मुंबई : ( Mumbai Essential services will continue even if the entire city loses power ) भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी आणि मुंबईत सुमारे ८ लाख निवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरला १०० मेगावॅट क्षमतेचे 'बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम' उभारण्यासाठी 'महाराष्ट्र वीज नियामक आयोग'कडून मान्यता मिळाली आहे.
अत्याधुनिक 'ब्लॅक स्टार्ट' पर्यायाने सुसज्ज असलेली ही प्रणाली, ग्रिडमध्ये अडथळा निर्माण झाल्यास मेट्रो, रुग्णालये, विमानतळ आणि डेटा सेंटर्ससह महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना वीजपुरवठा जलद गतीने पुनर्संचयित करेल, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे 'ब्लॅकआउट' टाळता येतील आणि मुंबईच्या वीज वितरण प्रणालीची लवचिकता वाढेल. याव्यतिरिक्त, BESS चे अत्याधुनिक तंत्रज्ञान 'रिअॅक्टिव्ह पॉवर' व्यवस्थापन अनुकूल करेल, मागणी व्यवस्थापनाची कार्यक्षमता सुधारेल आणि शहराच्या वीज प्रणालीला बळकटी देईल.
उच्च 'रॅम्प-रेट' उपयुक्त असलेले हे स्टोरेज, लोड व्यवस्थापन सुलभ करत उच्च मागणीच्या काळातही स्थिर आणि संतुलित वीज पुरवठा सुनिश्चित करेल. याशिवाय कमी दराच्या काळात वीज साठवून, उच्च दराच्या काळात तिचा वापर करून वीज खरेदी खर्च कमी करण्यास मदत करेल, ज्यामुळे भविष्यात ग्राहकांसाठी अधिक कमी दर सुनिश्चित करता येतील.
साठवलेल्या विजेने मागणी चढउतारांचे व्यवस्थापन करू शकत असल्यामुळे पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी लागणाऱ्या भांडवली खर्च सुद्धा कमी करेल. यामध्ये 'फ्रिक्वेन्सी रेगुलेशन' आणि 'वोल्टेज सपोर्ट' सारख्या विशेष सुविधा आहेत. ज्यामुळे ग्रिड स्थिर आणि अधिक मजबूत होईल. दिवसा अतिरिक्त वीज साठवून ठेवता येईल आणि उच्च मागणीच्या वेळी ती उपलब्ध करून देऊन सौर ऊर्जेचा वापर चांगलच वाढवणं शक्य होईल.
संपूर्ण १०० मेगावॅटची ही प्रणाली १० मोक्याच्या ठिकाणी, विशेषतः मुंबई वितरणातील लोड सेंटर्सजवळ, स्थापित केली जातील, ज्याचे केंद्रीय निरीक्षण आणि नियंत्रण टाटा पॉवरच्या 'पॉवर सिस्टम कंट्रोल सेंटर' (पीएससीसी) कडून केले जाईल. येणाऱ्या काळात या प्रणालीचे 'डिस्ट्रिब्युटेड एनर्जी रिसोर्स मॅनेजमेंट' सिस्टम मध्ये एकत्रीकरण करण्याची योजना आहे.
अक्षय ऊर्जेचा वापर वेगाने होत असताना सुरळीत ऊर्जा संक्रमण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पारंपारिक पर्यायांच्या तुलनेत कमी कालावधीत अधिक किफायतशीर, जलद- उपयोगात अणूशकणारे उपाय आहे. या उपक्रमासह, टाटा पॉवर मुंबई शहरासाठी विश्वासार्ह, कार्यक्षम आणि भविष्यासाठी तयार वीज उपाय प्रदान करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळकटी देत तंत्रज्ञान नवोपक्रम आणि शाश्वतता चालवत आहे.