डीएन नगर ते मंडाळे मार्गावर मेट्रो चाचणी

वर्ष अखेरीपर्यंत मेट्रो २बचा पहिला टप्पा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट

    08-Apr-2025
Total Views |
 
Metro trial on DN Nagar to Mandalay route
 
मुंबई: ( Metro trial on DN Nagar to Mandalay route ) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ८ एप्रिलपासून मुंबई मेट्रो२बच्या 'मंडाळे ते डायमंड गार्डन' दरम्यानच्या ५.६ किमी लांबीच्या ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई)चा विद्युतप्रवाह सुरू करणार आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेवर गाडीच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.
 
डी. एन. नगर ते मंडाळे ‘मेट्रो २ बी’ मार्गिका २३.६ किलोमीटरची असून, त्यावर १९ स्थानके आहेत. या मार्गिकेसाठी सुमारे १०,९८६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या कामाने गती पकडली असून सद्यस्थितीत प्रकल्पाची ७९ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. यात मंडाळे कारशेडचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे कारशेड सुमारे ३१.४ हेक्टर जागेवर आहे.
 
कारशेडमधील विद्युत प्रवाहही सुरू केला जाणार आहे. त्यामुळे मंडाळे ते चेंबूर या मार्गावर दोन्ही वाहिन्यांचा विद्युत प्रवाह सुरू केला जात आहे. त्यामुळे कारशेड आणि मंडाळे ते चेंबूर मार्गावर चाचण्यांना लवकरच सुरुवात होईल.
 
असा आहे प्रकल्प
 
एकूण लांबी - २३.६ किमी
स्थानके - १९
पहिला टप्पा - मंडाळे ते डायमंड गार्डन
पहिल्या टप्प्यातील मार्गाची लांबी - ५.३ किमी