शासन-प्रशासन स्तरावर विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्यामागचा मुख्य उद्देश हा रोजगार-स्वयंरोजगाराच्या संदर्भात पुरुष आणि महिलांमधील संख्यात्मक तफावत कमी व्हावी, त्याशिवाय गृहोद्योगांसह कुटिरोद्योगांसारख्या क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग असावा व त्याच जोडीला त्यांना आपल्या रोजगार वा छोटेखानी व्यवसायातून आर्थिक प्राप्ती व स्थिरता लाभावी, हे उद्देश पण होतेच. यातून महिलांचे व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास यांना बळकटी देण्याचा प्रयत्न केला गेला.
Read More
ऑल इंडिया प्लास्टिक मन्युफॅक्चरिंग असोसिएशन’च्यावतीने अंधेरी ‘एमआयडीसी’मधील अरविंद मेहता तंत्रज्ञान आणि उद्योजकता केंद्र येथे शैक्षणिक आणि रोजगार मेळावा शनिवार दि. 23 जुलै रोजी संपन्न झाला
जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह १४ जून २०२१ पासून सुरू झाला आहे. हे सप्ताहाचे दुसरे वर्ष असून जागतिक मराठी उद्योजकता दिवस साजरा करण्याचे तिसरे वर्ष आहे. मी मराठी व्यवसायिक एकीकरण समितीच्या फेसबुक पेजवर कार्यक्रम लाईव्ह बघता येणार आहे.
केंद्र सरकारने सुक्ष्म व लघू उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर सवलत, अनुदान आणि कमी व्याजदरात कर्ज आदींसह मेहनती उद्योजकांचा आता सन्मान करण्याचेही ठरवले आहे.
आपण काहीतरी नवीन उपक्रम सुरू केला, ज्यातून कितीतरी हातांना काम मिळाले, बाजारपेठेत पैसा खेळू लागला, त्या आपल्या कामाची दखल सरकारने घेतली आणि आपल्या कामाचा सन्मानही केला, ही भावना नवउद्योजकांत वाढीस लागेल. यातूनच आणखी कित्येकांना उद्योग-व्यवसायाच्या मार्गावर चालण्याची इच्छा होईल.