देशासह इराण अन् अनेक कट्टरपंथी देशांत स्त्रियांवर हिजाबसक्ती केली जात असताना अन् स्त्रियांकडून त्याला विरोध केला जात असताना यंदाच्या दसर्याला मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक ध्वज संचलनाप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी कालानुरूप व्यवस्थात्मक आणि सामाजिक बदल होण्याची गरज कशी आहे, हे विशद करताना स्त्रीशक्तीचा आदर आणि स्त्रीशक्तीचे समाजातील महत्त्व अधोरेखित केले.
Read More
जागतिक पातळीवरील खनिज तेल उत्पादकांची संघटना असलेल्या ओपेक या संघटनेने खनिज तेलाच्या उत्पादनात २० लाख बॅरल्सनी घट करण्यास परवानगी दिली. सध्या संपूर्ण जगात महागाई, लांबलेले रशिया - युक्रेन युद्ध यांमुळे आधीच आर्थिक संकंटांचे ढग गडद होत चालले असताना, त्यात खनिज तेलांच्या वाढत्या किंमतींची भर पडू नये अशी सर्वच प्रमुख अर्थव्यवस्थांची अपेक्षा होती. या सर्व अर्थव्यवस्थांच्या अपेक्षांच्या अगदी विपरीत निर्णय झाला आहे. ओपेक या खनिज तेल उत्पादक देशांच्या संघटनेने हा निर्णय घेतला आहे. ओपेक संघटनेने घेतलेल्या या निर्णय
भाजपप्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) आणि पाकिस्तानने निषेधाच्या प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. त्यासंदर्भात शर्मा यांच्यावर आणि अन्य भाजपप्रवक्ते नवीनकुमार जिंदाल यांच्यावर भाजपने कारवाईदेखील केली आहे.
कच्छच्या आखातामधून प्रथमच दुर्मीळ समुद्री गायीचे (डुगाॅंग) छायाचित्र टिपण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. भारतीय वन्यजीव संस्थानच्या (डब्लूआयआय) संशोधकांनी एरियल ड्रोनच्या माध्यमातून समुद्री गायीचे छायाचित्र टिपले.
भारत, इस्रायल आणि आखाती अरब देशांमधील संबंध परस्परांना पूरक आहेत. इस्रायलचे तंत्रज्ञान, आखाती देशांतील तेल, भांडवल आणि मुक्त व्यापारास पोषक वातावरण आणि भारतातील उत्पादनक्षमता, मनुष्यबळ, उद्योजकता आणि बाजारपेठ यातून तिन्ही देशांचाही फायदा होऊ शकतो. इस्रायली कंपन्यांची शस्त्रास्त्रं भारतात उत्पादित होऊन आखाती देशांच्या गरजा भागवू शकतात. या त्रिवेणी संगमाला ख्रिस्तीबहुल अमेरिकेचे पाठबळ मिळाले, तर संपूर्ण जगापुढील प्रश्न सोडवण्याची शक्ती त्यातून निर्माण होते.
भारत आखाती अरब राष्ट्रं, इजिप्त आणि इस्रायलच्या जवळ सरकताना दिसत आहे. याचा अर्थ आखाताच्या पलीकडच्या तीरावर असलेल्या देशांशी संबंध कमी करणे असा होत नाही. पण या गटासोबत आर्थिक, व्यापारी, लष्करी आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात अधिक संधी आहेत. यातील संरक्षण विषयक आव्हानं आणि संधींचा आढावा घेण्याच्या दृष्टीने जनरल नरावणे यांची भेट महत्त्वाची आहे.
सुमारे १३५ किमी लांब असा हा प्रकल्प आहे. तसेच, हा कालवा थायलंडचे आखात आणि अंदमान येथील समुद्र यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणार आहे. भारत या प्रकल्पाच्या शर्यतीत सहभागी झाला असल्याने याचा मोठा सामरिक फायदा येणार्या काळात भारताला होणार आहे. तसेच, यामुळे हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्रादरम्यानचे अंतरदेखील घटणार आहे.
आपल्या मूलतत्त्ववादी समजुती, प्रथा-परंपरा इतरांवर लादण्यासाठी त्यांनी त्या देशांतही धुडगूस घातला. मात्र, या सगळ्यांहून आणखी एक स्थलांतरितांचा वर्ग म्हणजे आखाती देशांत जाणारे नागरिक. जगभरातील अनेक लोक तेलसंपन्न आखाती देशांत जाऊन नोकरी, रोजगार मिळवतात, तिथेच राहतात आणि काही पैसा आपल्या मायदेशीही पाठवतात. असाच एक आखाती देश म्हणजे कुवेत.
आखाती देशातील भारतीयांना मायादेशामध्ये घेऊन येण्यासाठी नौदलाच्या १४ युद्धनौका सज्ज झाल्या आहेत
गुजरातमधील खाडीक्षेत्र गुन्हेगारी आणि राष्ट्रविरोधी कृत्यांमुळे असुरक्षित आहेत. उदाहरणार्थ गुजरातमध्ये, हरामी नाला प्रवाहक्षेत्र भारतात उगम पावून पाकिस्तानात प्रवेश करते. मग पुन्हा भारतात येते. त्यामुळे हे प्रवाहक्षेत्र घुसखोर व तस्करांच्या पसंतीचे झालेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणात पर्शियन आखाताकडे केवळ व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने पाहिले जात नाही. भारतीय नौदल आखातापासून हाकेच्या अंतरावर असून तेथे सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. गेल्या पाच वर्षांमध्ये आखातातील सर्व देशांशी भारताच्या सुधारलेल्या संबंधांमागचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
मागील लेखात आपण सागराच्या उदरात डुबकी मारून सागराच्या अंतरंगाची माहिती घेतली. या लेखात आपण जगातील काही सागर व महासागरांची ओळख करून घेणार आहोत.