महाराष्ट्रातील प्रत्येक उच्च संत अतिकठीण योगसाधना करीत असत. कुंभक प्राणायाम, योगनिद्रा व शवासन साधना पूर्ण झाल्यावर साधक श्वास विरहित अवस्थेत अनेक तास राहू शकतो. त्यामुळे आपल्या जड शरीराबाहेर येऊन स्वतःचे शव स्वतःच पाहू शकतो. ज्याप्रमाणे बर्फ विरघळल्यावर त्याचे रुपांतर पाण्यात होते. पाणी तापवल्यास त्याचे रुपांतर वाफ तयार होते. त्यात पुन्हा अणु-रेणू असतात. या पाण्याच्याच एकापेक्षा एक सूक्ष्म अवस्था आहेत. त्याचप्रकारे शास्त्रात आपली चार शरीरे सांगितली आहेत.
Read More
विद्या या विमुक्तये’ अशी विद्येची परिभाषा आहे. ज्यामुळे मुक्ती मिळेल ती विद्या होय. आसने, असल्या मुक्तीकरिताच असल्यामुळे त्याचे नाव वैदिक ऋषिमुनींनी ‘आसन’ असे ठेवले आहे. आसने अनेक प्रकारची आहेत. त्यापैकी कुंडलिनी जागृतीकरिता खालील आसने उपयोगाची आहेत.
आपल्या शरीरात अनेक पेशी असतात. त्यात वास्तव्य करणारे गुणाणू त्यांच्या मूळ रचनेला सोडून गुणपरिवर्तनाकरिता आवश्यक ती गुणाणुरचना करतात. यालाच ‘कुंडलिनी जागृती’ असे म्हटले आहे. कुंडलिनी जागृतीच्या असल्या गुणाणुबदलाचे ज्ञान होण्याकरिता आपल्याला लोखंडी तुकड्याचे चुंबकीकरण कसे केले जाते व ते होताना लोखंडी पट्टीत आतून काय फरक होतो, याचे विज्ञान पाहावे लागेल. कोणत्याही लोखंडात मुळचेच चुंबकत्व असते. त्यातील कणांच्या त्रिकोणीरचनेमुळे ते चुंबकत्व त्यात असूनसुद्धा बाहेर पडत नाही. चुंबकत्वाच्या प्रयोगात त्या लोखंडी तुक
पूर्वकालात धर्माच्या नावावर जेवढी युद्धे आणि त्यात जेवढा नरसंहार झाला, तसला अन्य कोणत्याही कारणाने झाला नसेल. वास्तविक परमेश्वराची प्राप्ती, त्यासाठी लागणारा मनाचा संयम आणि सामाजिक प्रेम याकरिताच सर्व धर्मांचे अवतरण झाले आहे, पण त्याच धर्माला मानवाने नरकाचे द्वार करून सोडले आहे. सुशिक्षित मानव आता धर्माकडे फारसा आकृष्ट होत नाही, याचे कारण त्या-त्या धर्मवचनातील फोलपणा व धर्माधिकार्यांचा द्वेषमूलक धर्मप्रचार होय. मन:स्वास्थ्याबरोबर शरीरस्वास्थ्यही प्राप्त व्हावे, असा प्रयत्न या शतकात होत आहे.