मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पायी मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. २६ तारखेपासून मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करणार आहेत. दरम्यान, या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उच्च न्यायालयाने जरांगेंना आंदोलनाची परवानगी देऊ नये, अशा मागणीची याचिका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली असून न्यायालयाने जरांगेंना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
Read More
'PFI'वर बंदी; गुणरत्न सदावर्तेंनी घेतला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा समाचार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थान हल्लाप्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र त्याची मुदत आज संपत असल्यामुळे पोलिसांनी सदावर्तेंना पुन्हा न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती
शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर केलेल्या आंदोलन प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बल १०९ आंदोलकांना अटक केली असून त्यांना देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किल्ला कोर्टाच्या या निकालानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया देत तुम्ही पोलिस यंत्रणेचा गैरवापर करत आहात असा अरोप त्यांनी शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर केला आहे.
सटी विलनीकरणासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालावर २२ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या समितीचा अहवाल विरोधात गेल्यास एसटी कर्मचाऱ्यांकडून तीव्र आंदोलन केले जाणार अशी चर्चा आहे
मराठा समाजाच्या आरक्षणाची लढाई उच्च न्यायालयात जिंकल्यानंतर पुन्हा एकदा वैद्यकीय प्रवेशाबद्दल आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
मराठा आरक्षणासाठी राज्य मागास प्रवर्ग आयोगाने तयार केलेला अहवाल ‘जशाचा तसा’ सर्व याचिकाकर्त्यांना आणि प्रतिवाद्यांना देण्यात यावा. असे निर्देश उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले.
मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा वैजनाथ पाटील याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
या हल्ल्याविषयी प्रतिक्रिया देताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाला जाहीर केलेल्या १६ टक्के आरक्षणाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीसाठी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात हजर रहावे लागेल, असे निर्देश बुधवारी न्यायालयाने दिले आहेत.