बांगलादेशात पुन्हा एकदा इस्लामिक कट्टरपंथींचा उन्माद सुरु झाल्याचा दिसतोय. इस्लामिक धर्मगुरू मौलाना अब्दुल कुद्दुस फारुकी याचा एक भडकाऊ व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. कोलकात्यावर आत्मघातकी हल्ल्याची धमकी देताना ते या व्हिडिओतून दिसते आहे. फारुकी म्हणाला की जर बांगलादेश सैन्याने त्यांना आदेश दिला तर ते कोलकाता ताब्यात घेण्यासाठी लढाऊ विमानांचा वापर करणार नाहीत तर आत्मघाती हल्लेखोर पाठवतील. Bangladeshi Maulana Faruki Hated Speech
Read More
हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये केंद्रीय दल तैनात करण्याचे आदेश कलकत्ता उच्च न्यायालयाने दिले आहेत. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांचे प्रतिनिधित्व करणारे वकील अनिश मुखर्जी म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून, संपूर्ण पश्चिम बंगाल राज्यात, विशेषतः मुर्शिदाबाद जिल्ह्यात व्यापक हिंसाचार सुरू आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी केंद्रीय दल तैनात करणे आणि एनआयए चौकशीची विनंती करणारी जनहित याचिका दाखल केली होती.
Mamata Banerjee यांनी पश्चिम बंगालच्या स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्यासंबंधित नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशाचा अवमान केला आहे. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींना अवमाननासंदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहेय ही नोटीस वकील सिद्धार्थ दत्ताकडून स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जारी करण्यात आली आहे.
Ram Navami प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये रामनवमी (Ram Navami) शोभायात्रेत काही जिहाद्यांनी रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी दगडफेक केल्याचा दावा भाजपने केला. भाजपने दावा केला की, ते शोभायात्रेतून परतत असताना दगडफेक करण्यात आल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. संबंधित परिस्थिती लक्षात घेऊनही पोलिसांनी दावा फेटाळला आहे.
Ram Navami : प. बंगालची राजधानी कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठातील रामनवमी साजरी करण्यास नकार देण्यात आला आहे. विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना विद्यापिठाच्या आवारात राम नवमी साजरी करण्यास विरोध दर्शवला आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाने राम नवमी साजरी करण्यास परवानगी दिली नाही. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, आधी रमजानदरम्यान इफ्तार पार्टी करण्यास विद्यार्थ्यांना मुभा देण्यात आली होती. मात्र, राम नवमी साजरी करण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे राम नवमी उत्सव साजरा का करू दिला जात नाही? असा विद्यार्थ्यांनी प्रश्न
Ram Navami प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी ४ एप्रिल २०२५ रोजी कोलकातामधील उच्च न्यायालयाने अंजनी पुत्र सेना, या हिंदू संघनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची काही दिवसांपासून परवनगी देण्यास पोलिसांनी नकार दिला होता. त्यानंतर हावडा पोलिसांच्या एका अहवालानुसार, हावडा पोलिसांनी सुरूवातीला प्रस्तावित मार्गावर परवानगी नाकरलेली आहे. अंजनी पुत्र सेना या हिंदू संघटनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली.
Ram Navami प.बंगाल राज्यातील कोलकाता हावडा पोलिसांनी अंजनी पुत्र सेनेला राम नवमी (Ram Navami) साजरी करू दिली नाही. तर दुसरीकडे याच पोलिसांनी ईद दिवशी मिरवणुकीला परवानगी दिली होती. राम नवमी साजरी करताना त्यांना रस्त्यावरून मिरवणूक काढण्यास विरोध केला होता. २०२२ आणि २०२३ मध्ये जातीय हिंसा झाला होता, त्यामुळे गेल्या वर्षीही रॅली काढण्याची परवानगी देण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले होते.
IPL 2025 हा भारतीय क्रिकेट रसिकांसाठी एक मोठा सोहळा आहे. आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या १८ व्या हंगामाची सुरुवात २२ मार्च पासून सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दिवशी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरूदरम्यान पहिला सामना होणार आहे. तर २५ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार असल्याची माहिती समोर आली.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताजवळ न्यू टाउनमध्ये एका ई-रिक्षा चालकाने १४ वर्षांच्या शाळकरी विद्यार्थीनीवर अमानुष अत्याचार केले आहेत. त्याने मुलीचा गळा दाबत हत्या करण्यात आली. नंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार करण्यात आला. ती मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी ई-चालक सौमित्र रॉय यांना अटक केली आहे. आरोपींने सांगितले की, गुन्हा करण्याआधी त्याने मुलीला ई-ऑटेमध्ये सुमारे ३ तास फिरवण्यात आले.
कोलकाता इथल्या आर. जी. कर महाविद्यालय आणि रूग्णालयातील प्रशिक्षणार्थ डॉक्टर महिलेवर अत्याचार करणाऱ्या संजय रॉयला पश्चिम बंगालच्या सियालदह न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच बरोबर ५० हजार रूपयांचा दंड सुद्धा न्यायालयाने ठोठवला आहे. त्याच बरोबर नुकसान भरपाई पश्चिम बंगालच्या सरकारने पीडीत महिलेच्या कुटुंबियांना १७ लाख रूपये देण्याचा निर्णय दिला आहे.
Vishwa Hindu Parishad पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ४८ व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळाव्यात विश्व हिंदू परिषदेला पुस्तकांचा स्टॉल लावण्यासाठी विरोध केला आहे. विश्व हिंदू परिषदने स्टॉल लावण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र संबंधितांनी स्टॉल लावण्यास नकार दिला. शुक्रवारी १७ जानेवारी २०२५ रोजी कोलकाता उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली होती.
कोलकात्याच्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात ९ ऑगस्ट २०२४ रोजी एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचारामुळे देशात संतापाची लाट उसळली होती. १० ऑग्सट रोजी आरोपी संजय रॉयला अटक करण्यात आली होती. ८ ऑक्टोबर रोजी सीबीआयने या संदर्भात चार्जशीट दाखल केली. या संदर्भात पुढे आरजी कार महाविद्यालयाचे माजी प्रचार्य संदीप घोष यांना सुद्धा अटक केली होती. आर्थीक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक झाली होती. अशातच आता येत्या १८ जानेवारीला खटला न्यायालयात सुनावणी होणार असताना, पीडीतेच्या कुटूंबियांनी सर्वोच्च न्यायालयात
"भारत बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून नाही, पण जर आपण आपल्या देशातून बटाटे, कांदा, अंडी यांसह ९७ वस्तू बांगलादेशला पाठवणे बंद केले तर. तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. असे झाल्यास बांगलादेशातील जनताच हैराण होऊन युनूस सरकारची कातडी सोलतील.", असे म्हणत पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आमदार सुवेंदू अधिकारी यांनी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गुरुवारी कोलकाता येथील धर्मतल्ला परिसरात सनातनी समाजाने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
बांगलादेश मधील युनुस सराकारचा हिंदू विरोधी अजेंडा आता लपून राहिलेला नाही. या अजेंडाचा गंभीर परिणाम आता भारत - बांगलादेश संबंधांवर आणि त्याहून विशेष म्हणजे सीमाभागात राहणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होताना दिसतो आहे. बांगलादेशमध्ये वाढत्या भारतविरोधी आणि हिंदूविरोधी भावनांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी त्रिपुराहून पश्चिम बंगालला जाणाऱ्या बसवर हल्ला करण्यात आला.
Salim Matabbar एका बांगलादेशी नागरिकाला भारतात बेकायदेशीर बनावट ओळखपत्र बाळगल्याच्या आरोपाखाली कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. सलीम मातब्बर नावाचा कट्टरपंथी रवी शर्मा नावाचा वापर करत दोन वर्षांपासून भारतात वास्तव्यास होता. तो कोलकाता येथी मार्क्विस स्ट्रीट येथे एका हॉटेलात काम करत आपला उदरनिर्वाह करायचा.
: पश्चिम बंगाल मध्ये सध्या एका वेगळ्याच घोटाळ्याने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. विद्यार्थांना, उच्च शिक्षणासाठी देण्यात आलेल्या टॅबलेटच्या पैशांमध्ये फेरफार होत असून विद्यार्थांच्या बँक खात्याऐवजी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या संदर्भात कोलकाता पोलीस आणि विशेष तपास पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी तपास केला असून वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
1970 साली भारतात पहिली मेट्रो कोलकाता येथे धावली. आज मे 2024 सालच्या आकडेवारीनुसार भारतात तब्बल 902 किलोमीटरचे मेट्रोचे जाळे आहे. जे भारताला मेट्रो नेटवर्कच्या बाबतीत जागतिक पातळीवर पहिल्या पाच देशांच्या यादीमध्ये समाविष्ट करणारे आहे. आज जलदगतीने भारतातील मेट्राचा विस्तार पाहता, भारत भविष्यात जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असणारा देश ठरेल. त्यानिमित्ताने भारतातील जलदगतीने विस्तारणार्या मेट्रो रेल्वेच्या जाळ्याचा धावता आढावा घेणारा हा लेख...
RG Kar case रात्रपाळी करू नकोस हे तुम्ही महिलेला सांगू शकत नाही असे म्हणणाऱ्या प.बंगाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाने झापले आहे. सरकारी महिला डॉक्टरांना रात्री पाळी न ठेवण्याचे निर्देश देणाऱ्या अधिसूचनेवर, त्यांना सवलतीची नव्हे तर सुरक्षेची आवश्यकता आहे. याचपार्श्वभूमीवर कोलकाता आरजी कर वैद्यकीय प्रकरणात ९ ऑगस्ट रोजी डॉक्टरवरील बलात्काराप्रकरणी बंगाल सरकारने ही अधिसूचना जारी केली आहे.
आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयातील (R G Kar Medical College) बलात्कार प्रकरणी पीडित मृत मुलीच्या आई-वडिलांनी गोप्यस्फोट केला आहे. याप्रकरणात बुधवारी सांगितले की, कोलकाता पोलिसांनी डॉक्टरांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना लाच देण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या आई-वडिलांनी केला आहे. पैसे घेऊन हे प्रकरण लवकरात लवकर मिटवून टाकू असा दावा पीडितेच्या आई- वडिलांनी केला.
Howrah Rape Case आर जी कर प्रकरणामुळे देशातील वातावरण तापले आहे. अशातच आता हावडा येथील एका रूग्णालयात एका १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणीही नसून सीटी स्कॅन विभागात नुकताच कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याने हे कृत्य केले. ही घटना २८ ऑगस्ट रोजी संबंधित रूग्णालयात घडली. त्याच दिवशी हा संबंधित प्रकार उघडकीस आला होता
कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणाविरोधात आंदोलनकर्त्यांवर ममतादीदींनी पोलिसांना हाताशी घेऊन प्रचंड दडपशाहीच केली. पण, एवढ्यावरच न थांबता, त्यांनी ‘बंगाल पेटले, तर देश पेटेल, पंतप्रधानांची खुर्ची जाईल,’ अशा धमक्याही दिल्या. पण, त्यावरुन कडाडून टीका होताच ममतादीदींचा सूर पालटला. त्यामुळे आता दीदींची अशी ही नि‘र्ममता’ ना बंगाली जनता खपवून घेईल आणि ना केंद्र सरकार!
रत्नागिरीमध्ये एका २० वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित विद्यार्थीनी चंपक मैदानाजवळ बेशुद्ध आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असता तिच्यावर क्रूर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळत आहे. Ratnagiri Nurse Protest News
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) रविवारी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील जळगाव येथील लखपती दीदी कार्यक्रमात भाग घेत त्यांनी ११ लाख दीदींना प्रमाणपत्र दिली. या दरम्यान पंतप्रधानांनी या बचत गटांना ५ हजार कोटी रूपयांचे कर्ज जाहीर केले. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी बलात्काराच्या घटनांबद्दल त्यांनी दुख: ही व्यक्त केले आणि महिलांवरील गुन्हे अक्षम्य असल्याचे सांगितले आहे.
Kolkata Abhaya Case आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्कार – हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने ‘सुओ मोटो’ दखल घ्यावी, अशी विनंती करणारी पत्रयाचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना लिहिण्यात आली आहे.
Abhaya Rape Case कोलकता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरवर पाशवी अत्याचार करून तिची नृशंस हत्या केल्याच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचा बेमुदत संप सुरू असताना आता केमिस्टही रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारी सायंकाळी ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने खोपट कार्यालय येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
बांगलादेशात हिंदूंवर, मंदिरांवर होत असलेल्या हल्लांच्या निषेधार्थ कोलकाता येथील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू जागरण मंच आणि सकल हिंदू समाजाकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. सियालदह स्थानक परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सहभागी हिंदू बांधवांनी बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांबाबत आवाज उठवला. त्यानंतर बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर रास्ता रोको करून निदर्शने सुरू केली. हिंदूंच्या अत्याचारावर विचारवंत गप्प का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. (Hindu Protest in West Benga
बांगलादेशात उसळलेल्या हिंसाचारात इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून आतापर्यंत २०० हून अधिक जणांची हत्या करण्यात आली आहे. आरक्षणाविरोधात सुरु झालेले हे आंदोलन हिंसक वळणावर गेले असून बांगलादेशी हिंदूंना यात टार्गेट केले जात आहे. त्यात हिंदू महिलांवर अत्याचार, मंदिरांवरील हल्ले, लॅण्ड जिहाद अशा प्रकारच्या घटना याठिकाणी होत आहेत. बांगलादेशी हिंदू नरसंहारावर आता देश-विदेशातून निषेध व्यक्त होताना दिसत आहे. (bangladesh crisis update)
"राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी गेली अनेक वर्ष माझा संबंध आहे. बालपणापासून मी संघ स्वयंसेवक आहे. संघाने माझे चारित्र्य घडवले. आता पुन्हा संघासाठी काम करण्यास मी मोकळा झालो आहे."; असे म्हणत कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चित्त रंजन दाश यांनी रा.स्व.संघाचे आभार मानले आहेत. सोमवार, दि. २० मे रोजी कलकत्ता उच्च न्यायालयात चित्त रंजन दाश यांच्या निवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. (Chitta Ranjan Dash RSS)
कोलकातामध्ये क्रिकेट सुरु असताना पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवल्याने पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात सामना सुरु असताना ही घटना घडली आहे.
“औरंगजेब क्रूर नव्हता. त्याने ज्ञानव्यापी मंदिर उद्ध्वस्त केले नाही,” असा अजब दावा संबंधित मशीद कमिटीने केला आहे. आता ही मशिद समिती इतिहासकार आहे की समाजअभ्यासकी किंवा कायदेतज्ज्ञ की पुरातत्व विभागाशी संबंधित आहे? तर नाही. तरीसुद्धा ते ‘औरंगजेब हा क्रूर नव्हता’ हे सर्टिफिकेट का देत आहेत? आता काही लोक म्हणतात की, औरंगजेब क्रूर नव्हता. हे म्हणणार्यांचे पूर्वज तपासायला हवेत.
पश्चिम बंगालच्या हावडा आणि नॉर्थ दिनाजपुर जिल्ह्यात गुरुवारी विश्व हिंदू परिषदेतर्फे रामनवमीनिमित्त आयोजित रॅलीवर दगडफेक झाली. दोन गटांमध्ये झालेल्या या राड्यानंतर २४ तासात पुन्हा दगडफेक झाली.
रामनवमीच्या रथयात्रेवेळी महाराष्ट्र, गुजरातनंतर आता पश्चिम बंगालच्या हावडा भागात हिंसाचार झाला आहे. प्रशासानातर्फे हिंसाचार शमवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पुन्हा एकदा पुन्हा हिंसा उफाळून आली होती. शिवपूर पोलीस ठाण्यानजीक गुरुवारी हिंसाचार उफाळून आला होता.
भारतातील निवासी रिअल इस्टेट विक्रीने वार्षिक ५० टक्क्यांच्या वाढीसह २०२१ मधील पातळीला बरेच मागे टाकले आहे. २०२२ दरम्यान नवीन सादरीकरणांमध्ये प्रबळ वाढ झाली आणि कॅलेंडर वर्ष २०२२ दरम्यान ४,३१,५१० नवीन घरांच्या सादरीकरणासह वार्षिक १०१ टक्के वाढीची नोंद केली, असे देशातील अग्रगण्य ऑनलाइन रिअल इस्टेट ब्रोकरेज कंपनी प्रॉपटायगर डॉटकॉमच्या नवीन अहवालामध्ये म्हटले आहे.
भारतातल्या महत्वाच्या शहरांत २५ ऑक्टोबर रोजी दुपारी एक च्या सुमारास अचानक व्हाट्सअप मेसेंजर ठप्प झाले. आजच्या डिजिटल जगात आपण समाज माध्यमांवर अनेक गोष्टींसाठी अवलंबून आहोत. ईमेल सेवा वेळखाऊ असल्याने सहज व सोयीस्कर असलेले व्हाट्सअप अनेकदा एकमेकांशी संवाद करण्यासाठी वापरले जाते. काही तांत्रिक अडचणींमुळे व्हॉट्सप बंद झाल्याचे समजते.
जिहादी : पश्चिम बंगालमधील मोमीनपुरात धर्मांध इस्लामी बिगर इस्लामी समुदायाचा अनन्वित छळ करत आहेत. काही दिवसांपूर्वी या भागातील लोकांच्या घरावर व दुकानांवर इस्लामी झेंडे लावण्यात आले. परंतु ते काढल्याने येथील बिगर इस्लामी लोकांना लक्ष करण्यात आले. त्यानंतर एका महिलेने पुढे येऊन एका व्हिडीओद्वारे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली.
प्रेषित मुहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रविवारी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील बेथुआदहरी रेल्वे स्थानकावर जमावाने लोकल ट्रेनवर हल्ला केला.
सोळाव्या शतकापासून पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच आणि डच या सत्ता स्वतःच्या आरमाराच्या बळावर हिंदुस्थानावर स्वारी करून आल्या. त्यांनी कोलकाता, चेन्नई, गोवा, वेंगुर्ला, राजापूर, मुंबई, सुरत अशा विविध ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या. हे सर्व पाहून त्यावेळच्या सत्ताधीशांनी आरमार उभारण्याचा साधा विचारही केला नाही. आपले स्वतःचे आरमार असावे, असे त्यांना वाटले नाही. आपले समर्थ आरमार निर्माण करण्यासाठी कोणीही पुढे सरसावले नाही. अपवाद होता तो फक्त शिवरायांचा...
भारत आणि बांगलादेश दरम्यान धावणारी 'मिताली एक्सप्रेस' या ट्रेनचे वेळापत्रक रेल्वेने जाहीर केले असून, दोन्ही देशांमधली प्रवासी रेल्वे सेवा १ जूनपासून सुरु होणार आहे.
पश्चिम बंगाल मधील भारतीय जनता पार्टी युवा मंडल मोर्चाचे उपाध्यक्ष अर्जुन चौरसिया यांची शवविच्छेत्याची रिपोर्ट नुकताच जारी करण्यात आली आहे.
शारिक अहमद या तरुणाने एका हिंदू युवतीला इंडिगो एअरलाईन्स मध्ये नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने तिच्यावर बलात्कार करून तिला लुटल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या बीरभूम हिंसाचार प्रकरणी इथल्या विधानसभेत भाजप आमदारांकडून यासंदर्भात सोमवारी चर्चेची मागणी करण्यात आली होती. मात्र तृणमूल काँग्रेसच्या आमदारांकडून यास तीव्र विरोध दर्शवण्यात आला. आक्रमक भूमिका घेत हातापाई झाल्याचेही यावेळी दिसून आले. भाजप आमदार मनोज तिग्गा यांदरम्यान मारहाण झाली असून संभागृहात घडलेल्या प्रकरणादरम्यान उपस्थित सुरक्षा रक्षकांनीही आपल्यावर हल्ला केला असल्याचे भाजप आमदारांकडून सांगण्यात येत आहे.
पश्चिम बंगालमध्ये लसीकरण मोहिमेत सामील न झालेल्या सहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या आलेखाचा विचार करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.
बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या तपासासंदर्भात सीबीआय आणि विशेष तपास पथकाने (एसआयटी) कोलकाता उच्च न्यायालयात आणखी एक स्थिती अहवाल सादर केला आहे.
मदर टेरेसा यांच्याशी संलग्न 'मिशनरीज ऑफ चॅरिटी'च्या सर्व प्रकारची बँक खाती केंद्र सरकारने सील केली आहेत. नाताळनिमित्त केलेल्या कारवाईबद्दल ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
मुंबईत काँग्रेस पक्षाच्या मदतीने हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवणाऱ्या मुनव्वर फारुकीचा शो शनिवारी आयोजित करण्यात आला होता. राज्यातील सत्ताधारी 'महा विकास आघाडी' (एमव्हीए) आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसने 'भाषण मुक्तीसाठी' हे केले असल्याचे म्हटले आहे. मुनव्वर फारुकी यांचा मुंबईतील शो काँग्रेस पक्षाच्या एआयपीसीने आयोजित केला होता. जानेवारीमध्ये फारुखीचा कार्यक्रम कोलकातामध्ये होणार आहे.
"एप्रिल २०२२मध्ये बंगालमध्ये वैश्विक व्यापार संमेलनात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे.’’ सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बैठक दीड तास सुरू होती. तृणमुल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बनर्जीही या बैठकीला उपस्थित होते. अदानी यांनी ममतांचा भाचा आणि टीएमसीचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बनर्जी यांच्यासह सचिवालय गाठले होते. मुख्यमंत्र्यांसह त्यांची बैठक अडीच तास सुरू होती. ममता गुरुवारच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्याहून बैठकीला हजर राहिल्या होत्या. तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर आता ममतांनी राज्यात औद्योगिकरणावर भर दिला आहे.
अधिकारी यांना अटक करण्यापूर्वी अथवा त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
न्या. मंजुला चेल्लुर यांची एसआयटीच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
डॉ. मुखर्जी यांचा मृत्यू हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या षंडयंत्रामुळे झाली की कसे, याविषयी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारने स्पष्टीकरणे द्यावे, असेही याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी राज्य सरकारची आहे, निवडणूक आयोगाची नव्हे ही आणि अशी महत्वाची निरिक्षणे कोलकाता उच्च न्यायालयाने नोंदविली आहेत