अनिल शर्मा दिग्दर्शित गदर चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांना भूरळ पाडली आहे. गदर १ आणि गदर २ या दोन्ही चित्रपटातील सनी देओल यांच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे. दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर लवकरच गदर ३ येणार असेही सांगितले जात आहे. आणि या तिसऱ्या भागात नाना पाटेकर दिसणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच, नुकताच अनिल शर्मा दिग्दर्शित वनवास हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात अभिनेते नाना पाटेकर प्रमुख भूमिकेत होते.
Read More
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण या चित्रपटाची गेल्या अनेक काळापासून चर्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत असून दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने मासांहार सोडल्याच्या चर्चा सध्या सोशल मिडियावर रंगल्या आहेत. यावर आता साई पल्लवीनेच प्रतिक्रिया दिली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चित्रपटात नेमके कोणते कलाकार कोणती भूमिका सादर करणार यावरुन रंगणारी चर्चा आता पुर्णविरामापर्यंत आली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 'रामायण' या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका रणबीर कपूर, सीता मातेची भूमिका साई पल्लवी साकारणार यावर फार आधीच शिक्कामोर्तब झाला आहे.
हिंदी चित्रपटसृष्टी ६०-७० च्या दशकापासून गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाची ८५ वर्ष ओलांडली असली तरी त्यांचा उत्साह आजही कायम आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' या दोन चित्रपटांमध्ये विशेष भूमिका साकारली होती. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना आवर्जून भेट दिली होती. दरम्यान, आफल्या जीवनावर बायोपिक आल्यास त्यात कोणी भूमिका साकारावी असा प्रश्न विचारला असता धर्मेद्र यांनी एका कलाकाराचे नाव घ
आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत देशावर आधारित अनेक चित्रपट आले. पण त्यापैकी बॉर्डर हा चि६पट आजही आवर्जून पाहिला जातो. देशप्रेमाची भावना जागवणारा ९०च्या दशकातील अजरामर चित्रपट 'बॉर्डर'. १९९७ साली प्रदर्शित झाला होता.ज्यात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट होती. आता तब्बल २७ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकतीच 'बॉर्डर २'ची घोषणा करण्यात आली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत रामायणावर आधारित अनेक चित्रपट आले. आता पुन्हा एकदा २१व्या शतकात दिग्दर्शक नितेश तिवारी हिंदीतील दमदार कलाकारांची फळी घेऊन 'रामायण' हा चित्रपट साकारणार आहेत. अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामा यांच्या भूमिकेत, तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत झळकणार आहेत. तर रावणाची भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार यश साकारणार आहे. आता कैकयी, हनुमान आणि कुंभकर्ण यांच्या भूमिका कोण साकारणार याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.
या वर्षीचा सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेते सनी देओल बेपत्ता असल्याचे पोस्टर सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. पंजाबमध्ये सनी देओल यांचे बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावण्यात आले असून यात देओल यांना शोधून आणणाऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असेही यात नमुद केले आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट एकामागोमाग येत आहेत. यापैकी काही चित्रपटांना प्रतिसाद मिळत आहे तर काहींना प्रेक्षकांची नाराजी पत्करावी लागत आहे. परंतु, रामायण हा खरं तर प्रत्येकाच्या जीव्हाळ्याचा विषय आहे. याच विषयावर दिग्दर्शक नितेश तिवारी रामायण चित्रपट भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर ‘केजीएफ’स्टार यश हा ‘रावण’ रुपात दिसणार आहे. तर, सीता मातेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी दिसणार असून अभिनेता सनी देओल हनुमानाची
ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. चित्रपटाच्या पहिल्या भागाने अर्थात ‘गदर- एक प्रेमकथा’ या चित्रपटाने देखील २२ वर्षांपुर्वी इतिहास रचला होता. अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरघोस प्रेम केले. दरम्यान, सनी देओलची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘बॉर्डर’ या चित्रपटाचा देखील दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले जात आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष खरचं फार खास गेलं. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे अनेक चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाले. त्यात सनी देओल व अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘गदर २’ या चित्रपटाने तर इतिहास रचला. चित्रपटगृहांत दमदार कमाई करणारा हा चित्रपट आता ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.
अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडून नवा इतिहास रचला आहे. गदर: एक प्रेम कथा हा पहिल्या भागानेही बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. आणि आता त्याच पावलावर पाऊल ठेवत ‘गदर २’ चित्रपट भरघोस कमाई करत आहे. ११ ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ या चित्रपटाने आत्तापर्यंत ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे आता दिग्दर्शक अनिल शर्मा ‘गदर २’ चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवण्याची तयारी करत असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. दरम्यान, ‘गदर २’ची संपूर्ण टीम या चित्र
हिंदी चित्रपटसृष्टीसाठी ऑगस्ट महिना खऱ्या अर्थाने सुगीचा गेला असेच म्हणावे लागेल. ११ ऑगस्ट रोजी ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ हे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. एकीकडे अभिनेता सनी देओल तर दुसरीकडे अक्षय कुमार. दोन्ही अभिनेत्यांचा चाहता वर्ग हा मोठाच. परंतु यावेळी सनी देओलच्या ‘गदर २’ने बाजी मारली आणि बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ ज्यावेळेस प्रदर्शित झाले त्यानंतर मोठा विकेंड असल्यामुळे दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. त्यातही गदर २ चित्रपटाला तर प्रेक्षकांनी इतका प
मुंबई रविवारी लोन डिफॉल्टर म्हणून अभिनेते व खासदार सनी देओल यांच्या जुहूतील बंगल्यात जप्तीची नोटीस बँक ऑफ बडोदाने बजावली होती. ५६ कोटींचे थकीत कर्ज न चुकवल्याने ही कारवाई बँक करणार होती परंतु अचानक 'तांत्रिक 'अडचणींमुळे ही नोटीस मागे घेत असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. कर्जापैकी ५५.९९ कोटी रुपये थकीत असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडिया मध्ये प्रसिद्ध झाली होती. या कर्जासाठी अजय सिंह देओल उर्फ सनी देओल यांच्या कर्जासाठी स्वतः वडील धर्मेंद्र देओल हे हमीदार होते. सनी विला या बंगल्यासोबत सनी साऊंडस ही कंपनी दे
सध्या सनी देओल अभिनयित 'गदर २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच आता अभिनेता सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावामागचे कारण म्हणजे त्याने बँकेकडून घेतलेले कर्ज अद्याप दिलेले नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज फेडण्याकरिता मुंबईतील बंगल्याचा लिलाव करण्यात येणार आहे.
'गदर २' च्या तिकिट आणि पार्किगवरून पाटण्यातील एका सिनेमा हॉलबाहेर गदारोळ झाला. एवढेच नाही तर पार्किंगजवळ बॉम्बस्फोटही झाले. मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांनी दोन बॉम्ब फेकल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी एकाचा स्फोट झाला. तसेच सिनेमा हॉलची मालकीण सुमन सिन्हा यांनी दावा केला आहे की, ' हल्लेखोरांनी तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना धमकावले'.
अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या गदर २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. २०२३ या वर्षात कमालीची कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत गदर २ ने दपरा क्रमांक पटकावला आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आत्तापर्यंत २८४.६३ कोटींची कमाई करत केजीएफ २ आणि बाहुबली २ या दोन्ही चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.
बॉलीवूड चित्रपट गदर-२ बद्दल बोलल्यामुळे उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात एका तरुणावर हल्ला करण्यात आला. पीडित अमित गुप्ता यांनी तौफिक आणि युसूफ यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. घटनेदरम्यान आजूबाजूच्या लोकांनी हस्तक्षेप केला असता हल्लेखोर अमितला धमकावत पळून गेले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांच्या ‘गदर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणाऱा चित्रपट म्हणून मान मिळवला आहे. 'गदर २' या चित्रपटाने पाचव्या दिवशी ५५.४० कोटींची कमाई केली आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दोन हिंदी चित्रपटांचा सध्या बोलबाला सुरु आहे. ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘गदर – एक प्रेम कथा’ या चित्रपटाने २२ वर्षांपुर्वी इतिहास रचला होता. याच इतिहासाची पुनरावृत्ती ‘गदर २’ या चित्रपटाने केली असून केवळ ३ दिवसांतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
'गदर' हा चित्रपट २००१ साली आला आणि त्याने प्रेक्षकांची मने कायमस्वरुपासाठी जिंकून एक नवा विक्रम केला. तब्बल २३ वर्षांनी 'गदर' चित्रपटाचा दुसरा भाग 'गदर २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या या चित्रपटाचा दबदबा कायम आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याची चर्चा आणखीनच वाढली आहे. दरम्यान 'गदर २'चा 'रामायण' आणि 'महाभारत'शीही संबंध असल्याचे समोर आले आहे. याचा खुलासा खुद्द चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केला आहे.
मुंबई : 'गदर २' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २००१ साली आलेल्या 'गदर' या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात दाखविलेला हात पंप उखडल्याचा सीन प्रचंड गाजला होता. पण या दुसऱ्या भागामध्ये अभिनेता सनी देओलच्या हातात हात पंपाऐवजी बैलगाडीचे चाक असल्याचे दिसते आहे. तसेच या चित्रपटाचा एक डायलॉग जो सध्या प्रचंड गाजतोय तो म्हणजे "दामाद है वो पाकिस्तान का! उसे नारियल दो , टीका लगाओ , वरना इसबार वो दहेज में लाहौर ले जाएगा!" हा डायलॉग
सनीचे आई-वडील या अगोदरच भाजपात असून वडील धर्मेंद हे बिकानेरचे माजी खासदार असून आई हेमा मालिनी मथुराच्या खासदार आहेत.