दीनानाथ मंगेशकर रुग्णालय मृत्यू प्रकरण! आरोग्य विभागाच्या अहवाल काय?

    07-Apr-2025
Total Views |
 
Dinanath Mangeshkar Hospital
 
पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याने राज्यभरात एकच खळबल उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल पुढे आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत या अहवालाती ठळक बाबींवर भाष्य केले.
 
रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "डॉ. राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. हा माता मृत्यू असल्याने माता मृत्यू अन्वेशन समितीच्या माध्यमातून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या समितीचा अहवाल आज संध्याकाळपर्यंत सादर होईल. यासोबतच धर्मादाय आयुक्त समितीचा अहवाल उद्यापर्यंत तयार होईल. यासाठी एकूण तीन समित्या काम करत आहेत."
 
हे वाचलंत का? -  पाच तास थांबवून ठेवले अन्...; तनिषा भिसेंच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी : रुपाली चाकणकर
 
अहवालात रुग्णालयावर ठपका
 
"ज्यापद्धतीने रुग्णावर उपचार करणे अपेक्षित होते त्याप्रमाणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचार केले नाहीत. या अहवालानुसार रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. आणखी दोन अहवाल आल्याशिवाय कारवाई करता येणार नाही. त्यामुळे उद्या या तिन्ही समितींचे एकत्रित अहवाल आणि भिसे कुटुंबियांनी केलेली तक्रार या अनुषंगाने यावर कारवाई केली जाईल," असे त्यांनी सांगितले.
 
धर्मादाय रुग्णालयाची नियमावली पाळली नाही
 
त्या पुढे म्हणाल्या की, "धर्मादाय हा शब्द यासाठी आहे की, १० टक्के खाटांची व्यवस्था ही १ लाख ८५ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. इतर १० टक्के खाटा या ८५ हजार रुपये उत्पन्न असलेल्या रुग्णांसाठी आहे. तसेच ८५ हजार रुपये उत्पन्न असलेल्या रुग्णांच्या उपचारावर ५० टक्के सवलत देणे हे धर्मादाय रुग्णालयांना अनिवार्य आहे. परंतू, यापैकी कोणलीही नियमावली रुग्णालयाने पाळली नाही."
 
...तर रुग्ण वाचला असता!
 
"या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, ससून रुग्णालय, सूर्या हॉस्पीटल आणि मणीपाल रुग्णालयापर्यंतचा अहवाल आहे. सूर्या हॉस्पीटलमध्ये डिलीव्हरी झाल्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान, ३१ मार्च रोजी त्यांना मृत्यू झाला. या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला असून त्यांनी नियमावली पाळली नाही. रुग्णावर उपचार करणे गरजेचे असतानाही रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे. त्यामुळे या प्रकरणात रुग्णालय दोषी आहे. रुग्णालयाने त्वरित उपचार केले असते तर रुग्ण वाचला असता. तिन्ही अहवाल पुढे आल्यानंतर रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल," असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.