परळ भोईवाडयातील ‘गवाण’ कुटुंबात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौराईचे पूजन मोठ्या उत्साहात पार झाले. त्यांच्या पारंपरिक ‘आगरी पद्धतीने’ हे गौरीपूजन झाले. या कुटुंबात गौरी पूजनाची परंपरा १५० वर्षे जुनी आहे. गवाण कुटुंबातील ही परंपरा त्यांच्या अनेक पिढ्यांनी जपून ठेवलेली आहे. मंगळवारी ‘गवाण’ कुटुंबात गौराईचे आगमन झाले.
Read More
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील बरे गावातून गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. या प्रजातीला घाटियाना द्विवर्णा असे नाव देण्यात आले आहे. या खेकड्याच्या अंगावर दोन प्रकारचे रंग असल्याने या खेकड्याला घाटियाना द्विवर्णा असे नाव देण्यात आले आहे. ठाकरे वाइल्डलाइफ फाऊंडेशन, भारतीय प्राणी सर्वेक्षण (पुणे) आणि कर्नाटक वन विभाग यांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनातून या खेकड्याची नोंद करण्यात आली आहे. या नवीन प्रजातींचे वर्णन करणारा संशोधन लेख ‘नौप्लियस’ या ब्राझिलियन क्रस्टेशियन स
खवय्यांची दुखरी नस म्हणजे मालवणी जेवण! त्यात कोंबडी वडे, सोलकढी, मटण, मासळी, खेकडा म्हणजे पर्वणीच... दुपारी किंवा रात्रीच्या जेवणाचा बेत गरमागरम भाकरी, कोळंबी मसाला आणि चिकन-वड्यांवर ताव मारण्याचे मुलुंड-ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे 'हॉटेल सिंधुदुर्ग-मालवणी मेजवानी'.