मुंबई : तमिळनाडू सरकारने केंद्र सरकारची ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना’ तमिळनाडूमध्ये लागू करण्यास लाल कंदील दाखवला आहे. केंद्र सरकारची ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना’ जातीच्या आधारावर भेदभाव करणारी असल्याचा ठपका तामिळनाडूतील स्टॅलिन ( Stalin ) सरकारने ठेवला आहे.
Read More
मुंबई : “विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार असून अनेकजणांना निकालाची उत्कंठा लागून राहिली आहे. त्यांना मी खात्रीशीरपणे सांगू इच्छितो, दि. २३ नोव्हेंबर रोजी मुंबईसह महाराष्ट्रावर भगवा फडकेल; महायुतीचे राज्य पुन्हा येईल; ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे,” असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी सोमवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी व्यक्त केला.
सन्मान, सामर्थ्य आणि समृद्धी ही विश्वकर्मा योजनेची मूळ भावना आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींची केले आहे. शुक्रवारी वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
स्वतःभोवती अखंड फिरत राहणारी ही पृथ्वी, ही सृजनदेवता सतत काही घडवत असते. त्यातूनच निर्माण होतात आकार, त्यांना प्राप्त होतं सगुणत्व आणि हा प्रवास शतकानुशतके चालूच राहतो. या विश्वाचा कर्ता करविता कोण?
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका विद्यार्थ्याने इंजिनीअरिंग कॉलेजच्या बस कंडक्टरवर हल्ला करत धारदार शस्त्राने गळा कापला आहे. लारेब हाशमी असे आरोपी विद्यार्थ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या विश्वकर्मा जयंती निमित्त "पंतप्रधान विश्वकर्मा" या नवीन योजनेचा शुभारंभ द्वारका येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर येथे करणार आहेत.
मोदी सरकारच्या विश्वकर्मा योजनेमुळे विकासापासून वंचित राहिलेल्या कारागिरांना, गावगाड्यातील बलुतेदारांना मोठा फायदा होणार आहे. ही योजना जाहीर करून मोदी सरकारने 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास '' ही घोषणा प्रत्यक्षात आणली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांनी केले आहे. या योजनेबद्दल वाघुले यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे.
तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी १६ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यात विश्वकर्मा योजना, सात बहुपदरी रेल्वेमार्ग प्रकल्प आणि ई-बस सेवा या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली आहे.
गुजरातमध्ये विधानसभा निवडणूकत भारतीय जनता पक्षाला न भूतो, न भविष्यती, असा विजय मिळाला आहे. भाजपला १८२ पैकी १५४ जागांवर यश मिळाले आहे. सोमवार, दि. १२ डिसेंबर रोजी गुजरात सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. ६२ वर्षीय भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. गांधीनगर सचिवालयाच्या हेलिपॅड मैदानावर दुपारी २ वाजता भूपेंद्र पटेल यांना राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.