इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठले विचार आहे. याचे मला कधी कधी आश्चर्य वाटते, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली असून अनेकांकडून याला विरोध करण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली.
Read More
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची गाथा सांगणारा छावा हा चित्रपट नुकतंच काही दिवसांपूर्वी प्रदर्शीत झाला. विकी कौशल याच्या दमदार अभिनयाने नटलेल्या छावा या सिनेमाला लोकांनी डोक्यावर घेतलं. छावा हा सिनेमा विख्यात कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारित आहे. १९७९ साली पहिल्यांदाच छावा कादंबरी प्रकाशित झाली. अल्पावधीतच ही कादंबरी लोकप्रिय ठरली आणि आजतागयात या कादंबरीच्या २४ आवृत्तया प्रकाशित झाल्या आहेत. छावाच्या या यशानंतर देशातील कानाकोपऱ्यातून आणि अगदी जगभरातील वाचकांकडून या कादंबरीची मागणी केली
अमेरिका हा स्थलांतरितांचा देश असून, गेली अडीचशे वर्षे या देशात कोणत्याही एका भाषेला अधिकृत दर्जा देण्यात आला नव्हता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, आता इंग्रजीला अधिकृत भाषा घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाने राष्ट्रीय एकात्मता वाढेल, असे काहींचे मत असले तरी, भाषिक अल्पसंख्याकांसाठी हा मोठा धक्का ठरण्याची शक्यताही आहे.
दि. २१ डिसेंबर १९०९... नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये एका १८ वर्षांच्या कोवळ्या मुलाने एका जिल्हाधिकार्याचा वध केला. १८ वर्षे हे वय आहे का हो वध करण्याचे? पण, स्वातंत्र्यलक्ष्मीसाठी बलिदान देणारे लोक जन्माला येतात, तेच मुळी आपले स्वतःचे वेगळेपण घेऊनच! अनंत कान्हेरे आणि त्याचे साथीदार त्याच पठडीतले म्हणायला हवे. आजच्याच दिवशी १९१० रोजी त्यांना फाशी झाली. हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतीला वंदन...
बैल, घोडा, उंट, हत्ती, खेचर, गाढव यांपैकी कोणतंही वाहन न जोडलेली एक लोखंडी गाडी मुंबईहून धावत-धावत ठाण्याला गेली आणि परतसुद्धा आली. केवढा हा चमत्कार! १५ डब्बे आणि यात सुमारे ५०० माणसं बसलेली ही गाडी ओढायला बैल किंवा कोणतंच जनावर नाही? मग ती कशी ओढली जातेय? ती पाहा, वाफेचे सुस्कारे सोडत आणि शिट्यांच्या किंकाळ्या फोडत ती जी तीन इंजिनं धावतायत ना, ती खेचून नेतायत त्या डब्यांना.
काँग्रेसने शिक्षण व्यवस्था साम्यवादी लोकांच्या हातात दिली. परिणामी, संपूर्ण समाजाला एक ‘स्लो पॉयझनिंग’ सुरू झाले. त्याची पूर्वतयारी इंग्रजी राजवटीत केली गेली. हिंदू समाज आपल्या परंपरा, संस्कृती, मूल्यव्यवस्था, स्वत्व, स्वाभिमान, प्रेरणास्थाने, आदर्श विसरून जाऊन, सतत पाश्चिमात्य देशांच्या पद्धतीने विचार करू लागेल, याची तजवीज इंग्रजांनी तेव्हाच केली होती.
भारतीय संतसाहित्याचा आणि संस्कृती-धर्मशास्त्राचा व्यासंगी कार्यप्रवीण अभ्यासक असा लौकिक असणारे डॉ. प्रशांत धर्माधिकारी. त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
नुकतेच एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत न्याय व्यवस्थेतील स्थानिक भाषांना प्राधान्य देण्याचा मुद्दा अगदी प्रकर्षाने मांडला. तेव्हा, इंग्रजीऐवजी भारतीय भाषांचा न्याययंत्रणेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
आता नरेंद्र मोदींनी स्वतःच न्यायालयीन कामकाजात इंग्रजीपेक्षा मातृभाषा-स्थानिक भाषांच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या आवाहनानुसार उच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालय तसे कधी करतात आणि संसदेच्या माध्यमातून मोदी सरकार काय निर्णय घेते, याची प्रतीक्षा राहील.
भाषावर पुनर्रचनेत ‘एक भाषा-एक राज्य’ हे तत्त्व प्रामुख्याने होते. याचा अर्थ असा की, भारताला राष्ट्रभाषा असणार नाही. मात्र, सरकारची भाषा असेल. तशी ती भाषा ‘हिंदी’ ठरली आणि इंग्रजी भाषेला ‘जोड भाषा’ (लिंक लँग्वेज) हा दर्जा देण्यात आला. मात्र, तेव्हाच असे ठरले होते की, हळूहळू पण निश्चितपणे इंग्रजी हटवून हिंदीचे महत्त्व वाढवले जाईल. यासाठी १५ वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. हा कालावधी १९६५ मध्ये समाप्त झाला
स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणे यांचा कारभार मराठीतूनच झाला पाहिजे या काद्याला पाठींबा देताना या विधेयकावर बोलताना आमदार ॲड आशिष शेलार यांनी जनतेला मराठीतून कामकाज करण्याची सक्ति आणि अधिका-यांना इंग्रजीची मुभा असा दुजाभाव करणा-या तरतुदी असल्याकडे लक्षवेधत यामध्ये आमदार ॲड आशिष शेलार यांनी सुधारणा सुचविल्या
श्रीमद्रामायण आणि महाभारत हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. त्यांच्यामध्ये चित्रित अनेक प्रसंग आपल्यासमोर उत्तुंग जीवनाचे आदर्श उभे करतात. आजचे विद्यार्थी हे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत. ते सुसंस्कृत, स्वाभिमानी तसेच देशभक्त नागरिक बनावेत, यासाठी ‘संस्कृति संवर्धन प्रतिष्ठान’ सातत्याने प्रयत्न करते, त्याविषयी...
भारताच्या मुख्य भूमीपासून शेकडो मैल दूर, अगदी जिथे कुणालाही कळणार नाही, अशा अज्ञात ठिकाणी एका देहाला अखेरची घरघर लागली होती. शरीर तळमळत होते व तेजस्वी डोळे मिटू लागले होते...अखेर या दूर देशीच्या भयंकर कारागृहात या महान आत्म्याने ते शरीर सोडलेच एकदाचे! पण, हा आत्मा लौकिक अर्थाने अनंतात वगैरे विलीन होणार नव्हता. कारण, या आत्म्याने भयंकर प्रतिज्ञा केली होती- “मी मरून जाईन, पण या दुष्ट, चांडाळ, प्रजाभक्षक इंग्रजांना मेल्यानंतरही शांतता लाभू देणार नाही.” तेच खरे झाले. तो या महान आत्म्याच्या मुक्तीचा दिवस होता -
सध्या ३० कोटी भारतीय ‘पेटीएम’चा वापर आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी करतात, असा कंपनी दावा करते. २०१७ मध्ये ते भारतातील सर्वांत तरुण अब्जाधीश होते. ‘फोर्ब्ज’च्या मते, विजय शेखर यांची निव्वळ संपत्ती १७ हजार, ९६३ कोटी रुपये इतकी आहे.
भारताचा खरा इतिहास समोर येणे गरजेचे असल्याचे मत हिंदी अभिनेता अजय देवगणने व्यक्त केले
जगभर आज दि. १ जानेवारीला नवीन वर्ष सुरू होत आहे. या कालगणनेत दिवसाची सुरुवात मध्यरात्री होत असल्याने, नवीन वर्षाचे स्वागतही सहजच मध्यरात्री केले जाते. जगभर आतशबाजीने जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत होते. नवीन वर्ष १ जानेवारीला का सुरू होते? आता येणारे वर्ष ‘२०२१’ का आहे? याचं नाव कोणी ठरवलं? कधी ठरवलं? वाचूया एका कॅलेंडरच्या गोष्टीत.
स्वीडीश अॅकेडमीने या पुरस्काराची घोषणा केली
श्रीरामजन्मभूमीवरील ऐतिहासिक मंदिर पुनर्निर्माण कार्याचा येत्या ५ ऑगस्ट रोजी श्रावण कृष्ण द्वितीयेच्या दिवशी शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. ही घटना खरोखरच ऐतिहासिक आहे. भारताच्या विश्वगुरुपदाच्या वाटचालीत हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. तब्बल ४९२ वर्षांनी प्रभू श्रीराम त्यांच्या हक्काच्या ठिकाणी परत येत असल्याने दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, वैशाखी, रंगपंचमी, अक्षय्य तृतीया असे सगळे सण जर एकत्र केले, तर जसे असेल तसेच प्रचंड महत्त्व या श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाचे आहे.
१९२६ सालच्या फेब्रुवारी महिन्यातल्या एका उदासवाण्या दिवशी लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरलेल्या कृष्णकांत अत्रीला इंग्रजी भाषेचा गंधही नव्हता. तेव्हापासून आतापर्यंत ही वाटचाल स्वतः पंडित कृष्णकांतनाही आश्चर्यकारक, पण आनंददायी वाटते.
2८ जुलैला रात्री टिळक म्हणाले, “१८१८ साली असे झाले, परवा हे १९१८ साल आले - hundred years history, आम्ही असे दीन झालो. पेशवाई गेली आणि इंग्रज आले.” गोर्यांच्या जुलमी पारतंत्र्याचे हे शल्य टिळकांच्या हृदयात अत्यंत खोलवर रुतून बसले होते. अखेरच्या क्षणीही त्यांच्या मनाला खेद वाटत होता तो, या पारतंत्र्याचा. पण, यावर आपण मात करणार, असा दुर्दम्य आशावाद याच महापुरुषाने भारतीयांच्या मनात जागवला होता. २९ जुलैच्या रात्री १ वाजता एखाद्या व्याख्यानाच्या थाटात बोलावे तसे टिळक उसळले आणि म्हणाले, “माझी अशी खात्री आहे आणि
लोकशक्ती एकत्र करण्यासाठी मराठी भाषेची प्रचंड आवश्यकता टिळकांना जाणवत होती. इंग्रजी राज्यात आम्ही कुठली भाषा बोलावी यावर ब्रिटिशांचे राज्य नव्हते, तरीही आंग्लभभाषेच्या प्रभावाने आम्ही भाषिक पारतंत्र्यच भोगत होतो. म्हणून वाटेल त्या रीतीने देशी भाषांचे महत्त्व टिळकांनी आमच्या कानी कपाळी ओरडून सांगितले. वयाच्या पंचविशीत त्यांनी याच हेतूने मराठी वर्तमानपत्र काढले, देशी भाषेत शिक्षण देणार्या शाळा काढल्या आणि वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही टिळक म्हणत, “मला मिळालेले ज्ञान मराठी भाषेत मिळाले असते, देशी भाषेत मिळाले अ
डॉ. बालमुकुंद पांडेय यांनी गोरखपूर विश्वविद्यालयातून एम.ए व बी.एड केले. ‘महामना मदनमोहन मानवीय : व्यक्तित्व एवं विचार’ या विषयावर त्यांनी पी.एचडी केली आहे. २००७ पासून ते रा. स्व. संघाशी संबंधित अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे राष्ट्रीय संघटन सचिव आहेत. ‘कॉमनवेल्थ का निहितार्थ’, ‘विभाजन के गुनाहगार’, ‘प्राचीन भारत मे गोमांस : एक प्रवंचना’, ‘उपनिषिदीय शिक्षा पद्धती’, ‘रामचरित मानस मे महिला पात्र’ याविषयावरचे त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत त्यांनी ५० शोधनिबंध लिहिले आहेत. भारताचा खरा गौरवशाली इतिहास
क्वेट्टा ते कोचीन आणि कलकत्ता ते कराची अशी या उत्सवाची व्याप्ती वाढली, त्याला जबाबदार होते ते फक्त टिळक! आज टिळकांचा हा उत्सव जगभर पसरला असे आपण म्हणतो. पण, त्याचा प्रसार होण्याची सुरुवात तेव्हापासूनच झाली होती याचीही अनेक उदाहरणे सापडतात. अरबस्तानच्या टोकावर असेलल्या एडनपासून तर पूर्व आफ्रिकेतल्या नौरोबी शहरापर्यंत हा उत्सव त्याच काळात पोहोचला होता. कराची, लाहोर, रावळपिंडी आणि क्केट्टा याही शहरात पूर्वी गणेशोत्सव होत असे. टिळकांनी आपल्या संघटन कौशल्यावर त्याची व्याप्ती वाढवून गणेशोत्सव 'राष्ट्रीय' केला. मा
गणपतीचा उत्सव नव्या सार्वजनिक स्वरुपात पुन्हा एकदा लोकांसमोर आला, तेव्हा हिंदू-मुसलमान दंगे सुरू होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदू एकत्र येऊन जोमाने लढू लागले. पुढे पुढे या उत्सवातील जातीय समीकरणे बदलू लागली आणि उत्सव सर्वसमावेशक झाला. मेळे आणि पूजाअर्चा फक्त प्रकाशझोतात आली तर सुधारकांची टीका अधून-मधून कानी पडत असे. ती होऊ नये म्हणून टिळकांनी या उत्सवाला केवळ धार्मिक संस्कारापुरते मर्यादित न ठेवता, वेळोवेळी अधिकाधिक व्यापक करत नेले. त्यांचे ध्येय फार मोठे होते, त्यांना बर्याच गोष्टी साध्य करा
स्वातंत्र्यापूर्वी सुरू असलेली अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाची नीती पुढेही तशीच सुरू राहिली. त्यामुळे १५२८ पासून सुरू असलेल्या अयोध्येच्या श्रीरामजन्मस्थान मुक्तीच्या लढ्याला न्याय मिळू शकला नाही. १५२८ पासून सातत्याने श्रीरामजन्मभूमी मुक्तीचा संघर्ष अविरत सुरू होता. त्यात कुठेही खंड पडला नाही.
जगाच्या पाठीवर असेही काही देश आहेत, जिथे धर्माच्या नावावर माणसाच्या आजही कत्तली होत आहेत. त्या कत्तलींना वैश्विक साद-प्रतिसादही मिळत आहे. पण तरीही त्या कत्तली बंद होत नाहीत की, त्याबद्दलचे सत्य जगासमोर सर्व आयामांनुसार प्रकट होत नाही. त्यापैकीच एक देश येमेन.
मातृभाषेचे महत्त्व पटवून देताना इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे मूळ प्रवाहातून बाहेर पडणार्या मुलांना व गृहिणींना इंग्रजीचे धडे देत स्पर्धात्मक युगात आत्मविश्वास वाढविणार्या मीरा कोर्डे यांच्याविषयी...
उत्तर भारतीय राजकारणातील प्रमुख चेहरा असलेले महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एक निष्ठावान स्वयंसेवक म्हणूनही ओळखले जातात, त्यांच्याविषयी...
नवनवीन तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या शाओमीने खास गॅजेट बाजारात आणले आहे. नव्या गॅजेटद्वारे तुम्ही इंग्रजी भाषा शिकू शकता. 'शाओमी इंग्लिश टिचिंग' हे स्मार्ट असिस्टंटद्वारे कार्यान्वित केले जाते. या गॅजेटची स्क्रीन चार इंची असल्याने हाताळण्यास सुलभ आहे. यात ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज उपलब्ध आहे.
शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता ही देशाची ओळख असते. व्यक्ती -समाज-राष्ट्रनिर्मितीचा मार्ग हा शिक्षणातून जातो.
माणसाला लाभलेली कल्पनाशक्ती, हे एकूणच मानवी अस्तित्वाला लाभलेलं एक वरदान. ते मानवी अस्तित्वाचं एक शक्तिस्थळदेखील आहे. गरज आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालून माणसाने आजवरच्या इतिहासात स्वतःचं अफाट आणि अद्भुत असं विश्व निर्माण केलं. अगदी अग्नीचा शोध, चाकाचा शोध इथपासून ते आज स्मार्टफोन, इंटरनेट, खगोलशास्त्र, आरोग्याशी निगडित शोध आणि अशा असंख्य गोष्टी या सर्व याच गरज आणि कल्पनाशक्तीच्या मिलाफातून जन्मल्या. माणसाची ही वाटचाल अखंडपणे चालू असून अनेकविध क्षेत्रात नवनव्या प्रयोगांची मालिका आणि त्यातून नवं, अद्भुत अस
इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल असताना जळगावसारख्या ठिकाणी वातानुकूलित मराठी शाळा सुरू करणाऱ्या अॅड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या कार्याचा आज मराठी राजभाषा दिनानिमित्ताने घेतलेला हा विशेष आढावा....
मराठीच्या नावाने...
'भाई' या पु.ल. देशपांडेंच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचीच सर्वत्र चर्चा
सत्तेचा मोह, नेतेपदाचा गर्व आणि नोकरशाहीला हवं तसे झुकवण्याची काही काँग्रेसी नेत्यांची हुकूमशाही वृत्ती यांचे या पुस्तकात लेखकाने केलेले वर्णन मनस्वी चीड आणणारे आहे. त्यामुळे ‘हिंदू दहशतवादा’चा पर्दाफाश करणारे हे पुस्तक प्रत्येक हिंदू बांधवाने तर वाचलेच पाहिजे, शिवाय हिंदू धर्मावर टीका करणाऱ्यांची पुराव्यांसहित बोलती बंद करण्यासाठी या पुस्तकातील संदर्भ कामी येऊ शकतात.
आरव्हीएस मणी यांचे ‘दी मिथ ऑफ हिंदू टेरर’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झाले आहे. या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद लवकरच प्रकाशित होत आहे.
उत्तर आयर्लंड येथील आयरिश लेखिका अॅना बर्न्स यांना यावर्षीचा मानाचा असा ‘मॅन बुकर’ पुरस्कार मिळाला आहे.
डार्विनचे एक सुंदर वाक्य - “जे सबळ आहेत, ते अथवा जे सर्वाधिक बुद्धिमान आहेत, ते जिवंत राहतील असे नाही, तर जे बदलांना प्रतिसाद देत त्यांचा स्वीकार करतील तेच जिवंत राहतील.” याचा अर्थ काय, तर ग्राहकांनी आणि ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स दोघांनीही नवे बदल स्वीकारणे गरजेचे असून त्यामुळे हा पन्नास टक्क्यांचा मामला निस्तरू शकतो.