भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषक २०२३ अंतिम सामना खेळविला जात आहे. कांगारूंना पहिला झटका बसला असून डेव्हिड वॉर्नर ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. मोहम्मद शामीने त्याला स्लीपमध्ये विराटकरवी झेलबाद केले. विराटने स्लीपमध्ये तितकाच उत्तम झेल घेतला.
Read More
अहमदाबादमध्ये गांधींजींचा वारसा जपणार्या साबरमती आश्रमाला वळसा घातला की पुढे वीस मिनिटांच्या अंतरावर नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियम लागते. जगातील सर्वाधिक अत्याधुनिक अशा या स्टेडियममध्ये भारताचे अकरा शिलेदार या वर्ल्डकपमधील आपला अकरावा आणि फायनलचा मुकाबला खेळायला मैदनात उतरले तेव्हा सव्वा लाख क्षमतेचे हे स्टेडियम उत्साहाने भारून गेल होते.
पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अकरमने सिकंदर बख्तच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला असून तो म्हणाला, नाणेफेक करताना कोणतेही विशिष्ट नियम नाहीत त्यामुळे बख्तच्या आरोपात काही तथ्य नसल्याचे अकरमने यावेळी म्हटले आहे. तसेच, वसीम अकरमने पुढे स्पष्ट केले की, तेथे ठेवलेली मॅट केवळ प्रायोजकत्वासाठी आहे, त्यामुळे अशा बिनबुडाच्या आरोपांनी सिकंदर बख्त यांनी लाज काढल्याचे अकरम यावेळी म्हणाले.
भारत आणि न्यूझीलंड सामन्यात भारताला मोठा धक्का बसला असून सलामीवीर शुभमन गिल रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले. गिलने भारतीय संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याने पावरप्लेमध्ये ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्या घातक गोलंदाजीला सडेतोड प्रत्युत्तर दिले. परंतु, गिल जरी आता मैदानाबाहेर असला तरी पुन्हा खेळण्यासाठी मैदानात उतरू शकतो.
न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात विराट कोहलीने नवा इतिहास रचला आहे. त्याने सचिन तेंडूलकरचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहलीने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात नवा इतिहास रचत सर्वाधिक वनडे शतकवीराचा बहुमान पटकाविला आहे.
न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात विराट कोहलीने नवा इतिहास रचला आहे. त्याने सचिन तेंडूलकरचा सर्वाधिक एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहलीने यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात नवा इतिहास रचत सर्वाधिक वनडे शतकवीराचा बहुमान पटकाविला आहे. त्याने ११३ चेंडूत ११७ धावा केल्या. यात २ षटकारांसह ९ चौकारांचा समावेश आहे.
झीलंडविरुध्दच्या सामन्यात श्रेयस अय्यरने वादळी खेळी करत शतक झळकावले. श्रेयस अय्यरने ६७ चेंडूत ८ षटकारांसह ३ चौकारच्या मदतीने वादळी शतक ठोकले. त्याने किवींच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढल्याचे पाहायला मिळाले, विराट कोहलीला उत्तम साथ देतानाच अय्यरने विराटच्या सोबत १६३ धावांची विक्रमी भागीदारीदेखील केली.
पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला असून बाबरसेनेचे या विश्वचषकात नवनवे ड्रामा समोर आले आहेत. दरम्यान, पाकिस्तान संघाला इंग्लंडविरुध्दच्या सामन्यात विजय मिळविता आला असता तर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला असता.
विश्वचषक २०२३ अंतर्गत श्रीलंकेची कामगिरी अतिशय सुमार अशीच राहिली. श्रीलंका क्रिकेट बोर्डावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, संघाच्या खराब कामगिरीचा परिणाम संपूर्ण बोर्डावर होतो असे क्वचितच घडते. आणि असाच काहीसा प्रकार श्रीलंकेत घडला आहे. वर्ल्डकपमधील लाजिरवाण्या कामगिरीमुळे श्रीलंकन संघावर निलंबनाची नामुष्की ओढावली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या रोमहर्षक लढतीत किवींचा पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८९ धावांचा पाठलाग करताना किवींकडून ९ बाद ३८३ धावांचा डोंगर उभारता आला. परिणामी, ५ धावांनी न्यूझीलंडला हा सामना गमवावा लागला. अॅडम झाम्पाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
विश्वचषक २०२३ मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना काल अहमदाबाद येथे खेळविण्यात आला. यासामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून विजय मिळविला. यासामन्यानंतर, माजी क्रिकेटपटूंमध्ये ट्विटर वॉर पाहायला मिळाले. भारताच्या विजयानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पाकच्या माजी क्रिकेटपटूंची शाळा घेतली.