बांगलादेशात सत्तापालट करून सत्तेत आलेले युनूस सरकार सातत्याने येथील अल्पसंख्याक नागरिकांवर दडपशाहीचे चक्र चालवत आहेत. इतकेच नव्हे तर, युनूस सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या 'अवामी लीग'ला जणू नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. अवामी लीगचे कार्यकर्ते आणि नेत्यांना अटक करण्यासाठी युनूस सरकारकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. 'ऑपरेशन डेव्हिल हंट' या नावाची ती मोहीम असून आतापर्यंत ४७९० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. यातील बहुतांश लोक अवामी लीग आणि तत्सम संघटनांशी संबंधित आहेत. Operation Devil Hunt B
Read More