राज्याचे वाळू धोरण जाहीर! जाणून घ्या मंत्रिमंडळ बैठकीतील ९ महत्त्वाचे निर्णय
08-Apr-2025
Total Views |
मुंबई : (Maharashtra Cabinet Meeting Decisions) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि. ८ एप्रिल रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्यही उपस्थित होते. या बैठकीत राज्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच राज्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ९ निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीतील ९ महत्त्वाचे निर्णय
१) नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करणार, यातून विकास कामांना वेग येणार (नगर विकास)
२) राज्याचे वाळू- रेती निर्गती धोरण-२०२५ जाहीर (महसूल)
३) महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-१९७१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णयः झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार (गृहनिर्माण)
४) वांद्रे रिक्लेमेशन व आदर्श नगर (वरळी) या दोन म्हाडा अभिन्यासातील इमारतींचा C&DA मार्फत एकत्रित पुनर्विकास करण्याचा निर्णय (गृहनिर्माण)
५) सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना - २०२५ (महसूल)
६) नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार. (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन)
७) खाजगी अनुदानित आयुर्वेद व खाजगी अनुदानित युनानी संस्थांमधील गट-ब, क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक व दोन लाभांची 'सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना' लागू करण्याचा निर्णय (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)
८) शासकीय आयुर्वेद / होमिओपॅथी / युनानी / योग व निसर्गोपचार महाविद्यालयांतील कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)
९) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा (ग्रामविकास)