रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा या गावामध्ये निळ्या दाढीवाला राघू या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. स्थानिक पक्षीनिरीक्षकांनी बुधवारी दि. १४ सप्टेंबर रोजी या पक्ष्याची नोंद करण्यात आली आहे. इंग्रजीत ह्या पक्ष्याला Blue-bearded Bee-eater असे म्हणतात. सदरचा पक्षी हा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये व चिपळूण तालुक्यातील घाटमाथा या भागामध्ये या आधी दिसल्याची माहिती मिळाली आहे. परंतु अपुऱ्या फोटोग्राफिक रेकॉर्ड व नोंदी अभावी रत्नागिरी तालुक्यामध्ये हा प्रथमच दिसला असण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांनी वर्तवली आह
Read More