कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा कारागृहात आत्महत्या केली आहे. या प्रकरणात आरोपी विशाल याला अटक झाल्यापासूनच समाजातील सर्वच स्तरातून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात होती. परंतु आज विशालच्या आत्महत्येमुळे पिडीतेला नैसर्गिकरित्या न्याय मिळाला आहे असे म्हणत समाजाच्या विविध स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे . पिडीतेला न्याय मिळाला असला तरी कायद्याने त्याला फाशी झाली असती तर इतरांवर कायद्यांचा धाक राहिला असता असे सर्वच स्तरातून बोलले जात आहे
Read More
कुख्यात गुंड अरुण गवळी अरुण गवळी तुरुंगातुन कायमचा बाहेर येणार आहे. ( Arun Gawali released ) नागपुर खंडपीठाने अरुण गवळीची मुदतपुर्व सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. अरुण गवळीने न्यायालयाकडे २००६च्या शासन निर्णयानुसार सुटकेची मागणी केली होती. त्यावर कोर्टाने निकाल सुनावला आहे.
“25-30 वर्षांपूर्वी बँकिंग क्षेत्रात संगणकीकरणामुळे आमूलाग्र बदल झाले. त्यामुळे हे क्षेत्र कायमचे बदलले. तितकेच महत्त्वाचे बदल शिक्षण क्षेत्रामध्ये होत आहेत, त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा व शिक्षकांनी स्वतःला या बदलाला सामोरे जायला प्रशिक्षित करावे,” असे उद्गार डोंबिवलीच्या टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पावगी यांनी नुकतेच काढले. विद्याभारती कोकण प्रांतातर्फे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.