Home

क्रिकेट सामन्यानंतरही रुमवर ऑफिसचं काम करतो..बहिणीने केला खुलासा!

भारत विरुध्द युएसए यांच्यात न्यूयॉर्क येथील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. दरम्यान, या सामन्यावेळी क्रिकेटप्रेमींच्या नजरा मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रावळकर याच्यावर खिळल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे टी-२० विश्वचषक स्पर्धेकरिता युएसए संघाचा एक भाग असलेल्या सौरभविषयी नवी माहिती समोर आली आहे...

जागतिक महिला दिनी सायन रुग्णालयात महिला करणार रक्तदान

जागतिक महिला दिन म्हटलं की महिलांमध्ये वेगळाच उत्साह असतो. ऑफिसमध्ये, सोसायटी मध्ये, महिला मंडळात,संस्थेमध्ये अथवा व्हाट्सएपच्या महिला ग्रुप मध्ये वेगवेगळ्या पार्टीचे अथवा मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. फक्त एन्जॉय, मज्जाच मज्जा याच उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते...

गोरेगाव येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयांतर्गत शेळीपालन कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय गोरेगाव येथील शैक्षणिक पशुधन प्रक्षेत्र येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२४ ते १९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत शेळीपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ३० पशुसखी उपस्थित होत्या...

२१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

दरवर्षी २१ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन हा (International Mother Language Day) isसाजरा केला जाणारा दिवस आहे. हा दिवस भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वैयक्तिक आणि सामुदायिक विकासासाठी मातृभाषेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे. ..

तिसऱ्या कसोटीत भारत सुस्थितीत; दुसऱ्या डावात ३२२ धावांची आघाडी

भारत व इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोट येथे खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १२६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दुसरा डावाचा खेळ सुरू झाल्यानंतर भारत २ बाद १९६ धावांसह सुस्थितीत आहे. तसेच, टीम इंडियाकडे ३२२ धावांची बहुमोल आघाडी घेत सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे...

येत्या रविवारी ठाण्यात दैवज्ञ समाजाचा कलाविष्कार सोहळा

ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दैवज्ञ कलाविष्कार सोहळा येत्या रविवारी दि. १८ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर ऑडीटोरीयम आयोजित करण्यात आला आहे, सदर सोहळ्यात कला, नृत्य व विविध पुरस्कारांचा समावेश आहे...

ठाण्यात माघी गणेशोत्सवात भक्ती आणि संस्कृतीचा संगम

ऐतिहासिक, सांस्कृतिक ठाणे शहराच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने भाजपच्या संदीप लेले यांनी ठाणे महोत्सव माघी जयंती गणेशोत्सव आयोजित केला आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परीसरातील कचराळी तलावानजीक कोकणातील प्राचीन मंदिराच्या भव्य देखाव्यात मंगळवारी बाप्पा विराजमान झाले.पेण येथील सुबक, देखणी सुमारे सहा फुटाची श्रीगणेशाची मूर्ती हे वैशिष्ट्य आहे. ..

राज्यस्तरीय जुडो स्पर्धेत मुंबईच्या आयुष फाळकेची चमकदार कामगिरी

महाराष्ट्र जुडो संघटनेतर्फे आयोजित केलेल्या व पुनीत बालन ग्रुप यांच्या सौजन्याने सुवर्ण महोत्सवी राज्य जुडो स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे 1 ते 5 फेब्रुवारी 2024 या दरम्यान नागपूर जुडो संघटनेच्या सहकार्याने करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले...

कामगार कबड्डी स्पर्धेत जे.एस.डब्लू.सलग पाचव्यांदा विजयी

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पुरुष ग्रामीण जेएसडब्लू डोलवी संघाने सलग पाचव्यांदा जेतेपद मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. तर पुरुष शहरी विभागात मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महिला खुला विभागात बँक ऑफ बडोदा अजिंक्य ठरले आहेत...

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भांडुप परिमंडळाची सरशी

महावितरणच्या वार्षिक आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ चे आयोजन छत्रपती संभाजी नगर येथे १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ दरम्यान करण्यात आले होते. सदर, स्पर्धेत महावितरणच्या सर्व १६ परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. या चार दिवसीय क्रीडा स्पर्धेत भांडुप परिमंडलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध खेळामध्ये यश मिळविले आहे...

कामगार कबड्डी स्पर्धेत न्यु इंडिया इन्शुरन्स, भारत पेट्रोलियम, अमरहिंद सरशी

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या दिवसाच्या साखळी सामन्यांत पुरुष शहर विभागातील लढतीत न्यु इंडिया इन्शुरन्स वि.रिझर्व्ह बँक यांच्यात अटीतटीची सामना झाला. पहिल्या डावात न्यू इंडियाने १८ - ०९ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात रिझर्व्ह बँकेने आक्रमक खेळ दाखवत न्यू इंडियाला नमवले २१-२८ गुणांसह नमवले. परंतु पहिल्या डावात घेतलेल्या ९ गुणांच्या आघाडीमुळे २ गुणांच्या फरकासह न्यु इंडिया विजयी झाली...

भारत विरुध्द इंग्लंड कसोटी सामना; इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी ३९९ धावांचे आव्हान दिले आहे. दुसरा कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड असून आणखी २ दिवसांचा खेळ बाकी आहे. ..

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत बँक ऑफ बडोदा, पी.डी.हिंदुजा, शिवशक्तीची विजयी सलामी

राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पहिल्या दिवशी साखळी सामन्यांमध्ये बँक ऑफ बडोदा, पी.डी.हिंदुजा, स्नेहविकास, शिवशक्ती या संघांनी विजयी सलामी दिली आहे. पुरुष शहर विभागात पी.डी.हिंदुजा वि. रुद्रा असोसिएट्स यांच्यात चुरशीची लढत झाली. ..

दिवसअखेर भारताकडे १७१ धावांची आघाडी; इंग्लंडच्या पहिला डावात २५३ धावा

भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहेत. भारताने पहिल्यांदा नाणेफेक जिंकत फंलदाजीचा निर्णय घेत ३९६ धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जयस्वालने द्विशतक झळकावून इतिहास रचला. तसेच, इंग्लंडकडून गोलंदाज अँडरसन, बशीर आणि अहमद यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात फक्त २५३ धावाच केल्या यात सर्वाधिक जॅक क्राव्हलीने ७८ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. ..

यशस्वी घोडदौड! दुहेरी शतक ठोकत मोडला गावस्कर-कांबळींचा रेकॉर्ड

भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहेत. भारताने प्रथम फंलदाजीचा निर्णय घेत डावाला सुरूवात केली. सलामीवीर यशस्वी जयस्वालने द्विशतक झळकावून इतिहास रचला आहे. त्याने द्विशतकी खेळी रचत विनोद कांबळी, सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला आहे...

चिमुकल्या कारागिरांच्या कलाकृतीचा अविष्कार

कोपरीतील श्री माँ बाल निकेतन शाळेत आयोजित केलेल्या ३६ व्या तेजस आंतरशालेय वार्षिक प्रदर्शनात चिमुकल्या कारागिरांच्या कलाकृतीचा अविष्कार पहावयास मिळाला. या प्रदर्शनाचे उ‌द्घाटन शुक्रवारी श्री माँ ट्रस्टचे विश्वस्त श्री माँ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे डायरेक्टर तथा चेअरमन व विश्वस श्री बालगोपाल यांच्या हस्ते करण्यात आले...

भारत विरुध्द इंग्लंड कसोटी सामना; सलामीवीर जयस्वालची नाबाद १७९ धावांची झुंजार खेळी

भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळविण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला...

गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्टच्या हितचिंतकपदी सत्यवान नर यांची नियुक्ती

'जीवन प्रबोधिनी ट्रस्ट', मुंबई चे संस्थापक सत्यवान अंबरनाथ नर यांची गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट जे. जे. हॉस्पिटल, मुंबई या संस्थेत संस्थेचे “ हितचिंतक " म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्ती पत्र धर्मशाळेचे विश्वस्त एकनाथ ठाकूर यांनी सत्यवान नर यांना दिले...

व्यंकटेश नागेश सामंत यांना 'केडीजीबी एक्सलन्स' पुरस्कार

कुडाळदेशस्त आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळाचा श्री रत्नाकर प्रभाकर तेंडोलकर ह्यांच्या समारंभ अध्यक्षतेखाली कुडाळदेशकर तथा सारस्वत समाज राज्यस्थरीय वधू वर मेळावा तथा गौरव सन्मान कार्यक्रम दि. २८ जानेवारी २०२४ रोजी मातृमंदिर गोरेगाव पूर्व मुंबई येथे पार पडला. ..

महापारेषण मुख्य अभियंता कादरी यांनी नोकरी करत मिळविली ईपीएसमध्ये पदव्युत्तर पदवी

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) चे मुख्य अभियंता (पारेषण) कादरी सय्यद नसीर यांनी इलेक्ट्रिकल पावर सिस्टम या विषयात पदव्युत्तर पदवी एम ई (ईपीएस) छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून प्राप्त केली. ..

धक्कादायक! तेंडुलकरचा डीप फेक व्हीडिओ व्हायरल!, सचिन म्हणाला, "हे प्रकरण..."

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सचिन तेंडूलकरचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पुन्हा एकदा प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रश्चचिन्ह निर्माण झाला आहे. सचिनने यासंदर्भात "X"वर पोस्ट करत डीपफेकचा गैरवापर थांबवता यावा यासाठी ठोस भूमिका घेणे खूप महत्त्वाचे आहे, असे म्हटले आहे. ..

पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झाले लक्षद्वीप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप हे इंटरनेटवर सर्वाधिक सर्च करण्यात आले. भारतीय ट्रॅव्हल्स कंपन्यांनादेखील लक्षद्वीपबाबत विचारणा करण्यात आली आहे. भारतीय पर्यटकांनी लक्षद्वीपला भेट देण्यासाठी पहिली पसंती दर्शवली आहे. तसेच, भारतीयांनी मालदीव येथे पर्यटनाला जाण्यासाठी काढलेली तिकीटेदेखील यादरम्यान रद्द केल्याचे पाहायला मिळाले होते. ..

राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्नसह अर्जुन पुरस्कार दिग्गजांना प्रदान

क्रीडा क्षेत्रातील यंदाचे खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती भवनात औपचारिक समारंभात प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. क्रिकेटपटू मोहम्मद शामी आणि अॅथलेट पारूल चौधरी यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे...

अभ्युदय सहकारी बँकेकडून ठेवीधारकांना मार्गदर्शन

अभ्युदय सहकारी बँकेच्या विक्रोळी कन्नमावर नगर येथील शाखेतर्फे ठेवीधारकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनाच्या माध्यमातूनस विक्रोळीतील सर्व कॉ. ऑप. हौसिंग सोसायट्याना डिपॉसिट एकत्रिकरण करण्याकरिता व 'अभ्युदय ५०० आणि अभ्युदय २०० डिपॉझिट स्कीम'करिता मार्गदर्शन करण्यात आले...

पुण्यात वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात!

स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी दिनानिमित्त हर घर सावरकर समिती, विवेक व्यासपीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने दि.६ आणि ७ जानेवारी रोजी वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कार्यशाळेची सुरुवात सर्व प्रशिक्षणार्थींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन केली...

विषारी द्रव्यांपासून वाचविण्यासाठी शरीरशुध्दीचे ६ प्रभावी उपाय : पोषणतज्ञ शेरिल सॅलिस

सणासुदीच्या काळात अनियंत्रित आहार केंद्रस्थानी असतो आणि या करिता नर्चर हेल्थ सोल्युशन्स च्या संस्थापिका व सफोला न्युट्रिशन पार्टनर (सफोला पोषण भागिदार), नोंदणीकृत आहार तज्ञ शेरिल सॅलिस, प्रत्यक्षात करण्याजोगे आणि सहजपणे अनुसरण करता येणारे उपाय सुचवतात जे तुम्हाला सणानंतर विषारी द्रव्यांपासून शरीरशुध्दी करण्यात मदत करू शकतात. ..

महापारेषणच्या वार्षिक दैनंदिनी व दिनदर्शिका-२०२४ चे थाटात प्रकाशन

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वार्षिक दैनंदिनी, प्लॅनर व दिनदर्शिका-२०२४ चे प्रकाशन महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते झाले...

एकविसाव्या शतकात पुस्तक महोत्सवसारखे उपक्रम महत्वाचे : मंत्री सुधीर मुनगंटीवार

एकविसाव्या शतकात डिजिटल माध्यमांचा प्रसार वेगाने होत असताना नव्या पिढीत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सवासारखे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नॅशनल बुक ट्रस्टच्या सहकार्याने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली...

भाजप नेते अतुल शाहांकडून राम मंदिरावर आधारित गाण्याची निर्मिती

भाजप नगरसेवक अतुल शाह यांच्या पुढाकारातून राम मंदिराच्या उद्घाटनावर गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. या गाण्याचे लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सदर गाण्याचा टीझर शेअर करण्यात आला आहे. पुढील वर्षी २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे...

कर्तव्य - द एनजीओ मेला अंतर्गत सायक्लोथोन मोहिमेचे आयोजन

'कर्तव्य - द एनजीओ मेला' कार्यक्रमाअंतर्गत विविध एनजीओला समाज माध्यमांशी जोडण्याचा अथक प्रयत्न करत असतो. येत्या १० डिसेंबर रोजी ससमीरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च द्वारा हा नियोजित कार्यक्रम आखण्यात आला आहे. एनजीओंना आपल्या कामचाप्रसार करण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी समाजातून मदत मिळवून देण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्नशील असतो...

सिंधुदुर्गातील पदवीधर शिष्टमंडळ आ. निरंजन डावखरे यांच्या भेटीला

दैवज्ञ समाजाचे युवाप्रमुख डॅा. विशाल कडणे यांनी कोकणातील ज्वेलरी व सुवर्णकार व्यावसायिक यांच्या शिष्टमंडळासह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांची ठाणे येथील निवासस्थानी सदीच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान सिंधुदुर्गातील सुवर्णकारांच्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. सुशिक्षित सुवर्णकार बांधवांना ज्वेलरी व्यवसायामध्ये उद्भवणार्या विविध प्रश्नावर आ. डावखरे यांनी मार्गदर्शन केले...

अरुणाचल प्रदेशातील कर्करोग जनजागृती

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात नुकतेच काही संस्थांच्या सहयोगाने ‘देव देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान’ने कर्करोगमुक्ती जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सदर जागृती कार्यक्रमाचा तपशील सारांश रूपात देत आहोत. ..

'मधापर अथवा मिधनापुरच्या वीरांगना !

जामनगर व भूज या टापूत साधारणपणे सहा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर १९७१ मध्ये भारत - पाकिस्तान दरम्यान धुमश्चक्री चालू होती. सोळा डिसेंबर ला युद्ध बंदी { सीज् फायर } घोषित करण्यात आली होती. पण,या ऐन धुमश्चक्रीत मिधनापूरच्या जवळपास अडीचशे महिलांनी इतिहास रचला. महिला नव्हेत... तर अठरा - वीस वर्षांच्या त्या लग्न झालेल्या लेकुरवाळ्या मुलीच होत्या. ..

कवी - लेखकांमध्ये विश्व बदलण्याची ताकद!

सामाजिक बांधिलकी जपायची असेल तर शब्दांना जपले पाहिजे. माणूस जोडण्याची भाषा सर्वत्र ऐकू आली पाहिजे. समाजाला जोडण्याची ताकद कवी - लेखकांमध्ये असते. त्यांनी योग्य भूमिका घेतली तर ते विश्व् जोडू शकतात. असा आशावाद अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केला...

आयपीएल २०२४ साठी ११६६ खेळाडूंची नोंदणी; दुबईत १९ डिसेंबरला लिलाव

आगामी आयपीएल २०२४ मोसमाकरिता बीसीसीआयकडून ११६६ खेळाडूंची नोंदणी करण्यात आली आहे. याआधी प्रत्येक संघाकडून आपल्याला खेळाडूला रिटेंशन करण्यात आले आहे. तर काही खेळाडूंना संघांकडून रिलीज करण्यात आले आहे. त्यानंतर आता एकूण ११६६ खेळाडूं लिलावाकरिता सज्ज झाले आहेत...

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसीकडे नुकसान भरपाईची मागणी

भारतीय संघ आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ करिता पाकिस्तानात खेळण्यास नाही आला तर आयसीसीने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणणे आहे. दरम्यान, पाकिस्तानात २०२५ साली होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीकरिता भारत न आल्यास भरपाई द्या...

आयपीएल रिटेंशन; आज होणार खेळाडूंच्या भविष्याचा फैसला

आयपीएल २०२४ हंगामाच्या लिलावापूर्वी सर्व संघाना त्यांच्या खेळाडूंना रिटेन करण्याची संधी दिली जाते. त्यामुळे संघ आता ठरविणार आहेत की, कुठल्या खेळाडूला संघात ठेवायचे आणि कुणाला काढायचे हे आज ठरविले जाणार आहे. तसेच, खेळाडू रिटेन करण्याची आज शेवटची संधी संघांना मिळणार आहे. त्यामुळे कोण कुणाला संघातून डच्चू देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेलं. ..

केंद्र सरकारकडून ठाणेकरांना २५ रुपये दरात कांदाविक्री

अचानक झालेल्या पावसामुळे कांद्याचे भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ठाण्यात २५ रुपये किलो दराने कांद्याची विक्री करण्यात येत आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी सामान्यांपर्यंत कांदा पोचविण्यासाठी पुढाकार घेतला असून, ठिकठिकाणी कांदा विक्री सुरू आहे. त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे...

इमारतीच्या पार्कींगमध्ये आग; ११ दुचाकी खाक तर तीन कारही क्षतीग्रस्त

पाचपाखाडी येथील ठाणे महापालिकेसमोरील सरोवर दर्शन इमारतीमधील (पार्कींग) वाहन तळात उभ्या असलेल्या वाहनांना आग लागली. या आगीत ११ दुचाकी जळून खाक झाल्या तर, तीन कारचेही आगीत नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली...

भाऊबीज उत्साहात साजरी; भगिनींनी केले बंधुराजांचे औक्षण

दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज.या सणामुळे हे नाते अधिकाधिक घट्ट होत जाते.बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असणारी भाऊबीज बुधवारी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली.ठाण्यातही भाऊबीजेचा उत्साह दुणावलेला दिसुन आला...

अभिनेत्री रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडीओप्रकरणी कारवाई सुरू

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या चेहरा मॉर्फ करून डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. या व्हायरल व्हिडीओमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा पाहायला मिळाली. यात काहीजणांनी संताप देखील व्यक्त केला. खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देत कारवाईची मागणी केली होती. तसेच, अनेक सेलिब्रिटींनी सदर प्रकरणाबाबत चिंता व्यक्त केली होती...

मध्य रेल्वेवरील विशेष गाड्यांचा ७.५० लाख प्रवाशांना फायदा

मध्य रेल्वेतर्फे यावर्षी प्रवाशांसाठी दिवाळी/छट/पूजा सणांसाठी ५०० विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. या विशेष गाड्यांचा लाभ आतापर्यंत सात लाख ५० हजार प्रवाशांनी घेतला आहे. नियमित धावणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांव्यतिरिक्त या विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. ..

विवेकचे कार्य समाजात संस्कृती आणि राष्ट्रीय विचार पोहोचवणारे : मंत्री मंगलप्रभात लोढा

"समाजात संस्कार, संस्कृती व राष्ट्रीय विचार पोहोचविण्याचे प्रभावी कार्य विवेक सातत्याने करत आहे. पुढेही करत राहील, याची खात्री आहे.",अशा शब्दांत विवेकचे महत्त्वपूर्ण योगदान राज्याचे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अधोरेखित केले...

एक पणती शिक्षणाची...

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी साजरी करायला आम्ही विक्रमगड आणि वाड्याच्या शाळांना भेट द्यायचे ठरवले. यानिमित्ताने चित्रकार श्री. बा.च्या कला कार्यशाळेचे आयोजन केले होते. मुलांनी शाळेच्या परिसरातील खर्‍या फुलापानांना, गवतांना, वेलींना... चिकटवून त्याची सुबक नक्षी तयार करून एन्व्हलप पेंटिंग केलेली होती. गेली तीन-चार वर्षे आमची ‘लेट्स इमॅजिन संस्था’ अशा प्रकारे कलेचा आस्वाद घेत या मुलांबरोबर दिवाळी साजरी करतेय. त्याविषयी... ..

चोखंदळ वाचकांसाठी साहित्यिक फराळाचीही मेजवानी!

दीपोत्सवाच्या प्रकाशपर्वानिमित्त चटपटीत फराळाबरोबरच दिवाळी अंकाच्या साहित्यिक फराळाचीही चोखंदळ वाचकांना तितकीच प्रतीक्षा असते. तेव्हा, दरवर्षीप्रमाणे यंदाही विषय वैविध्याने नटलेला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा दिवाळी अंक प्रकाशित झाला असून वाचकांसाठी उपलब्ध आहे...

आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत झुनझुनवाला महाविद्यालय सलग दुसऱ्यांदा विजेता

मुंबई विद्यापीठाच्या झोन दोनच्या आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय पुरुष गटात विजेता ठरला आहे. तर महिलांच्या गटात एन. खंडवाला महाविद्यालयाने विजेतेपदक पटकावले. झुनझुनवाला महाविद्यालयाच्या खेळाडुंना प्रशिक्षक मारीसेल्व पंडीधर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले...

कर्करोगाचे प्रमाण वाढण्यास तरुणांमध्ये वाढलेली व्यसनाधीनता कारणीभूत : गिरीश महाजन

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथिल जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेस कार्यक्रमाचे उद्धघाटन ग्रामविकास व पंचायत राज तसेच पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. ..

एससी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी द्यावे लागणार 'नॉन क्रिमिलियर' प्रमाणपत्र!

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असतानाच आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांना 'नॉन क्रिमिलियर' प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. ..

FIFA 2034 विश्वचषक सौदी अरेबियात होणार

फिफा २०३४ विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाला देण्यात आले आहे. फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फेंटिनो यांनी यांसदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार, २०३४ च्या फुटबॉल विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाला देण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी अंतिम मुदतीच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने जागतिक बोली लावणार नाही याबाबत स्पष्टता दिल्यानंतर २०३४ विश्वचषकाचे यजमानपद सौदी अरेबियाकडे सोपविण्यात आले...

यंदाचा गंधार गौरव पुरस्कार "मराठीतील सुपरस्टार" महेश कोठारे यांना जाहीर

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार असामी महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे सकाळी १० वा. आयोजित करण्यात आला आहे. ..