आशियातील सर्वात श्रीमंत बँकर अशी ओळख असणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेचे एमडी आणि सीईओ उदय कोटक यांनी परकीय गुंतवणूकदारांना साद घातली आहे. भारतात गुंतवणूक करण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय डिजिटल कंज्युमर सेगमेंटच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला हवी. कोरोना महामारीमुळे हेच क्षेत्र सर्वात जास्त शक्तीशाली बनत चालले आहे, असे ते म्हणाले.
Read More
पंजाब नॅशनल बँकने १ जुलैपासून बँक बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरात ०.५० टक्क्यांनी कपात केली आहे. आता या बँकेत बचत खात्यावर जास्तीत जास्त ३.२५ टक्के व्याज मिळेल. ५० लाखापर्यंत बँलेन्सवर ३ टक्के तर ५० लाखांवरील बॅलेन्सवर ३.२५ टक्के व्याज देण्यात येईल. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कोटक महिंद्रा बँकेनेही बचत खात्यांवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.