“घुसखोरांना संथाल परगणा येथून हुसकावून लावले नाही आणि ताबडतोब थांबवले नाही तर बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.", असा इशारा भाजपचे लोकसभा खासदार निशिकांत दुबे यांनी दिला आहे. मुर्शिदाबाद, मालदा, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, किशनगंज आणि अररियासह संथाल या सहा जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांनी ज्या प्रकारे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे ते चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Nishikant Dubey on Bangladeshi)
Read More
नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळाच्या सीबीएसई बोर्डाची शाळा क्रमांक- ९८ सारसोळे येथे अपुरे शिक्षण व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तत्काळ शिक्षक उपलब्ध करू द्यावे या मागणीसाठी माजी नगरसेवक तथा भाजप जिल्हा महामंत्री सुरज पाटील ये येत्या १५ जुन पासून पालिका मुख्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने सीबीएसई बोर्डाचे नर्सरी वर्ग चालविले जातात.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) येत्या २४ तासात मुंबईसाठी 'यलो' अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सूचित केले आहे. मुंबईत मंगळवारी दि. १६ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसह मध्य रेल्वेच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. तसेच शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.
युक्रेन-रशिया भारताने युद्धानंतर रशियाकडून कच्चे तेल आणि इतर वस्तू आयात करण्याच्या भूमिकेवर असलेल्या अमेरिकेच्या हस्तक्षेपावर तीव्र टीका केली आहे. अमेरिकेने मुंबई बंदर प्रशासनाला पत्र लिहून रशियावरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे मालवाहतूक करणाऱ्या रशियन जहाजांना भारतात येण्यास बंदी घालण्याची विनंती केली. परंतु, राष्ट्रीय हितासाठी जागतिक भागीदारांशी व्यवहार करणे हा भारताचा सार्वभौम अधिकार असल्याचे भारताने ठामपणे सांगितले.
हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दि. ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आले आहे.
रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पुढील दोन दिवस मंगळवार दि. ०५ आणि बुधवार दि. ६ रोजी अतिमुसळधार पावसाच्या इशारा देण्यात आला आहे. याबाबत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना आणि यंत्रांना संपूर्ण सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
“ ‘बीडीडी’ चाळीतील पोलिसांना ५० लाख रुपयांत घरे देण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. या निर्णयावर भाजपने सडकून टीका केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा पाच हजार भाजप कार्यकर्त्यांना घेऊन भाजप ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घुसल्याशिवाय राहणार नाही,” असा इशाराच भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
महाराष्ट्रसह ईतर देशांमध्ये "कोरोना"च संकट असताना राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता दीड वर्ष होऊनही अद्याप कोणतेही शाळा आणि कॅालेज सुरु झालेले नाहीत, यापूर्वी राज्य सरकारने शाळा सुरु करण्यासाठी अनेकदा निर्णय घेऊन ही शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास अपयशी ठरल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी खंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली
डोंबिवलीतील एकमेव सुतिकागृह मोडकळीस आल्याने सात वर्षापूर्वी बंद करण्यात आले आहे. पण अद्याप त्याठिकाणी नवीन इमारत उभी करण्यात आली नसल्याने गोर-गरीब गर्भवती महिलांना कळव्याच्या शासकीय रुग्णालयात पायपीट करीत जावे लागत आहे. सुतिकागृहाच्या पुर्नबांधणीच्या मुद्दयावर आता रिपाई आक्रमक झाली आहे. प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर पावले उचलावीत अन्यथा गरोदर महिलांना घेऊन आंदोलन करण्याचा इशारा रिपाई शहराध्यक्ष अकुंश गायकवाड यांनी दिला आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून जात असलेल्या राष्टीय महामार्गावर अवजड वाहने, महाविद्यालयीन बसेस व इतर वाहनांची रहदारी खूप आहे.