छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस! १० जणांवर गुन्हा दाखल

08 Apr 2025 19:30:04
 
Kirit Somaiyya
 
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला असून १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबद्दलची माहिती दिली.
 
छत्रपती संभाजीनगर येथील सिटी चौक पोलीस स्टेशन येथे मंगळवार, ८ एप्रिल रोजी एफआयआर क्र. १५० दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्या यांनी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासंबंधी केलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने कार्यालयीन संचिकाची छाननी करुन तपासणी करत असताना काही लोकांनी जन्म-मृत्यू नोंदणी आदेश मिळण्यासाठी कार्यालयास चुकीची, बनावट कागदपत्रे सादर केल्याचे दिसून आलेले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार केली.
 
हे वाचलंत का? -  राजगुरुनगरमध्ये भूमाफियाकडून शेतकऱ्यांची फसवणूक! एसआयटी स्थापन करणार; मंत्री बावनकुळेंचे आश्वासन
 
यावेळी मोहम्मद जमील सिद्दिकी मोहम्मद रशीद, मुजफ्फर अन्वर खान, नबी हबीब शेख, युनुस रफीक शेख (मुलगी इशरत युनुस शेख), युनुस रफीक शेख (मुलगा जुनेद युनुस शेख), युनुस रफीक शेख (मुलगा जैद युनुस शेख), रिजवान खान अनवर खान पठाण, सादिक हुसेन शेख, शाहेद सज्जाद शेख,मिर्झा अनवर बेग या दहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0