क्रांतीज्योती महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित 'फुले' चित्रपटातील काही दृश्यांना सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावण्यात आली आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून शुक्रवार, ११ एप्रिल रोजी पुण्यातील फुले वाड्यासमोर आंदोलन करण्यात आले.
Read More
काहींचे औरंगप्रेम अद्यापही उफाळून बाहेर पडताना दिसतंय. अबू आझमींनी असे हिंदूविरोधी भूमिका घेऊन विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही; त्याचबरोबर त्यांच्या फळीतील आणखी काही नावे आहेत जी औरंग्या कसा उत्तम प्रशासक होता हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगण्याचा प्रयत्न ते करत असतात. Aurangapremi Abu Azmi and Team
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागले असून महायुतीच्या पारड्यात बहुमताचे दान जनतेने दिले आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तम कामगिरी करत महाराष्ट्राचे सत्तासोपान महायुतीच चढेल, हे निश्चित केले. असे असले तरी, या निवडणुकीत अनेक मातब्बरांना पराभवाची चवही चाखावी लागली आहे, तर अनेक पक्षांना स्वतःचे खातेही उघडता आलेले नाही. वंचित बहुजन आघाडीलादेखील ( VBA ) या विधानसभा निवडणुकीत फार करिष्मा दाखवता आलेला नाही. या विधानसभेसाठी २०० जागी उमेदवार उभे करूनदेखील वंचितच्या पारड्यात
वंचित बहुजन आघाडीला जास्त संख्याबळ मिळाले तर आम्ही सत्तेत राहण्याचा पर्याय निवडू, अशी घोषणा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर याबाबत एक सूचक पोस्ट केली आहे.
Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे येथे राज्य होते. आपण संभाजी महाराजांचा आदर करत पुणे शहराला छत्रपती संभाजीनगर असे नाव द्या, औरंगाबाद शहराचे नाव औरंगाबादच असू द्या अशी मागणी आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी केली. ते वाशिमच्या रिसोड शहरात विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत गोळे यांच्या प्रचारार्थ सभेसाठी आले असता त्यांनी प्रतिपादन केले.
राज्याचे ज्येष्ठ मंत्री शरद पवार यांचे अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला. मात्र आता हाच दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. त्यांनी १८ ऑक्टोबर रोजी प्रसारमाध्यमाशी संवाद साधत असताना प्रतिक्रिया केली आहे. ते म्हणाले की, शरद पवार १९८८-९१ मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी दुबई येथे जाऊन दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती, असे सांगण्यात आले.
मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालतात, हे स्पष्ट होईल, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागांबद्दलही भाष्य केले.
राज्यात सध्या सर्वच पक्षांमध्ये विधानसभेसाठी जागावाटप सुरु असताना आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणाला किती जागा मिळणार यावर त्यांनी भाष्य केले. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सरकारने जखमी पोलिस आधिकाऱ्याचा मेडिकल रिपोर्ट जाहीर करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांकडून बंदूक घेत गोळीबार केला. यात एक पोलिस अधिकारी जखमी झाला असून पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली.
विधानसभा निवडणूकीसाठी एकीकडे महायूती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप सुरु असताना आता वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत विधानसभेच्या ११ उमेदवारांची यादी जाहीर केली.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी होण्याची चर्चा सुरु आहे. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना, छत्रपती संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आणि बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष मिळून ही तिसरी आघाडी निर्माण होऊ शकते. दरम्यान, या आघाडीत प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगेंना घेण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे राजू शेट्टींनी म्हटले आहे. त्यांनाटीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा, अशा आशयाचे बॅनर वंचित बहुजन आघाडीकडून लावण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरु केली असून ते राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जात आहेत.
मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवारांचा माणूस आहे, यावर शिक्कामोर्तब होईल, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सध्या आरक्षण बचाओ यात्रा सुरु केली असून ते सोमवारी अकोला येथे बोलत होते.
मराठा आणि कुणबी हे दरोडेखोर आहेत का? असा सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना केला आहे. मराठा आणि कुणब्यांपासून सावध रहा, असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरेंवर टाडा लावून कारागृहात टाकले पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं. यावर प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खलनायक करुन त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीकडून राज्यात आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून चैत्यभूमीवरून या यात्रेला सुरुवात झाली आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये ही आरक्षण बचाव यात्रा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या सगेसोयऱ्यांच्या मागणीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जहरी टीका केली आहे. सगेसोयरे हे भेसळ आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, येत्या २५ जुलैपासून ओबीसी, एससी आणि एसटींच्या हक्कासाठी आरक्षण बचाओ यात्रा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
1982 साली केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दलितांसाठी हा शब्द वापरू नये, असे निवेदन दिले होते, याचा कदाचित काँग्रेसला विसर पडलेला आहे. 2010 साली सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पुन्हा नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली. पण, काँग्रेसने ‘हरिजन’ हा शब्द का वापरला? याचे एकच कारण असू शकते आणि ते म्हणजे अहंकार. काँग्रेससारख्या सापाने वेळोवेळी दलितांना आपले खरे विषारी दात दाखवले असल्याची टीका ‘वंचित बहुजन आघाडी’चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अकोला लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांचा अकोला पॅर्टन फेल ठरल्याची चर्चा मतदार संघात आहे. या मतदारसंघातून भाजपचे अनुप धोत्रे यांना एकूण 3 लाख 12 हजार 183 मत मिळाली. तसेच ते 9 हजार 734 मतांनी आघाडीवर आहेत. याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभय पाटील यांना 3 लाख 6 हजार 124 मत मिळाली असून 1 लाख 47 हजार 91 मतांनी ते पिछडीवर आहेत.
उद्धव ठाकरेंनी घाटकोपर दुर्घटनेची जबाबदारी स्विकारली पाहिजे. यात ब्लेमगेम करण्यात अर्थ नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घाटकोपरमधील रोड शोवरही टीका केली.
भाजपसोबत न जाण्याच्या अटीला संजय राऊतांनी नकार दिला आणि आम्ही आमचे दरवाजे बंद करणार नाहीत, असे ते म्हणाले, असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात ते बोलत होते.
उद्धव ठाकरे पुन्हा मोदींसोबत जाऊ शकतात, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच ते केवळ मुस्लिम मतांसांठी काँग्रेससोबत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
उज्वल निकम यांच्या उमेदवारीबाबत प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उज्वल निकम यांच्यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही. त्यांच्यामुळे लोकांना एक चॉईस मिळतो, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणूकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेच्या जागेचा प्रश्न सुटला असला तरी काँग्रेसमधील अंतर्गत वाद अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे. यातच काँग्रेस नेते विशाल पाटील सांगलीतून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशाल पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याची माहितीही पुढे आली आहे.
सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी मिळून ती जागा घेतली, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा उबाठा गटाकडे गेल्याने काही काँग्रेस नेते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली.
माझ्या नादी लागू नका. आम्ही कपडे फाडण्यात एक्स्पर्ट आहोत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिला आहे. विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला त्यांनी बुधवारी जोरदार प्रत्युत्तर दिले.
काँग्रेस पक्ष नेहमीच आंबेडकर परिवारावर अन्याय करतो, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तसेच यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरही भाष्य केले. त्यांनी रविवारी पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana patole ) यांनी पुन्हा प्रकाश आंबेडकरांना युती करण्याची साद घातली आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. आपल्याकडे अर्ज मागे घेण्यापर्यत वेळ आहे अस त्यांनी प्रकाश आंबेडकरांना उद्देशुन म्हटलं आहे. अकोल्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं.
लोकसभा निवडणूका तोंडावर असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना टोले यांच्यात खडाजंगी रंगलेली पाहायला मिळत आहे. या दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे.
प्रकाश आंबेडकरांना पाडण्यासाठी राऊत प्रयत्नशील! महाविकास आघाडीला सुरुंग लागल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी पहिल्यांदाच मविआतील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवले आहे. वंचित बहुजन आघाडीला मविआत घ्यावं यासाठी उद्धव ठाकरेंनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यासाठी शरद पवार यांचीही मनधरणी केली मात्र, संजय राऊतांमुळेच मविआतून वंचित आघाडी बाहेर पडली असल्याचा गौप्यस्फोट खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उमेदवार द्यावा यासाठी संजय राऊत प्रयत्नच करत होते, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.
उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी वंतिच बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना चार जागांचा ( 4 seats to Vanchit in MVA ) प्रस्ताव कायम आहे. असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा आजही कायम आहे. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला १२ जागांची मागणी केली होती. महाविकास आघाडीतील चारही पक्ष १२ १२ जागा लढवतील अशी त्यांची इच्छा होती.
प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी आम्ही जिंकू, असा विश्वास उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. सध्या वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. यातच आता संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडीसोबतच्या चर्चेची सर्व दारे बंद केली आहेत, असा घणाघात भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उबाठासोबतची युती तुटल्याचे जाहीर केले. यावर राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीसोबत सूर जुळत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे जवळपास निश्चित केले आहे. २८ मार्च रोजी प्रकाश आंबेडकर अकोला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मविआने त्यांना पाठविलेला चार जागांचा प्रस्ताव त्यांनी धुडकावला आहे.
महाविकास आघाडीने आम्हाला चार जागांचा प्रस्ताव दिलेला नाही, असा खुलासा वंचित बहुजन आघाजीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिल्याचे म्हटले होते. पण वंचितने हा दावा फेटाळून लावला आहे.
शिवसेना आणि वंचितची युती आता पुर्वीप्रमाणे राहिलेली नाही, असा खुलासा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीने आम्हाला चार जागांचा प्रस्ताव दिलेला नाही, असेही ते म्हणाले आहेत. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत चिन्ह काय असावे, यासंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीकडुन गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोड रोलर या चिन्हांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी आमचा प्रस्ताव मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहूजन आघाडीमध्ये बिनसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडी आणि वंचित बहूजन आघाडी यांच्यात समन्वय होताना दिसत नाही. यातच आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उबाठा आणि शरद पवार गटावरून उडाला असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना यासंदर्भात पत्रही लिहिले आहे.
महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जागावटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर मविआमध्ये वंचित राहणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शनिवारी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली असून जागावाटप निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
संजय राऊत माध्यमांसमोर खोटं बोलतात, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. लवकरच लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असून अद्याप महाविकास आघाडीतील जागावाटप पुर्ण झालेले नाही. यातच आता प्रकाश आंबेडकरांनी राऊतांवर हा आरोप केला आहे.
काँग्रेसमध्ये बरेच सुपारीबहाद्दुर आहे. या सुपारीबहाद्दुरांना आवरलं नाही तर निवडणुकीनंतर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते इचलकरंजी येथील सभेत बोलत होते.
सर्वांच्याच मनासारखं होत नसतं. प्रकाश आंबेडकरांनी हट्ट सोडावा, असा सल्ला उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना दिला आहे. बुधवारी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची बैठक पार पडली. मात्र, अजूनही जागावाटपाचा तिढा सुटला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना राऊतांनी हे वक्तव्य केले.
महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात बैठक सुरु असून यात काँग्रेसला दुय्यम स्थान दिले असल्याचे समोर आले आहे. काही जागांवर महाविकास आघाडीत मतभेद असून या बैठकीत हा तिढा सोडवणार आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेदेखील या बैठकीत सहभागी झाले आहेत.
महाविकास आघाडीसोबत अजून युती झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या बैठकीला जाऊ नका, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. माझ्या आदेशाशिवाय कुठल्याही बैठकीला जाऊ नका असेही ते म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीसोबत अजून वंचित बहुजन आघाडीची युती झालेली नाही. त्यामुळे माझ्या आदेशाशिवाय त्यांच्या बैठकीला जाऊ नका, असे आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. दरम्यान, त्यानंतर महाविकास आघाडीकडून सारवासारव करण्यात येत असल्याने त्यांच्यात काहीही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत गेली असली तरी त्यांच्यात काही आलबेल असल्याचे दिसत नाही. वंचित बहुजन आघाडीकडून सतत मविआवर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान, आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाजपमध्ये जाण्याचा सूचक इशारा दिला आहे. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झालेला नसून आता वंचित बहुजन आघाडीने मविआला पत्र पाठवले आहे. दोन दिवसांत जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर आणि उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी २२ फेब्रुवारी २०२४ रोजी उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना हे पत्र लिहिले आहे. तसेच रमेश चेन्नीथला, संजय राऊत, जयंत पाटील आणि नाना पटोले यांनादेखील हे पत्र पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.