रियाध : जगभरातील असंख्य मुस्लिम हजसाठी (Hajj) आणि उमराहसाठी सौदी अरेबियात दाखल होत असतात. यावेळी सौदी अरेबिया सरकारने कठोर पाऊल उचलत भारतासोबत इतर १४ देशांना तात्पुरता व्हिसा देण्यासाठी त्यांनी बंदी घातली आहे. सरकारचे म्हणणे आहे की, या देशामध्ये असंख्य लोक हे व्हिसा नियमांचे पालक करत नाहीत आणि नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी होणार नाहीत. यावेळी सरकारने कठोर भूमिका घेत नोंदणीशिवाय कोणालाही हजला जाता येणार नाही असे सांगितले आहे. जर विनानोंदणीचे कोणी आढळल्यास त्याला पाच वर्षांसाठी सौदी अरेबियेत प्रवेश दिला जाणार नाही.
मिळालेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियेतील क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी हज यात्रेत सुरळीत आणि सुरक्षित आयोजनाची निश्चिती करण्यासाठी अधिकाऱ्यांना कठोर व्हिसासंबंधित नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. ही बंदी जूनपर्यंत राहणार आहे. बंदी घालण्यात येणार्या व्हिसामध्ये बंदी उमराह, व्यवसाय आणि कुटुंब भेटीसाठीच्या व्हिसांचा यामध्ये समावेश होत आहे.
'या'देशांसाठी सौदीत जाण्यास व्हिसा बंदी
सौदी अरोबिया सरकारने भारतासोबत इतर १४ देशांवर व्हिसा बंदी केली आहे. ज्यात बांग्लादेश, पाकिस्तान, इंडोनेशिया, नायजेरिया, इजिप्त, मोरोक्को, इथिओपिया, अल्जेरिया, इराक, जॉर्डन, सुदान, ट्युनिशिया आणि येमेनमधील नागरिकांसाठी व्हिसांवर बंदी घालण्यात आली आहे.आता देशांतील मुस्लिमांना फक्त १३ एप्रिल २०२५ पर्यंतच उमराह व्हिसा मिळेल. त्यानंतर हज पूर्ण होईपर्यंत व्हिसा दिला जाणार नाही.
बंदी घालण्याचे कारण
अधिकृत परवानगीशिवाय हज करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांने हे कठोर पाऊल उचललं आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, यामुळे गर्दी आणि गोंधळ निर्माण होईल. ज्यामुळे गंभीर अपघात होतात. काही लोक उमराह आणि हजच्या नावाने भीक मागताना आढळून येतात असे मत सौदी सरकारने मांडले.