शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवार, दि. ५ मे रोजी मं
Read More
विलेपार्ले येथे असलेले ३५ वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर बुधवारी मुंबई महापालिकेकडून पाडण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण जैन समाज संतप्त झाला आहे. मंदिर पाडण्याच्या निषेधार्थ शनिवार, दि. १९ एप्रिल रोजी सकाळी निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अळवणी आणि जैन समाजाचे संत सहभागी झाले होते. पालिकेच्या कारवाईमुळे जैन समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. Vile Parle Jain Community Protest
Mangal Prabhat Lodha राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.या करारानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग येथील शिक्षण क्षेत्रातील तज्ञ शिष्टमंडळ दि.१६ ते २२ मार्च या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यादरम्यान ते विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. या भेटीदरम्यान राज्यात विविध संस्थांमध्ये सुरु असलेले कौशल्य प्रशिक्षण आणि जर्मनीत आव
Mangal Prabhat Lodha “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” या योजनेची विविध संलग्न महाविद्यालयांमधून वेगाने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्यातील विविध शासकीय विद्यापीठांसमवेत सामंजस्य करार करून संयुक्तपणे अंमलबजावणी कार्यवाही करण्यात येत आहे. यानंतर याच धर्तीवर राज्यातील इतर शासकीय विद्यापीठांसमवेत करार करण्यात येतील. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडिट पॉईंट करता येतील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून पालघर आयटीआयमध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) प्रशिक्षण देत आहे. नुकतेच २७ तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार मिळतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी व्यक्त केला.
ठाणे : ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि सिध्दार्थ ओवळेकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता न्यु हॉरिझन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅन्ड मॅनेजमेंट, आनंद नगर, ठाणे (प.) येथे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता रोजगार मेळावा ( Employment Fair in Thane ) आयोजित करण्यात आला आहे.
मुंबई : कौशल्य विकास विभागाच्या ( Skill Development Department ) बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने सुरू होणारा 'दक्ष' (डेव्हलपमेंट अंडर अपलाईड नॉलेज ॲण्ड स्कील्स फॉर हुमन डेव्हलपमेंट इन महाराष्ट्र) या प्रकल्पासाठी शासनाकडून गतीने कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा व मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी जागतिक बँकेच्या प्रतिनिधींना दिली.
कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘ नाविन्यतेच्या सशक्तीकरणातून महाराष्ट्राची प्रगती’ चे आयोजन करण्यात आले आहे
जगभरातील भारतीय ( India's Skills ) समुदाय देशाच्या आर्थिक विकासात सक्रियपणे योगदान देत आहेत. दिग्गज कंपन्यांमध्ये काम करणारे भारतीय असोत वा आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेले, या भारतीयांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे महत्त्व अधोरेखित करण्याचे काम अगदी नेमकेपणाने केले आहे.
मुंबई : राज्यांतील तरूणांमध्ये कौशल्य विकास करीत असताना, त्यांच्यामध्ये नाविन्यता विकासासाठी ठिकठिकाणी 'इनोव्हेशन हब' विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) यांनी शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी दिले.
सद्यस्थितीत विद्यार्थी-युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या जोडीलाच कौशल्य विषयक शिक्षण-प्रशिक्षण देणे त्यांना अधिकाधिक रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने तितकेच आवश्यक आहे. बदलता काळ आणि वाढत्या कौशल्यविषयक गरजा लक्षात घेऊनच खासगी-सार्वजनिक सहभागातून उद्योगांना कौशल्यप्राप्त उमेदवार वेळेत प्राप्त व्हावेत, या मोठ्या व व्यावहारिक उद्देशांसह मुंबई येथे ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स’ची स्थापना करण्यात आली आहे. त्याविषयी...
भारताकडे जगाची कौशल्याची राजधानी बनण्याची क्षमता असल्याचा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. भारतीय मनुष्यबळाकडे असलेले कौशल्य आणि त्यांच्या क्षमता या वेळोवेळी सिद्ध झाल्या आहेत. हे युवा मनुष्यबळ हीच भारताची ताकद असून, ती भारताच्या वृद्धीत मोलाची भूमिका बजावत आहे.
संघरचनेत काम करताना सगळ्यांनाच अनुभव येतो की, आपल्या कल्पनेतले आदर्श ( University ) हे संघ साहित्यातच सापडतात असे नाही, तर ते अनेक कार्यकर्त्यांच्या रूपाने सतत आपल्यासमवेत वावरत असतात. वर्तमान सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून कामात योग्य व्यावसायिक दृष्टी (Professional Aproach) विकसित केल्यास, सर्व गोष्टींना न्याय देता येतो. वेळेचे योग्य नियोजन, त्याचे काटेकोर पालन आणि त्याच्या योग्य नोंदीसह समीक्षा, याआधारे प्रभावी कार्य करणे कोणालाही शक्य आहे, याचे मी अनुभवलेल्या अनेक उदाहरणांपैकी एक प्रमुख उदाहरण म्हणजे
धारावी मुंबईच नव्हे तर राज्यातील विविध लघु उद्योगांचे केंद्र आहे. धारावीच्या या अरुंद आणि चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक युवक - युवती जगत आहे. अशावेळी अकस्मातपणे एखादी संधी येते आणि या संधीचे सोने होते. याच संघर्षातून पुढे जात धारावीतील पियुष लवंगरे याने डिलिव्हरी बॉयची नोकरी करत असताना आता धारावीमध्ये मोबाईल दुरुस्तीचा स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाला प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांचे नाव देण्यात येणार आहे. सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबद्दलची माहिती दिली.
देशात अधिकाधिक रोजगार निर्मिती करायची असेल, तर तरुणांमधील कौशल्य विकासाला चालना देणे क्रमप्राप्त. त्यादृष्टीने केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पताही विशेषत्वाने तरतूद केली आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणातही कौशल्य विकासाला चालना देण्यात आली आहे. त्यानिमित्ताने...
महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रेरणेने स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीमध्ये विदेशी भाषा प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात करण्यात आली. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रयत्नातून ७ मार्च २०२४ रोजी विद्या विहार येथे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती.
‘जन शिक्षण संस्थान रायगड’ची स्थापना सरकारच्या ‘सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट, १८६०’ च्या मार्गदर्शक तत्वानुसार झाली असून ‘जन शिक्षण संस्थान, रायगड’ ही संस्था कौशल्य विकास व उद्योेजकता मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत (पूर्वाश्रमीचे श्रमिक विद्यापीठ) यांच्यामार्फत व्यवसायाभिमुख शिक्षण प्रशिक्षण राबवित असते. या संस्थेच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान’ योजनेच्या धर्तीवर राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये येत्या ४ मार्चपासून कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियो सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे आगामी पाच वर्षात अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. मंत्रालय दालन येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियोसोबत झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर मंत्री लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगं
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तरुणांना नववर्षाची अनोखी भेट देऊ केली आहे. राज्यात १०० नवी कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्याची घोषणा त्यांनी सोमवार, १ जानेवारी रोजी केली. त्यामुळे कौशल्याधारित नवी पिढी घडण्यास मदत होणार आहे.
राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.१९ ऑक्टोबर रोजी दु.४ वाजता ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन झाले. “मन की बात” या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पनवेल येथील के.ए.भाटीया, फाल्गुन मार्ग, संत साईबाबा प्राथमिक शाळा, येथे कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, तसेच ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्य
“प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास आणि रोजगार उपलब्ध होईल,” असा विश्वास कौशल्यविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या ग्रामीण भागात तब्बल ५११ कौशल्यविकास केंद्रांची उभारणी करण्यात आली असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. याची माहिती मंत्री लोढा यांनी मंगळवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी प्रसारमाध्यमांना दिली.
प्रमोद महाजन ‘ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ ही संकल्पना राज्यातील तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणारी आहे. राज्यातील ५११ प्रमोद महाजन ‘ग्रामीण कौशल्य विकास केद्रां’चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे.
मुंबई : केंद्र व राज्य शासन, विविध आस्थापना व त्यांचे अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, महापालिका, तसेच खासगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडील मनुष्यबळाचे तिमाही विवरणपत्र येत्या ३० एप्रिलपर्यंत सादर करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या फडणवीस-शिंदे सरकारने बेरोजगारांसाठी रोजगारासह स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दिनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ४ वा. या कालावधीत कल्याणमधील बापसई येथील इंडाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन येथे आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रा
बालकांना शिक्षणासोबतच आवश्यक कौशल्य विकसित होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. मुंबई येथील चिल्ड्रन एड सोसायटीचे डोंगरी येथील निरीक्षण गृह व मानखुर्द येथील बालगृह येथे नव्याने सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या धर्तीवर राज्यातील बाल सुधारगृहांमध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणाचे केंद्र सुरू करणार आहोत.
बालकांना शिक्षणासोबतच आवश्यक कौशल्य विकसित होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. मुंबई येथील चिल्ड्रन एड सोसायटीचे डोंगरी येथील निरीक्षण गृह व मानखुर्द येथील बालगृह येथे नव्याने सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या धर्तीवर राज्यातील बाल सुधारगृहांमध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणाचे केंद्र सुरू करणार आहोत. त्याचबरोबर भव्यता फाऊंडेशनच्या सहकार्याने डोंगरी व मानखुर्द येथील मुलांना त्यांचा कल लक्षात घेवून मानखुर्द आणि डोंगरी येथील मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आ
राज्याच्या ग्रामीण भागातील अत्यल्प उत्पन्न असलेल्या तरूण-तरुणींना रोजगारासह कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासन आणि लाईटहाऊस कम्युनिटीज फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या या कराराप्रसंगी आयुक्त डॅा. रामास्वामी एन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, लाईटहाऊस कम्यूनिटीज फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी रूची
तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत सोमवार १० ऑक्टोबरपासून ते बुधवार १२ ऑक्टोबरदरम्यान स्टार्टअप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अशा विविध उपक्रमांमधून राज्यात स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढील काळात कौशल्य विकास प्रशिक्षण असेल तरच तरुणांना नोकऱ्या मिळतील. त्यामुळे शैक्षणिक संस्थानी कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करावेत. यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले
राष्ट्रीय उमेदवारी प्रशिक्षण योजनेमध्ये मूळ भर हा उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेला पूरक असे मूलभूत व रोजगारपूरक प्रशिक्षण देण्यावर आहे. याला योग्य प्रमाणात प्रात्यक्षिक-सरावांची जोड दिली आहे. मुख्यत: उमेदवारांना प्रशिक्षण काळात दिल्या जाणार्या मूलभूत प्रशिक्षणामुळे त्यांची रोजगार क्षमता वाढविण्यावर प्रात्यक्षिकांसह भर दिला जातो.
तरुणांच्या नवसंकल्पानांना चालना देण्यालाठी राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवार दि. १५ ऑगस्टला करण्यात आला.
आपण अनेक वेळा एखादी व्यक्ती किती ‘स्मार्ट’ आहे, याबद्दल बोलत असतो. अर्थात, ‘स्मार्ट’ असणे या संकल्पनेबद्दल अनेक लोकांचे विविध आणि गतिशील असे दृष्टिकोन आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे तर अप्रतिम सौंदर्यासारखेच ‘स्मार्ट’ असणे ही एखाद्याच्या नजरेत भरणारी गोष्ट आहे.
राज्यातील आयटीआयसह विविध तांत्रिक प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करणे, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी, कोरोनामुळे पती गमावल्याने विधवा झालेल्या महिला अशा वंचित घटकांना कौशल्य प्रशिक्षण देणे, आरोग्य क्षेत्रात स्टार्टअप्सना चालना देणे, दुर्गम भागात आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी स्टार्टअप्स विकसित करणे अशा विविध क्षेत्रात काम करण्याच्या अनुषंगाने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटीव्ह ट्रस्ट यांच्यामध्ये तसेच कौशल्य विभागाच्
नवी दिल्ली : “केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमध्ये १५ मंत्रालयांशी संबंधित ५३ प्रकल्प राबवित आहे. त्यामध्ये रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, कृषी, कौशल्य विकास इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश असून त्यासाठी ५८ हजार, ४७७ कोटी रूपये खर्च केला जात आहे.
आपल्या संस्कृतीत पुराणकाळापासून नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष‘ म्हणतात. या झाडाची एकही वस्तू वाया जात नाही. करवंटी तर अत्यंत उपयोगी असते. अशा या करवंटीपासून काय काय बनविता येईल, या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता कलाशिक्षक सुनील मोरे यांना काही अद्भुत विचारांनी ऊर्जा दिली.
बदलते अर्थतंत्र व व्यवसायातील आव्हानांवरही मात करता येते, ही बाब कोरोनाकाळात व त्यानंतरही प्रकर्षाने दिसून आल्याने परंपरागत कलाकारीसह कुटिरोद्योगाला मरण नाही ही बाब नव्याने अधोरेखित झाली आहे. बदलत्या काळानुरूप व नवे तंत्र आणि तंत्रज्ञान यांचा उपयोग करून नव कौशल्याचे अनुकरण ग्रामीण कारागिरांची नवी पिढी करू लागली आहे.
दत्ताेपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण आणि विकास बोर्ड क्षेत्रीय निर्देशालय मुंबई, (श्रम आणि रोजगार मंत्रलय, भारत सरकार) प्रादेशिक संचालनालय,मुंबई विभाग आणि सुजित महाजन व रु पाली महाजन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय महिला सक्षमीकरण व कौशल्य वर्ग प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. या शिबीराला महिलांकडून चांगला प्रतिसाद लाभला.
राज्याचे कौशल्य विकास व अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्स प्रकरणी अटक केली आहे.यानंतर यावर विरोधकांनी ,मलिक जवाब दो म्हणत नवाब यांच्या नाकी नऊ आणले व नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री म्हणून नवाब मलिक सध्या आहेत ,मात्र त्यांचा जावई वेगळच कौशल्य दाखवतोय अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे .
लघु व मध्यम उद्योग सुरू करणार्या उद्योजकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक साहाय्य, वितरण विषयक सहकार्य यासाठी ‘पीएम उम्मीद’ व या क्षेत्रातील कुशल व अनुभवी कामगारांना हेरून त्यांची नेमकी सांगड संबंधित उद्योग व उद्योजकांशी घालून देण्याचे हे दोन्ही उपक्रम विशेषतः कोरोनानंतरच्या परिस्थितीत लाभदायी ठरू शकतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विविध संघटनांच्या समन्वय बैठकीत निर्धार
ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
कोरोना-लॉकडाऊनच्या काळात कर्मचारी कौशल्याचा मुद्दा नव्या संदर्भ आणि स्वरूपात पुढे आला. याच दरम्यान देशपातळीवरील ‘आत्मनिर्भरते’च्या संदर्भात कर्मचारीविषयक नव-कौशल्यांचा मुद्दा पडताळून पाहणे आवश्यक व लक्षणीय ठरते.
३४ वर्षांनंतर आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात आले. या शैक्षणिक धोरणाचा केंद्रबिदू ठरला तो कौशल्यविकास. त्यामुळे या नवीन शैक्षणिक धोरणातील कौशल्यविकासाचे महत्त्व आणि त्यामुळे आगामी काळात तरुणांसाठी उपलब्ध होणार्या व्यवसाय-रोजगाराच्या संधी याचा आढावा घेणारा हा लेख...
वृक्षसंपदेचा बेकायदेशीरपणे र्हास करणार्या आरोपींच्या बेधडकपणे मुसक्या आवळणारी वन विभागाची ‘कौशल्या’ म्हणजे वनपरिक्षेत्र अधिकारी कौशल्या हनुमंत भोसले...
अभिनय कौशल्य, विनोदाचं अचूक टायमिंग, उत्तम संवादफेकीच्या जोरावर ज्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या, ते व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते विजू खोटे...
जिथे पेन विकलं, त्याच दादरसारख्या ठिकाणी त्याने ‘बिझनेस सेंटर’ उभारलं. ‘रंगकौशल्य बिझनेस सेंटर’चे संचालक रमेश मेश्राम यांची ही यथोगाथा जरा हटकेच आहे.
रशियातील कझान शहरात आयोजित ४५ व्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राच्या श्वेता रतनपुराने कांस्यपदक पटकाविले तर तुषार फडतरे आणि ओंकार गुरव यांनी उत्कृष्ट पदक पटकावली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एमएसएमई क्षेत्रात सातशे समुह स्थापन करण्याच्या योजनेची घोषणा केली.