आमदार संजय केळकर अॅक्शन मोडवर! ठाणेकरांच्या समस्यांचा ऑन दि स्पॉट निपटारा!

    08-Apr-2025
Total Views |
 
MLA Sanjay Kelkar on action mode
 
ठाणे : ( MLA Sanjay Kelkar on action mode  ) "आमदार आपल्या भेटीला" उपक्रमाद्वारे आमदार संजय केळकर हे ठाणेकरांच्या विविध समस्यांचा ऑन दि स्पॉट निपटारा करतात. सोमवारी भाजपच्या खोपट कार्यालयात आयोजित या उपक्रमामध्ये नागरिकांनी शिक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत, सफाईपासुन ते निवासापर्यंतच्या ५० हुन अधिक तक्रारींची निवेदने सादर केली. यावेळी सोबत कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे हे देखील उपस्थित होते. 
 
ठाण्याचे आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपाच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात. आ. केळकर यांनी सोमवारी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी माजी नगरसेवक सुनेश जोशी, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजपा सरचिटणीस सचिन पाटील, भाजयुमो अध्यक्ष सुरज दळवी, विलास साठे, दीपक जाधव, महेश कदम, राजेश गाडे उपस्थित होते.
 
ठा म पा अंतर्गत अतिक्रमणे, पाणी विषय, एस. टी. महामंडळ, पोलीस स्टेशन संदर्भातील तक्रारी, फसवणूक, शैक्षणिक विषय, सफाई अशी विविध विषयांवरील ५० हुन अधिक निवेदने यावेळी प्राप्त झाली. आ. केळकर यांनी, अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर बोलून काही समस्यांचे तिथेच निरसन केले तर काही तक्रारदारांचे प्रबोधनही केले.
 
यावेळी बोलताना त्यांनी, केवळ निवेदने घेऊन न ठेवता त्याचा योग्य असा पाठपुरावा प्रशासनाकडे करून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न असतो. आतापर्यंत आमदार आपल्या भेटीला' चे १५१ कार्यक्रम मतदार संघातील विविध परिसरात घेतले असून ४० हजारच्या वर नागरिकांशी या निमित्ताने संवाद साधला आहे.नागरिकांना भेटण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ठराविक वेळेला बसुन नागरिकांशी संवाद साधला पाहिजे. आपल्या हक्काच्या माणसाशी बोलत आहोत अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे.