इंधनाच्या उत्पादनशुल्कात वाढ; मात्र सर्वसामान्यांना भुर्दंड नाही

    08-Apr-2025
Total Views |

Fuel duty hike
 
नवी दिल्ली: ( Fuel duty hike ) केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादनशुल्कात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. तथापि, यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले. हा खर्च पेट्रोलियम कंपन्यांकडून केला जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
 
सध्या सरकार पेट्रोलवर प्रतिलिटर १९.९० रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर १५.८० रुपये उत्पादनशुल्क वसूल करत आहे. या वाढीनंतर पेट्रोलवर प्रतिलिटर २१.९० रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर १७.८० रुपये शुल्क आकारले जाईल.
 
उत्पादनशुल्क वाढीचा भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांवर पडणार नसल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. हा खर्च पेट्रोलियम कंपन्यांकडून केला जाईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलियममंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, “कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमतींनुसार शुल्क समायोजित केले जाईल. जर कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरण होत राहिली, तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात.”