केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी भाजपचे कल्याण शहर कार्यालय तोडले. त्यावर संतप्त झालेल्या भाजपने बाजारपेठ पोलिस ठाणे ते शिवाजी चौकार्पयत मोर्चा काढला. तसेच शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन केले. ज्या शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे त्यांना अटक करा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप पदाधिका:यांनी पोलिसांना दिला आहे.
Read More