नवी दिल्ली (Marry Com Divorce) : देशातील महिला बॉक्सरपटू असलेल्या मेरी कॉमचा आणि त्यांचा पती करूंग अन्खोलरच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांमध्ये प्रेम संबंधाआधी मैत्री होती, नंतर मैत्रीचे प्रेमात आणि प्रेमाचे नात्यात रुपांतर झाले. मात्र, आता दोघांचेही नाते तुटण्याच्या चर्चा आहेत. त्यांना तीन मुलं आणि एक दत्तक मुल असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, मेरी कॉम ही एका वेगळ्या नात्यात अडकली आहे. विधानसभा निवडणुकीत मेरी कॉमचा पती अन्खोलरचा पराभव झाला. यामुळे १ ते २ कोटींपर्यंतचे नुकसान झाले आहे. यामुळे मेरी कॉम नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.
देशाचं नाव जागतिक पातळीवर नेणाऱ्या मेरी कॉम आपल्या मुलांसोबत राहत आहेत. तर दुसरीकडे तिचा पती दिल्लीत आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. त्यांच्या या अशा दूर राहण्याने दोघांमध्ये काहीतरी बिनसलं का? असा प्रश्न उपस्थित होत असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, आता सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मेरी कॉम ही काही महिन्यांपासून एका व्यक्तीसोबत नातेसंबंधत आहे. ती त्या व्यक्तीला आपला बिझनेस पार्टनर असल्याचे सांगते. तिच्या पतीचा निवडणुकीत झालेल्या पराभवाने मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आणि त्यामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची माहिती एका सूत्राने प्रसारमाध्यमाला माहिती दिली आहे.
तर दुसऱ्या सूत्राने माहिती दिली की, त्यांच्यात काही कौटुंबिक मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे ते दोघेही विभक्त राहत आहेत. मेरी कॉम ही आपल्या चार मुलांना घेऊन फरिदाबादमध्ये राहत आहे. तर पती दिल्लीत कुटुंबासोबत राहत आहे. मात्र, या चर्चेला केवळ उधाण आलेलं आहे. यात दोघांकडूनही घटस्फोटाबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.