ठाणे : केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारे दाखले व प्रमाणपत्रांकरिता ठाणे शहर भाजपाच्या ( BJP ) वतीने ठाण्यात शहरभर शिबिरे सुरू झाली आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी टपाल विभागाच्या माध्यमातून आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबीर, आदित्य बिर्ला आरोग्य विमा, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र आणि अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरे भरविण्यात आली आहेत. अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली.
Read More