"सर्व धर्मांचा जो एक धर्म आहे, जो शाश्वत आहे, तो सनातन हिंदू धर्म आहे. जगाचाही तोच धर्म आहे, मात्र जग त्याला विसरले. या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य ज्या सेवाधर्माचे पालन करतात, तो सेवा धर्म म्हणजेच मानवधर्म." असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॅा. मोहनजी भागवत यांनी काढले. Sarsanghachalak on Sanatan Dharma
Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi Varanasi) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मंगळवार, दि. १४ मे रोजी दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह एनडीएचे विविध नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या बाजूला आणखी एक व्यक्ती बसली होती जी अर्ज भरताना शेवटपर्यंत मोदींसोबत होती. ती व्यक्ती कोण होती? हा प्रश्न निश्चितच प्रत्येकाला पडला असेल.
"स्वामी चिन्मयानंद (Swami Chinmayanand) हे आध्यात्मिक क्षेत्रातील क्रांतिकारक होते. स्वामीजींनी ज्ञानाची देवाणघेवाण करून आणि आत्मविश्वास निर्माण करून लोकांना सक्षम केले. जागतिक हिंदू संघटना स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी रामजन्मभूमी आंदोलनाला पाठिंबा दिला. हिंदू संघटना आणि रामजन्मभूमावरचे भव्य राममंदिर ही स्वामीजींची दोन महान स्वप्ने आज साकार झाली आहेत.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केले.
पैसा सर्व सुख, आनंदाचे कारण कधीच नव्हता आणि पुढेही असणार नाही. मात्र, मनुष्याच्या विवेकी बुद्धीत हैवान शिरला, तर काय विद्ध्वंस होतो याचा प्रत्यय गेल्या आठवड्यातील राज्यात घडलेल्या अन् अंगाचा थरकाप उडवणार्या घटनाची मालिकांमधून समोर आला. ठाणे जिल्ह्यात आई-वडिलांचा राग मनात ठेवून मुलाने वृद्ध मात्यापित्यांवर सुरीने हल्ला चढवला. त्यात वडिलांचा मृत्यू झाला, तर आई रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
आज २१ जून. आंतरराष्ट्रीय योग दिन. ‘युञ्जते इति योग:’ या विशेष लेखमालिकेतील आजच्या शेवटच्या भागात मानवाच्या शारीरिक, आध्यात्मिक विकासासासाठी ‘मानवतेसाठी योग’ या संकल्पनेचा केलेला हा सर्वांगीण उहापोह...
जिद्दीने शिक्षण पूर्ण करणार्या, विविध पुस्तकांचे संपादन करणार्या, संत साहित्यावर व्याख्याने देणार्या डोंबिवलीतील डॉ. धनश्री साने यांच्याविषयी जाणून घेऊया...
भाग्यनगर येथे आयोजित तीन दिवसीय समन्वय बैठकीच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ‘नाम’ या शब्दाला एक विशिष्ट स्थान आहे. ईश्वर किंवा सद्गुरुंचे नाम म्हणजे साक्षात एक कल्पवृक्ष होय. नाम म्हणजे एक श्रेष्ठ भवतारण नौका आहे. ‘नाम साधन पैं सोपे’ (नामसाधनेतील अध्यात्म आणि विज्ञान) हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. विशेष म्हणजे, या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच प.पू. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने झाले.
उद्या विजयादशमी. सामान्य जनतादेखील नानाविध दोष, दुर्गुणांवर आणि दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवत सत्कर्म, सद्गुणांच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त होते, ती विजयादशमी दिनी! आश्विन शुक्ल प्रतिपदा ते दशमीपर्यंतचे हे दहा दिवस म्हणजेच ‘दश + अहर्’! या दहा दिवशी आध्यात्मिक प्रगती व आत्मोन्नती यासाठी जागृत राहण्याचा प्रयत्न होतो.
महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाची घोषणा यांनी या हिवाळी अधिवेशना दरम्यान झाली होती. आता या कामाला गती मिळाली असून प्रकल्पाची स्वरूप निश्चिती, प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे, या कामांचा तपशील निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंतीदिन भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी ‘अटल गीता जयंती’ दिन साजरा करणार आहे.“स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनीच ‘गीता जयंती’ आल्याने, हा सुवर्णयोग आपण सर्वांनी साजरा करावा,” असे आवाहन भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे. या दिवशी ‘श्रीमद्भगवद्गीते’चे सामुदायिक पठण केले जाणार आहे.
एखाद्या श्रीमंत माणसाला विनवणी करावी आणि त्याने आपल्या हातांनी हजारो रूपयांची राशी प्रदान करावी, त्याप्रमाणे हा पिता देत नाही, तर त्याही पलीकडे जाऊन तो आपल्या याचकांच्या बुद्धीला सम्यक दिशा देतो. गायत्री मंत्रातही याचकरिता किती सुंदर कामना केली आहे- ‘धियो यो न: प्रचोदयात्।’ हे ईश्वरा! तू आम्हा जीवमात्रांच्या बुद्धितत्त्वांना सन्मार्ग दाखव, प्रेरणा दे.
गेल्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत सिद्धीविनायक युवा संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, क्रीडा या क्षेत्रात टिटवाळा तसेच मुरबाड, शहापूर, वासिंद, आंबिवली, कल्याण या भागात उल्लेखनीय कार्य केले आहे.
अनिल नाईक यांची कलाजगतात विशिष्ट ओळख आहे. ते सर जे. जे. स्कूलमध्ये विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले. जहांगिर कलादालनाच्या व्यवस्थापन समितीवरही ते सदस्य आहेत. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे अध्यक्षपदही त्यांनी डोळसपणे सांभाळले आहे. ‘एनजीएमए’च्या सल्लागार मंडळावरही ते सदस्य आहेत.
शिष्य जर अनधिकारी असेल, तर गुरूने केलेला उपदेश वाया जातो. सद्गुरूप्रमाणे शिष्यही सत्शिष्य असेल, तरच पारमार्थिक ज्ञान दिले-घेतले जाईल. गुरूच्या आत्मज्ञानाचा उपदेश पचनी पडण्यासाठी शिष्याने साधन सोडता उपयोगाचे नाही. या ज्ञानाच्या जोडीला ‘सदुपासना सत्कर्म। सत्क्रिया आणि स्वधर्म। सत्संग आणि नित्यनेम।’ हे शिष्याच्या ठिकाणी असतील, तरच आत्मज्ञानाची प्रचिती येईल, नाहीतर शिष्यवर्गात पाखंडीपणा येऊन ढोंगीपणा माजेल.
सामान्य माणसे या भोंदूगुरूच्या संभाषण चातुर्याला फसतात आणि त्याला आध्यात्मिक गुरू समजू लागतात. याची समर्थांना कल्पना होती. त्यामुळे सद्गुरूची लक्षणे सांगण्याअगोदर गुरू कसा नसावा, हे समर्थांनी स्पष्ट केले आहे.
देवाचा अनुभव किंवा आत्मसाक्षात्काराचा अनुभव हा अतींद्रिय असतो. देव हा काही पंचभूतात्मक पदार्थ नाही की ज्यासाठी खूप श्रम करावे लागतील. देव हा या विश्वाचा आधार आहे. त्याच्या सत्तेवर या विश्वाचे व्यापार चालतात. याचे ज्ञान होणे हे खऱ्या अर्थाने देवदर्शन आहे.
नर्मदेच्या पात्रामध्ये आणि तिच्या तीरावर हजारो ऋषी, साधू, साधक, संन्यासी अदृश्य रुपामध्ये अखंड तपश्चर्या करत आहेत. चर्मचक्षूंना ते दिसतातच असं नाही. ज्यांची अध्यात्मात प्रगती झाली आहे, अशा साधकांना ते दिसतात.
बोरिवली येथे सुरूअसलेल्या तीन दिवसीय हिंदू आध्यात्मिक सेवा प्रदर्शनात शनिवारी युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले