काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्याचा अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मावलवी आमिर खान मुत्ताकी यांनी निषेध व्यक्त केला. यासंदर्भात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी रात्री मुत्ताकी यांच्याशी फोनवर चर्चा करत त्यांचे आभार मानले. भारतीय क्षेपणास्त्रांनी अफगाणिस्तानला लक्ष्य केल्याचा पाकिस्तानचा आरोपही अफगाणिस्तानने फेटाळून लावल्याने जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे आभार मानलेत. अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्यानंतर भारतासोबत झालेली ही पहिली मंत्रिस्तरीय चर्चा होती.
Read More
भारतावर भयानक दहशतवादी हल्ले होऊनही केंद्रातील काँग्रेस सरकारने त्याविरोधात पाकिस्तानवर कारवाईचे धाडस दाखवले नाही. भारतावर जागतिक महासत्तांचा दबाव असल्याची सबब मनमोहन सिंग यांनी पुढे केली. पण, काँग्रेस सरकारवर जागतिक महासत्तांचा नव्हे, तर देशातील मुस्लीम मतपेढीचा दबाव होता, हे आज स्पष्ट झाले, अन्यथा मोदी सरकारने तीन-तीनदा पाकिस्तानवर लष्करी कारवाई करूनही कोणत्याच देशाने किंवा अमेरिकेनेही भारतावर दबावापोटी निर्बंध कसे लादले नाहीत?
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अलिकडच्या दहशतवादी हल्ल्याबाबत चर्चा केली.
बांग्लादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनुस यांनी ईशान्य भारताची कोंडी करण्याच्या वल्गना करताच भारताने आता त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. भारताने आता बांग्लादेशला व्यापारासाठी बंगालच्या उपसागरातील भारतीय किनारा वापरण्याची परवानगी दिली होती
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तुंवर आयातशुल्क लादण्याच्या निर्णयात अखेर भारताचा समावेश झाला आहे. अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय वस्तुंवर २६ टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला गेला आहे
जागतिक सत्ता समतोल झपाट्याने बदलत असला, तरी त्याची दखल न घेतल्याने संयुक्त राष्ट्र ही संघटना आता कालबाह्य ठरत आहे. ही संघटना केवळ अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांच्या हातचे बाहुले बनल्यामुळे, जागतिक समस्यांच्या सोडवणुकीत ही संघटना अर्थहीन, निष्क्रिय आणि दुर्बळ ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्राच्या पुनर्रचनेची पुनश्च अधोरेखित केलेली मागणी म्हणूनच रास्त ठरावी.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावरही आयातशुल्क लादले जाणार आहे. त्याची अंमलबजावणी २ एप्रिलपासून होईल असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अमेरिकेकडून हे आयातशुल्क आकारले जात असले तरी त्यातून भारतालाच मोठा फायदा होणार असल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगीतले आहे
S. Jaishankar भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बांगलादेशातील अंतरिम सरकारला कडक शब्दात सुनावले आहे. बांगलादेशला भारतासोबत असलेल्या संबंधांचा निर्णय घ्यावाच लागेल. रविवारी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी संबोधित केले. बांगलादेश सतत भारतविरोधी विधान करत आहे. तसेच अल्पसंख्यांकांवरही अन्याय अत्याचार सुरू आहेत. त्यावर एस. जयशंकर यांनी निषेध व्यक्त केला.
USAID भारतातील निवडणुकांमध्ये USAID ने भारताला मतदानाच्या वाढीसाठी २१ दशलक्ष डॉलर्सचे वाटप केल्याचे वक्तव्य अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. त्यानंतर आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी शनिवारी या विधानातील तथ्ये लवकरच बाहेर येतील असे सांगितले.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांविरोधात ( Editorial on Illegal Immigrants In America ) कठोर कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्याच भूमीवरून त्याचे स्वागत केले आहे. त्याचवेळी अशा भारतीयांना देशाची दारे उघडी असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कारण, भारताची घुसखोरीविरोधातील उक्ती आणि कृती सारखीच आहे...
अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची कमान हाती घेतली आहे. आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी अमेरीकेत अवैधपणे राहणाऱ्या स्थलांतरितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच अमेरीकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांचे काय असा प्रश्न विचारला जात होता. या विषयीच बोलताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले की अशा भारतीयांना कायदेशीररित्या भारतात आणलं जाईल.
नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांच्या शपथविधीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर सोमवार, दि. २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या दौर्यावर जाणार आहेत. शपथविधी आयोजन समितीने यासाठी भारताला निमंत्रण पाठवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने प्रगतीची नवीन शिखरं गाठली आहेत. जागतिक स्तरावर भारताचे महत्व प्रस्थापित झाले आहे. अशातच भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर भाष्य करतान म्हणाले की स्वातंत्र्य आणि तटस्थ भूमिका यामध्ये कुणीही गल्लत करता कामा नये. भारत कधीही इतरांना आपल्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करू देणार नाही. त्याच बरोबर, राष्ट्रीय हितासह जागतिक हितासाठी जे योग्य आहे ते करत राहिल.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके हे सध्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटी दरम्यान सायबर सुरक्षेसह चार महत्वाच्या विषयांवर श्रीलंका करार करणार असल्याचे बोलले जात आहे. परराष्ट्रमंत्रालयाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेमध्ये झालेल्या निवडणुकांनंतर अध्यक्ष दिसानायके यांची ही पहिलीच भारत भेट आहे. या भेटी दरम्यान ते पंतप्रधान मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा कर
नवी दिल्ली : लोकसभेत चीनच्या ( China ) मुद्द्यावर बोलताना परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, “एलएसी’वरील परिस्थिती आता सामान्य आहे. दोन्ही देश परिस्थिती सुधारण्यासाठी कटिबद्ध आहेत,” असे त्यांनी सांगितले. ‘एलएसी’वरील शांतता राखण्याचे श्रेय परराष्ट्रमंत्र्यांनी लष्कराला दिले.
नवी दिल्ली : मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार बांगलादेशातील नागरिकांसह अल्पसंख्याकांचे संरक्षण ( Protect Hindus ) करण्यासाठी जबाबदार आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शुक्रवारी संसदेत केले आहे.
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी कॅनडाचा चांगलाच समाचार घेतला आहे. जयशंकर म्हणाले की " काल ज्या प्रकारे हिंदू मंदिरावर जो हल्ला झाला तो चिंताजनक आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याच बरोबर भारताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर पाळत ठेवणे ही बाब सुद्धा असभ्य होती. कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर न करता भारतावर आरोप करायचा हे आता कॅनडा सरकारचे धोरणच होऊन बसले आहे."
लदाख मधील नियंत्रण रेषेवरून भारत आणि चीन या दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतल्या नंतर, आता दिवाळी निमित्त दोन्ही देश दिवाळी निमित्त मिठाईची देवाण घेवाण करीत आहेत. लदाखमधील चुशुल मालदो आणि दौलत बेग ओल्डी, अरुणाचल प्रदेशातील बंछा (किबुटूजवळ) आणि बुमला तसेच सिक्कीममधील नथुला या ठिकाणी मिठाईंची देवाण घेवाण करण्यात आली आहे. भारत आणि चीन या देशांमधल्या करारामुळे दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
भारत आणि चीन यांच्यातील झालेल्या करार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. ४ वर्षांपासून भारत आणि चीन यांच्यात असलेल्या सीमवादाला आता अखेर पूर्णविराम मिळणार आहे. पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमेवरील लष्करी संरचना हटवण्याबाबत दोन्ही बाजूंच्या सैन्याने परस्पर पडताळणी केल्यानंतर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा केली जाईल.
विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्राची गरज असून, देशाच्या विकासासाठी डबल इंजिन सराकर असणे आवश्यक आहे असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. भारतीय जनता पक्षाच्या दादर येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
S. Jaishankar परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) हे रविवारी २७ ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी मुंबईतील २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा जर अशी घटना घडल्यास प्रत्युत्तर दिले जाईल, असे जयशंकर यांनी रविवारी सांगितले. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मुंबई जे घडले त्याची पुनरावृत्ती होऊ नये. जिथे दहशतवादी हल्ला झाला आणि कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
Jaishankar शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी भारतीचे परराष्ट्रमंत्री जयशंकर हे पाकिस्तानच्या दौऱ्यावर १६ ऑक्टोबर २०२४ रोजी होते. पाकिस्तानात वृक्षरोपणाच्या मोहिमेअंतर्गत त्यांनी वृक्षरोपण केले होते. यावेळी त्यांनी शिखर परिषदेत बोलत असताना संबोधित केले असता त्यांनी दहशतवादावर भाष्य केले.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला रवाना झाले आहेत. १५ आणि १६ ऑक्टोबर या दोन दिवसांमध्ये ही परिषद पार पडणार आहे.
पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषदेच्या (एससीओ) शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार असल्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पत्रकारपरिषदेत केली आहे.
भारताचा महत्त्वाचा मित्र देश असलेल्या श्रीलंकेत सत्ताबदल होऊन कम्युनिस्ट विचारसरणीचे सरकार स्थापन झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुर्णपणे दहशतमुक्त आहे. एक दिवस पाकव्याप्त काश्मीरही आम्ही भारताला जोडू, असा विश्वास परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज व्यक्त केला.
अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करणारे एक विधान केले होते. त्यांला भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही परदेशी स्थलांतरीतांचे स्वागत करतो त्यांमुळे अमेरीकेची अर्थव्यवस्था चांगली आहे. तर चीन, भारत आणि जपानसारखे देश तसे करत नाहीत म्हणुन त्यांची अवस्था बिकट आहे असे जो बायडन यांनी म्हटले होते. त्यावर एस. जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आता भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या आरोपांबाबत कॅनडा सरकारकडून पुरावे मागितले आहेत.
दळणवळणाशी संबंधित प्रकल्पांनी सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर केला पाहिजे. त्याचप्रमाणे दळणवळणाचा विकास म्हणजे कर्जाचे जाळे नव्हे, असा टोला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी किर्गिस्तान येथे शांघाय सहकार्य परिषदेत चीनचे नाव न घेता लगावला आहे.
इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’च्या तयारीचा आढावा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उच्चस्तरीय बैठक झाली.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भारताला इतर कोणाकडून शिकण्याची गरज नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यास हिंसाचार भडकविण्यासाठी वापर केला जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे कॅनडात होणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांविरोधात भारताने व्हिसा सेवा निलंबित केली आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी वॉशिंग्टन डिसी येथे पत्रकारपरिषदेत शुक्रवारी केले आहे.
मोदी सरकारचे केंद्रात ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, एस जयशंकर यांनी मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या परराष्ट्र धोरणाबद्दल माध्यमांना माहीती दिली.
गेल्या वर्षीपर्यंत जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश अशी भारताची ओळख होती. ती पुसून युरोपला सर्वाधिक शुद्ध तेल पुरवणारा देश अशी भारताची नवी ओळख प्रस्थापित झाली आहे. ती सहजासहजी झालेली नाही. रशियावरील निर्बंधांनंतर परिणामांची पर्वा न करता, भारताने सवलतीच्या दरात मिळणार्या तेलाची आयात करण्याची संधी साधली. त्याचे सोने केले. म्हणूनच भारत स्वतःची गरज पूर्ण करून युरोपची तेलाची तहान भागवू शकला आहे. तेल निर्यातदार भारत ही नवी ओळख नक्कीच कौतुकास्पद अशीच आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका येथे नुकतीच सहावी इंडियन ओशियन कॉन्फरन्स अर्थात हिंद महासागर परिषद संपन्न झाली. यावेळी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हेदेखील उपस्थित होते. त्यांनी या संमेलनाला संबोधित केले. यावेळी जयशंकर यांनी चीनसह पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले. चीनवर अप्रत्यक्ष हल्ला चढवत एस. जयशंकर यांनी सांगितले की, जेव्हा एखादे राष्ट्र कायदेशीर दायित्वांकडे दुर्लक्ष करते किंवा दीर्घकालीन सहकार्य करारांचे उल्लंघन करते, तेव्हा विश्वास कमी होत जातो. त्याचप्रमाणे दोन्ही राष्ट्रांना मोठ्या प्रमाणावर गंभीर नु
काँ‘ग्लोबल साऊथ’ म्हणविल्या जाणार्या गटातील एक महत्त्वाचा देश म्हणजे कोलंबिया. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेला वसलेला हा एक प्रमुख देश. या देशाची भूराजकीय, भूव्यापारीदृष्ट्या जागाही तितकीच मोक्याची. उत्तरेला कॅरेबियन समुद्र तर पश्चिमेला अथांग पसरलेला पॅसिफिक महासागर
अमेरिकेने भारताचे महत्त्व ओळखले असून, आशिया खंडात शांतता प्रस्थापित करायचे असेल, तर नव्या भारताला पर्याय नाही, हे तिने मान्य केले आहे म्हणूनच अमेरिकी निर्बंधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून भारत रशियाबरोबर व्यापारी संबंध कायम ठेवतो आणि त्याला विरोध केला जात नाही.
आंतरराष्ट्रीय सहकार्य जोपासण्यास जागतिक संघटनांना अपयश आले आले. परिणामी जगभरात सध्या अस्थैर्य निर्माण झाले आहे. मात्र, ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या धोरणाद्वारे जागतिक स्थैर्यासाठी जी२० च्या माध्यमातून काम करण्यास भारत सज्ज आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी केले आहे.
जगातील विविध देशांसोबतच्या व्यापार करारांबाबत भारताचा नवा दृष्टीकोन गुणवत्तेस महत्व देतो. त्यामुळे भारत – युरोपीय महासंघादरम्यानचा मुक्त व्यापार करार ऐतिहासिक ठरेल, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी केले. इंडिया युरोप बिझनेस अँड सस्टेनेबिलिटी कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना ते बोलत होते.
एस जयशंकर यांचं UNCUT भाषण
भारत श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेस बळकटी देण्यासाठी ऊर्जा, पर्यटन आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यास सज्ज आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी कोलंबो येथे केले.
"भारतमातेच्या सुपूत्रांसाठी 'पिटाई' या शब्दाचा वापर करणे कितपत योग्य आहे?", असा सवाल केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी राहुल गांधींना विचारला आहे. "तुम्ही आमच्यावर टीका करा चालेल. मात्र, भारतमातेच्या सुपूत्रांचा अवमान झाला नाही पाहिजे", अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींना खडेबोल सुनावले आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी चीनी सैनिकांनी तवांगमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैनिकांनी त्यांना हुसकावून लावले होते. याबद्दल प्रश्न उपस्थित करताना काँग्रेस नेत्यांमार्फत जवानांबद्द
भारतीय सैनिक यांगत्से येथे १३ हजार फूट उंचीवर तैनात राहून देशाचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांच्याविषयी 'पिटाई' असा शब्द वापरून त्यांचा अपमान करण्याऐवजी त्यांचा सन्मान करा, अशा शब्दात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षास सोमवारी लोकसभेत सुनावले.
“ओसामा बिन लादेन यास आपल्या देशात आश्रय देऊन त्यास पाळणार्यांनी भारताला शिकवू नये,” अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला सुनावले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या भारताच्या अध्यक्षतेखाली बोलाविलेल्या बैठकीमध्ये पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी जम्मू - काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. त्यास परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अतिशय सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर देऊन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पुन्हा एकदा पाकची लक्तरे वेशीवर टांगली.
पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी १९७१ साली बंगालीभाषकांसह हिंदूचा केलेला नरसंहार बिलावल भुट्टो यांनी आठवावा. त्याद्वारे अल्पसंख्यांकांविषयी पाकचे धोरण अद्यापही बदलले नसल्याचे दिसून आले आहे, अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाने पाकचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना सुनावले आहे.
पाकिस्तानने काश्मीर मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी कधीही सनदशीर, शांततामय मार्गाचा पुरस्कार केला नाही. त्यासाठी त्याने युद्ध आणि युद्धात मार खाल्ल्यानंतर दहशतवादाचा अवलंब केला. त्याच्या याच धोरणामुळे जम्मू-काश्मीर रक्तरंजित झाले, काश्मिरी नागरिकांबरोबरच सीमेवर तैनात भारतमातेचे सुपुत्र हुतात्मा झाले अन् दहशतवादी हल्ल्यांत सर्वसामान्य नागरिकही मृत्युमुखी पडले.
रशियाचे कच्चे तेल खरेदी न केल्यास त्याने होणारे नुकसान भारतालाच सहन करावे लागणार आणि ते सहन करण्याच्या परिस्थितीत भारत नाही. युक्रेननेदेखील रशियाने आमच्यावर युद्ध लादले, आमची सर्वप्रकारची हानी केली म्हणून त्याच्याकडून कच्चे तेल घेऊ नये, असे आवाहन भारताला केले. अर्थात, भारताने त्याकडे दुर्लक्षच केले आणि रशियाकडून तेलखरेदी सुरूच ठेवली.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी युएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान यांची दिल्लीत भेट घेतली. यादरम्यान, भारत आणि युएई त्यांच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला पुढे नेतील, असे जयशंकर यांनी ट्विट केले. युएईचे महामहिम शेख अब्दुल बिन झायेद यांचे भारतात स्वागत करणे, ही नेहमीच आनंदाची बाब आहे.
‘एनएमएफटी परिषदे’मध्ये ‘क्राऊड फंडिंग’ प्लॅटफॉर्म, ‘डार्क वेब’, दहशतवाद्यांना मिळणारे फंड आणि कायदेशीर आर्थिक कारवाया, देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण विशेषतः गुप्तहेर संघटनाच्या आर्थिक युनिटमध्ये माहितीची देवघेव, ‘हवाला रॅकेट’ हा मुख्य विषय चर्चिला गेला. या परिषदेतून भारताने जगातील अन्य देशांसह शाश्वत सहकार्य, दहशतवादविरोधी धोरणात सहकार्य, इंटरपोलला सहकार्य, संयुक्त राष्ट्राच्या दहशतवादविरोधी कमिटीला सहकार्य आणि भरीव मदत करणे, यावर भर दिला आहे.
युक्रेनसोबतच्या युद्धामुळे एकीकडे रशियावर युरोप आणि अमेरिकेने निर्बंध लादण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचवेळी जागतिक द्विपक्षीय व्यापारामध्येही अस्थिरता निर्माण झाली आहे. त्याचवेळी दुसरीकडे भारत हा रशियाचा मजबूत व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे, असे ‘एस अॅण्ड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स’च्या नव्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत सुषमा स्वराज आणि सध्याचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची धोरणे, संतुलित कृती आणि जागतिक हित, शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या हेतूंसाठी त्यांचे जगभरातून कौतुक होत आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या रशिया दौर्यानिमित्त भारताच्या बदललेल्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेणारा हा लेख...