राष्ट्रीय आरोग्य अभियानात ठाणे अव्वल

09 Apr 2025 17:04:02
 
Thane tops in National Health Mission
 
ठाणे : ( Thane tops in National Health Mission ) जागतिक आरोग्य दिनी मोबाईल मेडिकल यूनिट (एमएमयू) कार्यक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर, नामदार राम शिंदे तसेच सचिव डॉ. निपुण विनायक व वीरेंद्र सिंग व आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान अमगोथू श्री रंगा नायक यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्याला प्रथम पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला.
 
याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती शिंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अमोल बाग तसेच मोबाईल मेडिकल यूनिटचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.‌
 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली निश्चित केलेल्या गावांना भेटी, तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या, केलेल्या तपासण्या, असांसर्गिक आजारांसाठी स्क्रिनिंग, गरोदर मातांची तपासणी इत्यादी कामे उत्कृष्ट केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.‌ तसेच ठाणे जिल्ह्यात उत्तम कामगिरी केल्याबद्दल मोबाईल मेडिकल युनिटच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
 
 
Powered By Sangraha 9.0