तिरुवनंतपुरम : केरळमधील (Kerala) श्री नारायण धर्म परिपालन या पक्षाचे सरचिटणीस वल्लापल्ली नटेसन यांनी मुस्लिम बहुसंख्य मलप्पुरम हा एक पूर्णपणे वेगळा देश असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याने केरळातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी आपल्या जिभेला हाड नसल्यासारखे वक्तव्य केले आहे. केरळातील मुस्लिमबहुल असणारा भागाला विभक्त ठेवत दुसरा देश घोषित करा, असे वक्तव्य नटेसन यांनी केले होते.
नेटसन यांनी एका अधिवेशनात बोलताना म्हणाले की, मला वाटत नाही की तुम्ही मल्लपुरममध्ये ताजे हावमानाचा उपभोग घ्याल. तसेच मोकळा श्वासही घ्याल. मला वाटत नाही की तुम्ही स्वातंत्रपणे आपले मत तयार करून आपले जीवन जगू शकाल. मलप्पुरा हा एक वेगळा देश आहे. ते वेगवेगळ्या लोकांचे राज्य आहे. दरम्यान, मल्लपुरामध्ये सुमारे ७० टक्के मुस्लिम आणि २७ टक्के हिंदू लोकसंख्यांचा समावेश असून मुस्लिमबहुल आहे.
नटेसन यांच्या वक्तव्याने राज्यातील इतर राजकीय पक्षांकडून, विशेषत म्हणजे इंडियन यूनियन मुस्लिम लीगकडून तीव्र प्रतिक्रिया दिला जात आहेत. याचपार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सारवा सारव केली आहे. ते म्हणाले की, मला काही जण मुस्लिमविरोधी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे आता इंडियन यूनियन मुस्लिम लीगकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशातच आता ते म्हणाले आहेत की, काही जण मला मस्लिमविरोधी ठरवत आहेत. पण मी कोणत्याही समुदायाविरोधात नाही. मी कोणतेही द्वेष निर्माण होणारे वक्तव्य केलेले नाही.