महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) आर्थिक संकटात असलेल्या स्थितीत महाराष्ट्र सरकारने विविध घटकांना सवलत देत प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोठा निर्णय घेतला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सवलत मुल्याची रक्कम एसटी महामंडळाला सुपूर्त केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या सणात काहीसा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read More
भारताच्या गुरदित सिंह वोहरा यांची राष्ट्रकुल युवा परिषदेच्या (कॉमनवेल्थ युथ काऊंसिल) उपाध्यक्षपदी (पार्टनरशिप्स आणि रिसोर्सेस) नुकतीच निवड झाली आहे. भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. राष्ट्रकुल युवा परिषद ५६ देशांतील तरुणांचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. गुरदित सिंह वोहरा यांच्या निवडीमुळे भारताच्या युवा नेतृत्वाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. गुरदित सिंह वोहरा सध्या मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेत सदस्य आहेत आणि आयआयटी बॉम्बेचे ते माजी विद्यार्थी आहेत. Gurudit Singh Vohra
१ मे पासून अर्थतज्ज्ञ सुमन के. बेरी आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
पुण्यातील कोथरूडच्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वानथी श्रीनिवासन यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली.
कल्याण पश्चिमेला राहत असलेले आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादूरे यांचा त्यांच्या शेजाऱ्यांशी असलेला वाद पोलिस ठाण्यात पोहोचल्याने तो सोडविण्यासाठी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी काल सायंकाळी कल्याणमध्ये धाव घेतली.
‘लॉकडाऊन’ आणि कोरोना काळामध्ये गरीब, कामगार, रोजंदारीवर काम करणारे व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्या पाठीशी उभे राहत भाजप नगरसेविका उषा मुंडे यांनी आपली माणुसकी जपत अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, औषध वितरणासह व्यापक स्वरुपात मदतकार्य हाती घेतले. त्यांनी केलेल्या व्यापक मदतकार्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. तेव्हा, त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
‘लॉकडाऊन’च्या काळात गरीब, कामगार व मजूर वर्ग यांच्या मदतीला धावून जात भिवंडी महापालिकेतील भाजपचे विरोधी पक्षनेते नगरसेवक यशवंत टावरे यांनी माणुसकीच्या नात्याने प्रत्येक नागरिकाला अन्नधान्य, जेवण व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप भिवंडीसह आजूबाजूच्या गावांतदेखील केले. त्याचा अनेक गरजूंनी लाभ घेतला. तेव्हा, अशा या ‘कोविड योद्ध्या’च्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेणारा हा लेख...
जिथे आपली रक्ताची माणसेदेखील मदतीला येत नाहीत, अशा परिस्थितीत आपण घेतलेले सामाजिक कार्याचे व्रत निभावण्यासाठी डोंबिवली शहर मंडलाचे भाजप उपाध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे यांनी गरजूंना मदतीचा हात दिला. ‘कोविड’च्या महामारीत गरजूंच्या मदतीसाठी धाव घेणार्या म्हात्रे यांची पावलं आजही थांबलेली नाहीत. त्यांच्या ‘कोविड’काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
हरिष भांदिर्गे... तळागाळातल्या लोकांचा हक्काचा माणूस आणि नगरसेवक म्हणून परिसरात ओळख. मूळ पिंड समाजसेवकाचा असल्यामुळे कोरोनाच्या काळात हरिष भांदिर्गे स्वयंस्फूर्तीने लोकांच्या मदतीला खर्या अर्थाने रस्त्यावर उतरले. कुणालाही कुठच्याही प्रकारची मदत करण्यास ते आणि त्यांचे कार्यकर्ते २४ तास तत्पर होते. तेव्हा, त्यांनी या महामारीच्या काळात केलेल्या मदतकार्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग १७ चे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी कोरोनाकाळात मदतकार्य हाती घेतले. कोरोना व त्यामुळे आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे नोकरी-धंद्यावर परिणाम झाल्याने अनेक गरीब कुटुंबांची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. यावेळी त्यांनी उत्कर्ष कला क्रीडा मंडळ व स्वत:च्या मदतीसह लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली मदतही प्रभागात दिली. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
कोरोना व ‘लॉकडाऊन’काळात कामगार, गरीब, अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांच्या पाठीशी उभे राहत भाजप शहर उपाध्यक्ष व ‘शेखर चिंचवडे यूथ फाऊंडेशन’चे अध्यक्ष शेखर चिंचवडे यांनी माणुसकीच्या नात्याने अन्नदान, मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, औषध वितरणाची मदत प्रभागासह अन्य शहरांमध्येही ठिकठिकाणी केली. या मदतकार्यामुळे हजारो नागरिकांना अगदी आपत्कालीन स्थितीत दिलासा मिळाला. त्यांच्या ‘कोविड’ काळातील मदतकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची मागणी
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांच्याशिवाय ते अन्य विश्वस्तांशी राममंदिर बांधण्याबाबत चर्चा करू शकतात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सकाळी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धैर्यशील माने, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, माजी खासदार निवेदिता माने आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबईतून माजी खासदार किरीट सोमया यांचा समावेश
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई आणि धुळे एज्युकेशन सोसायटी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ व ३ फेब्रुवारी रोजी धुळे येथे अ. भा. सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानसभेचे उपाध्यक्ष पद शिवसेनेच्या पारड्यात पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. येत्या ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे.
येथील दिगंबर जैन मंदरि ट्रस्टतर्फे भगवान नेमीनाथ यांच्या वार्षिक महामस्तकाभिषेक तथा रथ महोत्सवाचे आयोजन २५ रोजी श्री दिगंबर जैन मंदिर परिरसर याठिकाणी करण्यात आले आहे. १९३५ पासून भगवान नेमीनाथ यांच्या भव्य रथ महोत्सवाचे आयोजन केले जात आहे