किरीट सोमय्यांना धमकी! काय आहे प्रकरण?

    07-Apr-2025
Total Views |
 
Kirit Somaiyya
 
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मशीदींवरील अनधिकृत भोंग्यासंदर्भात तक्रार दाखल केल्याने त्यांना धमकी देण्यात आली आहे. युसूफ उमर अन्सारी नामक व्यक्तीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांना धमकी दिली.
 
किरीट सोमय्या हे सातत्याने बांग्लादेशी, रोहिंगे यांच्यासह अनधिकृत भोंग्याविरोधात आवाज उठवत असतात. दरम्यान, गोवंडी येथे ७२ मशिदींमध्ये अनधिकृतपणे लाऊडस्पीकर बसवण्यात आले असून हे भोंगे रोज जोरात वाजत असतात. यातील एकाही मशिदीने लाऊडस्पिकर किंवा भोंगे लावण्याची परवानगी घेतलेली नाही, असे सांगत किरीट सोमय्या यांनी गोवंडी येथील शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली होती.
 
त्यानंतर युसूफ उमर अन्सारी या व्यक्तीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट करत किरीट सोमय्या यांना धमकी दिली आहे. ८ तारखेला किरीट सोमय्यांच्या घरी येऊन आंदोलन करण्याची तसेच घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, ईशान्य मुंबईचे भाजपचे अध्यक्ष दिपक दळवी यांनी मुलूंड पोलिस आयुक्तांना पत्र लिहित युसूफ उमर अन्सारीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच अनधिकृत भोंग्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे.