मुंबई पाठोपाठ महानगरातील शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावी तसेच झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावावा या उद्देशातून आता वसई-विरारमधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने वसई-विरार परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वसई-विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी जनजागृती करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
Read More
नारायण देसाई फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कथालेखन कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. रविवार १ डिसेंबर रोजी ‘वेल्फेअर सेंटर, आदर्श नगर, वरळी, मुंबई’ येथे या विनामूल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
नारायण देसाई फाउंडेशन तर्फे ‘कथालेखन कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले आहे. मराठी साहित्य व संस्कृतीचे संवर्धन व विकास करण्यासाठी तसेच नवलेखकांना/कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कलेच्या आस्वादाला वय, पैसा, प्रतिष्ठा यांचे बंधन नसते, कला केवळ जगणे समृद्ध करते. अशाच जगणे समृद्ध करणाऱ्या कलांची जोपासना करण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तर्फे ‘अभिरुची जोपासना कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे ही कार्यशाळा होणार आहे.
कोकणातील जैवविविधतेशी संबंधित असणार्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी ‘कोकण कलेक्टिव्ह’ या संकल्पनेअंतर्गत ‘कोकण डायलॉग’ ही कार्यशाळा दि. 13 जुलै रोजी पुण्यात पार पडली. या कार्यशाळेत झालेल्या चर्चेचा हा विस्तृत आढावा....
"कलेचे रसग्रहण करण्याच्या दृष्टीने केवळ कलाकारानेच नव्हे, तर रसिकांनीही रियाज करायला हवा.", असे मत सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार अंबरीश मिश्र यांनी व्यक्त केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित अभिरुची जोपासना कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार, दि. ५ जुलै रोजी अंबरीश मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक डॉ. जयंत कुलकर्णी आणि शास्त्रीय संगीताचे अभ्यासक प्रा. केशव परांजपे उपस्थित होते. (Abhiruchi Jopasna Karyashala RMP)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व शिवशंभु विचार मंच, कोंकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत 'शिवचरित्र अभ्यासवर्ग कार्यशाळा' आयोजित करण्यात आली आहे. रविवार, दि. २६ मे रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत रेड मॅजीक सभागृह, युरो स्कुल समोर, से-१९, ऐरोली याठिकाणी सदर कार्यशाळा संपन्न होईल. (Shivacharitra Abhasvarg Karyashala)
विश्व मराठी परिषद आयोजित नुवादकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा सुप्रसिद्ध अनुवादक लीना सोहोनी घेणार आहेत. दिनांक 22 ते 25 एप्रिल या कालावधीत ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. वेळ संध्याकाळी ८ ते ९ अशी एक तास असणार आहे. या कार्यशाळेत प्रश्नोत्तरासाईट अनुवाद प्रत्यकशिके करून दाखवली जाणार आहेत. या ४ दिवशीय कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना प्रत्येकाला अनुवादातून अनुसर्जनाकडे : साहित्यिक अनुवादाचे तंत्र आणि मंत्र हा संदर्भग्रंथ प्राप्त होणार आहे.
विविध कलांची जवळून ओळख करून घेण्यासाठी आणि आपले जगणे अधिक समृद्ध करण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने (Rambhau Mhalgi Prabodhini) तीन दिवसीय (१०, ११, १२ मे) 'अभिरूची जोपासना कार्यशाळा' आयोजित केली आहे. ही कार्यशाळा शुक्रवार, दि. १० मे रोजी सायं. ५ वा. ते रविवार, दि. १२ मे रोजी सायं. ५ वा. पर्यंत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, ज्ञान-नैपुण्य केंद्र, केशवसृष्टी, उत्तन, भाईंदर येथे होणार आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने विविध कलांची जवळून ओळख करून घेण्यासाठी आणि आपलं जगणं अधिक समृद्ध करण्यासाठी अभिरुची जोपासना कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
'रंगपीठ थिएटर-मुंबई'ने ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंदिर ट्रस्ट- मुंबई'च्या सहकार्याने तीन दिवस चालणार्या कार्यशाळेचे आयोजन 'श्री शिवाजी मंदिर' नाट्यगृह इमारतीतील 'राजर्षी शाहू सभागृह' येथे केले आहे. ही कार्यशाळा ८ ते १० सप्टेंबर या कालावधीत असून निशुल्क आहे. तेव्हा इच्छुकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. "अभिनयाची जादू" या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन 'राजर्षी शाहू सभागृह-दादर' येथे दिनांक ८ व ९ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० आणि रविवार १० सप्टेंबर रोजी सका
बारामती येथील कृषि विज्ञान केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्राने शेतकरी बांधवांची सध्याची अडचण दूर करण्यासाठी पॉलिहाऊसमध्ये बिगर हंगामी खरबूज या पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करण्यासाठी ‘हॅगींग’ खरबूज लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. भाजीपाला गुणवत्ता केंद्रात नेदरलँडच्या शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडक पॉलिहाऊसधारक शेतकऱ्यांसाठी 'मूल्य साखळी विकास कार्यशाळा' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
विश्व् मराठी परिषदेने फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान एकूण ५६ कार्यशाळांचे आयोजन केले आहे. काही कार्यशाळा मोफत उपलब्ध असणार आहेत. सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रँड निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या विश्व मराठी परिषदेतर्फे २१ फेब्रुवारी ते ११ ऑगस्ट,२०२३ या कालावधीत सर्व वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त अशा ५६ ऑनलाईन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी क्षमता आणि कौशल्ये विकसित करणाऱ्या या ५६ कार्यशाळांमध्ये अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रत्येक कार्यश
निराशाजनक व नकारात्मक वातावरणात कलाकारांचे मनोधैर्य राखणे गरजेचे : योगेश सोमण
पोलीसदलासाठी चारदिवसीय विनामूल्य ध्यानधारणा व आरोग्य कार्यशाळेचे आयोजन
आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) यांच्यासह सर्व चिकित्सापद्धतींना एकत्र आणण्याचा संकल्प घेऊन आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य’ या संमेलनाचा समारोपही रविवारी उत्साहात झाला.
संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीचा एक महत्वाचा भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय योग कार्यशाळा. या कार्यशाळेमध्ये भारतभरातून योग विषयातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शनासाठी उपस्थिती दर्शवणार आहेत. ही कार्यशाळा 'योग' या संकल्पनेबद्दल जाणून घेण्याची इच्छा असलेले आणि या उपक्रमाबद्दल फारशी माहिती नसलेले देखील या कार्यशाळेचा भाग होऊ शकतात
अखिल भारतीय हिंदू नाथपंथी समाज महासंघ व तांडा प्रकल्प ऊछढ संसाधन केंद्र (टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्त समाजातील ३०० कार्यकर्त्यांची एकदिवसीय ‘कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा’ दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडली. यावेळी महाराष्ट्रातून ३०० स्त्री-पुरुष, शिक्षित, अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.