलाल पॅलेस मध्ये संपन्न झाला. यावेळी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय माहेश्वरी, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. बी. एस. पाटील, शिरीष चौधरी, खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप अग्रवाल, बोधचिन्ह निर्माते प्राचार्य मिलन भामरे आदी मान्यवर उपस्थित होते. ९७ वे साहित्य संमेलन अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ३ दिवस होत आहे.
ज्येष्ठांचा आधारवड रमेश पारखे ग्राहक संरक्षण, ज्येष्ठांसाठी कार्य, मानवाधिकार, माहितीचा अधिकार अशा चारविभागात प्रचंड कार्य करणार्या रमेश पारखे यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया...
खान्देशच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. रावेर मतदार संघातून रक्षा खडसे या आघाडीवर असून जळगावमधून उन्मेष पाटील आघाडीवर आहेत. यासोबतच धुळे व नंदुरबारमध्येही भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत.
परिस्थितीचे चटके बसले तरी मनाची संवेदनशीलता जपत, मनात कटुतेची कुठलीही रेषा उमटू न देण्याची दक्षता घेत वयाची ७५ वर्षे पूर्ण करणारे कवीवर्य पद्यश्री ना.धों.महानोर उर्फ ‘दादा’ म्हणजे काव्याचा अमृतमहोत्सवी पारिजात.
जेष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच रा.स्व.संघाचे जेष्ठ स्वयंसेवक तथा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे डॉ. टी. डी. कुडे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.
तालुक्यातील आंबे येथे माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या शिरपूर पॅटर्न टाईप बंधा-यात मुबलक पाणी आल्याने प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी सुरेश खानापूरकर यांच्यासोबत सकाळी सकाळीच पाहणी करुन समाधान व्यक्त केले.