दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महापालिकेची नोटीस! तात्काळ थकीत कर भरा, अन्यथा...

09 Apr 2025 14:00:23
 
Dinanath Mangeshkar Hospital
 
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे. थकीत कर भरण्याबाबत ही नोटीस बजावण्यात आली असून हा कर तात्काळ भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
हे वाचलंत का? -  संतापजनक! खेळणीचं आमिष दाखवत चिमुकलीवर अत्याचार करून हत्या
 
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका गर्भवती महिलेवर त्वरित उपचार न केल्याने तसेच तिला १० लाख रुपयांचे डिपॉजिट मागितल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर हे रुग्णालय चर्चेत आले. दरम्यान, एकीकडे या रुग्णालयावर कारवाईची मागणी होत असतानाच आता महापालिकेने रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये थकीत २७ कोटींपैकी २२ कोटी रुपयांचा कर भरण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच कर न भरल्यास जप्तीची नोटीस काढण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दिला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0