उबाठा गटाच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर! प्रवक्तेपदी कुणाकुणाची वर्णी?

    09-Apr-2025
Total Views |
 
Uddhav Thackeray
 
मुंबई : प्रसारमाध्यमांमध्ये उबाठा गटाची भूमिका मांडण्यासाठी अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली असून यात दोन जणांची मुख्य प्रवक्तेपदी तर सहा जणांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  चर्चगेट येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणार
 
उबाठा गटाचे अधिकृत प्रवक्ते जाहीर करण्यात आले असून यात मुख्य प्रवक्तेपदी खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उबाठा गटाचे नेते ॲड. अनिल परब, उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी, जनसंपर्क प्रमुख ॲड. हर्षल प्रधान, उपनेत्या सुषमा अंधारे, आनंद दुबे, जयश्री शेळके या सहा जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे सगळेजण प्रसारमाध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडतील.