गडचिरोली जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस

08 Apr 2025 12:37:49

unseasonal rain with hailstorm in gadchiroli 
 
गडचिरोली : (Gadchiroli Unseasonal Rain) राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चाळीशीपार गेलेला आहे. तर दुसरीकडे काही शहरांना अवकाळीचा फटका बसला आहे. अशातच आता गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात गारांसह अवकाळी पाऊस झाला आहे.
 
दरम्यान, गडचिरोलीतील सीमावर्ती भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. दरम्यान या पावसामुळे उकाडा असलेल्या ठिकाणी नागरिकांना गारवा निर्माण झाल्याने अनेक नागरिक सुखावले आहेत.
 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विदर्भात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चंद्रपूर, भंडारा, वर्धा यांसारख्या विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0